Current Affairs of 24 November 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 नोव्हेंबर 2016)

चालू घडामोडी (24 नोव्हेंबर 2016)

‘युनो’तील दूत म्हणून निक्की हेली यांचे नामांकन :

  • अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिनाच्या भारतीय वंशाच्या गव्हर्नर निक्की हेली यांचे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील (युनो) दूत म्हणून नामांकन केले आहे.
  • नियोजित अमेरिकी प्रशासनात कॅबिनेट दर्जाच्या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकी नागरिक असतील.
  • गव्हर्नर हेली यांनी राज्य व देशाच्या भल्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणे राबविण्याकरिता लोकांना एकजूट करण्याची कामगिरी केली असल्याचे ट्रम्प म्हणाले.
  • तसेच त्या जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करीत एक मोठ्या नेत्या म्हणून नावारूपाला येतील, अशा शब्दांत ट्रम्प यांनी त्यांची प्रशंसा केली.
  • ट्रम्प यांनी वरिष्ठ स्तरीय प्रशासनासाठी निवडलेल्या हेली पहिल्या महिला आहेत.

थोर गायक बालमुरलीकृष्ण कालवश :

  • कर्नाटकी या दाक्षिणात्य शास्त्रीय गायनशैलीचे थोर गायक आणि ‘मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा’ या सरकारी जाहिरातीच्या गाण्याच्या माध्यमातून घरात व मनात पोहोचलेले महान संगीतज्ज्ञ मंगलमपल्ली उर्फ एम. बालमुरलीकृष्ण (वय 86 वर्ष) यांचे 22 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथील राहत्या घरी निधन झाले.
  • बालमुरलींनी जगभरात 25 हजारांहून अधिक संगीतसभा गाजवून रसिकांना तृप्त केले होते.
  • पं. भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरसिया आणि विदुषी किशोरी अमोणकर यांच्यासोबत त्यांनी कर्नाटकी आणि हिंदुस्तानी संगीताच्या मिलाफाचे महान कार्य केले.
  • तेलुगु, संस्कृत, कन्नड आणि तामिळमध्ये बांधलेल्या 400 हून अधिक बंदिशी ही त्यांची संगीतकलेला दिलेली अजोड देन आहे.
  • बालमुरली कर्नाटकी गायक म्हणून ख्यातकीर्त असले तरी त्यांची हिंदुस्तानी संगीताची बैठकही तेवढीच भक्कम होती.
  • व्हायोला, व्हायोलिन आणि मृदंगम ही स्वर आणि तालवाद्येही ते तेवढ्याच हुकमतीने वाजवू शकत होते.

आयसीसी क्रमवारीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर :

  • विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटीमधील फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. कसोटीमधील हे विराटचे आतापर्यंतचे सर्वोत्तम मानांकन आहे.
  • इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये विराटने पुन्हा एकदा अफलातून कामगिरी केली आहे.
  • विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत विराटने 167 आणि 81 धावा केल्या होत्या. त्याच्या कामगिरीला गोलंदाजांचीही साथ लाभल्याने भारताने या कसोटीत दणदणीत विजय मिळविला.
  • फलंदाजीतील या कामगिरीमुळे विराटच्या क्रमवारीत एकदम 10 स्थानांची सुधारणा झाली.
  • आयसीसी‘च्या क्रमवारीतील गुणांमध्ये 800 चा टप्पा ओलांडणारा कोहली भारताचा अकरावा खेळाडू ठरला आहे.

जेष्ठ लेखिका डॉ. उषा देशमुख यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान :

  • राज्य शासनांतर्फे ज्येष्ठ संत साहित्य लेखिका डॉ. उषा देशमुख यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
  • प्राचीन मराठी साहित्याचा अभ्यास आणि साहित्य संशोधन व साहित्य समीक्षा हे त्याच्या अभ्यासाचे क्षेत्र आहे.
  • मुंबई विद्यापीठातून मराठी विभागप्रमुख म्हणून त्या निवृत्त झालेल्या आहेत.
  • संतसाहित्यावर आधारित त्यांची ‘कुसुमाग्रज साहित्यदर्शन’, ‘दीपमाळ’, ‘ज्ञानेश्वरी एक शोध’‘रामायणाचा आधुनिक साहित्ययावरील प्रभाव’ ही खूप गाजलेली पुस्तके आहेत.

दिनविशेष :

  • 24 नोव्हेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो.
  • मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार व समीक्षक, केशव मेश्राम यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1937 रोजी झाला.
  • 24 नोव्हेंबर 1961 हा भारतीय लेखिका, अरुंधती रॉय यांचा जन्मदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.