Current Affairs (चालू घडामोडी) of 24 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | ‘पद्म’ पुरस्कार जाहीर |
2. | गिरगाव चौपाटीचे ‘स्वराज्यभूमी’ नामंतर |
3. | ‘सुकन्या समृद्धी खाते’ योजनेचा शुभारंभ |
4. | दिनविशेष |
‘पद्म’ पुरस्कार जाहीर :
- भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, अभिनेते अमिताभ बच्चन, योगगुरू रामदेव बाबा आणि आध्यात्मिक गुरु श्री. रविशंकर यांना ‘पद्म’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुरस्काराची घोषणा करण्यात येते.
- यावेळी या यादीत 148 जणांची नावे आहेत.
गिरगाव चौपाटीचे ‘स्वराज्यभूमी’ नामंतर :
- गिरगाव चौपाटीचे ‘स्वराज्यभूमी‘ असे नामांतर करण्याची प्रदीर्घ काळ रेंगळलेली मागणी आता पूर्ण होणार आहे.
- मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी याबबाद त्वरित निर्णय घेवून त्याची अमलबजावणी करण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत.
‘सुकन्या समृद्धी खाते’ योजनेचा शुभारंभ :
- 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सुकन्या समृद्धि खाते‘ योजनेचा शुभारंभ करण्यत आला.
- 10 वर्षाखालील पाच मुलींच्या नावे बँकेत खाते उघडून त्यांची कागदपत्रे मुलींकडे सोपवण्यात आली.
- ‘सुकन्या समृद्धी खाते‘ मुलींचे बचतीचे साधन म्हणून ही योजना आहे.
दिनविशेष :
- 1966 – इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
- 1950 – डॉ. राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आलेत.
- 2002 – काउर येथून एरियन-4 या अग्निबाणाने भारताचा उपग्रह इन्सॅट 3-सी चे यशस्वी प्रेक्षेपण केले.
- 1943 – पुण्यात कॅपिटल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट