Current Affairs of 24 March 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 मार्च 2017)

चालू घडामोडी (24 मार्च 2017)

विश्वचषक शॉटगन स्पर्धेत अंकुर मित्तलचा सुवर्ण वेध :

 • भारताचा नेमबाज अंकुर मित्तल याने विश्वचषक शॉटगन नेमबाजीत दिमाखात तिरंगा फडकवताना सुवर्ण पदकाचा वेध घेतला.
 • विशेष म्हणजे, यावेळी मित्तलने अंतिम फेरीत विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. त्याने ऑस्ट्रेलियाचा प्रतिस्पर्धी जेम्स विलेटला पराजित करत बाजी मारली.
 • 23 मार्च रोजी झालेल्या सहा खेळाडूंच्या अंतिम फेरीत अंकुरने 80 पैकी सर्वाधिक 75 गुणांसह भारताला स्पर्धेत पहिले पदक जिंकून दिले.
 • तसेच दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या विलेटला 73 गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 मार्च 2017)

राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध :

 • 2017 हे वर्ष व्हिजीट महाराष्ट्र वर्ष म्हणून राज्य सरकारने जाहिर केल्यानंतर आमच्या पर्यटन विभागाकडून पर्यटकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यावर अधिक भर देण्यात येणार असून त्यासाठी राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून टूरीझम मोबाईल ॲप च्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती आता क्लिकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे रोहयोपर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
 • 23 मार्च रोजी ना.जयकुमार रावल यांच्या मंत्रालयीन दालनात एम.टी.डी.सी.मोबाईल ॲपचे अनावरण ना.रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
 • तसेच यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक के.एस. गोविंदराज तसेच पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भारताचा मानवी विकास निर्देशांक 131 व्या क्रमांकावर :

 • जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेची म्हणजेच भारताची स्थिती मानवी विकास निर्देशांकाबाबतीत खूप खालावली आहे.
 • भारताचा मानवी विकास निर्देशांक यादीमध्ये 131 वा क्रमांक आहे. एका हाताला भारत अर्थव्यवस्थेबाबत अमेरिका, चीन सारख्या मोठ्या देशांसोबत स्पर्धा करत आहे तर मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत भारताची स्थिती पाकिस्तान आणि नेपाळसारखी आहे.
 • जगातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण, झपाट्याने वाढणारी आणि लक्षवेधी अर्थव्यवस्था मात्र मानवी विकासाबाबत उदासीन दिसत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.
 • गेल्या काही वर्षांपासून भारताने मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत काहीच प्रगती केली नसल्याचे दिसत आहे.
 • 2015 मध्ये भारत आणि चीनमध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली असल्याचे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत परंतु 2015 देखील भारताची मानव विकास निर्देशांकाची स्थिती खालवलेली होती असे दिसून आले.
 • तसेच 2014 मध्ये देखील भारताचा या यादीतील क्रमांक 131 वा होता. गेल्या काही वर्षात यामध्ये काहीच बदल न झाल्याने अद्यापही भारताचा या यादीतील क्रमांक 131 आहे.

भारतीय हवाई दलाचा इस्रायलमध्ये संयुक्त युद्धाभ्यास :

 • भारतीय हवाई दलाचे वैमानिक इस्रायलमध्ये जाऊन युद्धाभ्यास करणार आहेत. अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यासह भारतीय वैमानिक संयुक्त युद्धाभ्यास करणार आहे.
 • विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तानला या युद्धाभ्यासात स्थान देण्यात आलेले नाही. हा संयुक्त युद्धाभ्यास हवाई ड्रिल इतिहासातील सर्वात मोठा आणि जटिल संयुक्त युद्धाभ्यास मानला जातो आहे.
 • इस्रायलमध्ये करण्यात येणाऱ्या संयुक्त युद्धाभ्यासाची संपूर्ण माहिती अध्याप समोर आलेली नाही, असे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
 • भारतीय हवाई दलाचे वैमानिक वर्षाच्या शेवटी ब्लू फ्लॅग एक्सरसाइजमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिल्याचे इकॉनॉमिक टाईम्सने म्हटले आहे.
 • भारत पहिल्यांदाच इस्रायलमध्ये इतर देशांसह संयुक्त युद्धाभ्यास करणार आहे. इस्रायल भारताला लष्करी साहित्य आणि हत्यारे पुरवणारा प्रमुख देश आहे.
 • भारतासह सात देश या युद्धाभ्यासात सहभाग घेणार आहेत. जवळपास 100 लढाऊ विमानांचा या युद्धाभ्यासात सहभाग असणार आहे.

दिनविशेष :

 • 24 मार्च हा जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन आहे.
 • आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा 24 मार्च 1855 मध्ये सुरू झाली.
 • 24 मार्च 1793 हा कागदी चलनाचे जनक समजले जाणारे ‘थॉमस रुझवेल्ट’ यांचा जन्म दिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मार्च 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.