Current Affairs (चालू घडामोडी) of 24 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | रेल्वेचे तिकीटे आता मोबाइल अॅपवार |
2. | मराठा आरक्षणासंदर्भातील नवीन विधेयक विधानसभेत मंजूर |
3. | विरोधी पक्षनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील |
4. | अडत बंदच्या निर्णयाला स्थगिती |
5. | 26 जानेवारीची परेड शिवाजी पार्कवर |
6. | अटलबिहारी वाजपेयी, मालवीय यांना भारतरत्न |
7. | दिनविशेष |
रेल्वेचे तिकीटे आता मोबाइल अॅपवार :
- तिकीटांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्यास रेल्वेने मोबाइलवर तिकिटे देण्याचा निर्णय घेतला आहे.
- ही सेवा एका महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
- 26 डिसेंबर रोजी मोबाइल अॅपचा शुभारंभ रेल्वेमंत्र्यांकडून मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात केला जाणार आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील नवीन विधेयक विधानसभेत मंजूर :
- राज्यातील भाजप सरकारने मंगळवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील नवीन विधेयक विधानसभेत मांडले.
- विधानसभेने या विधेयकाला मंजूरी दिली आहे.
- मात्र नवीन विधेयकात मुस्लिमांचा समावेश केला गेलेला नाही.
विरोधी पक्षनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील :
- कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेतेपदी मंगळवारी निवड करण्यात आली.
अडत बंदच्या निर्णयाला स्थगिती :
- राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कृषी मालाच्या विक्री मूल्यावर शेतकर्यांकडून वसूल केली जाणारी अडत बंद करण्याचा निर्णयाला सोमवारी राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली.
26 जानेवारीची परेड शिवाजी पार्कवर :
- 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची परेड या वर्षी मरिन ड्राइव्हवर होणार नसून परेड या वर्षी शिवाजी पार्कवर होणार आहे.
अटलबिहारी वाजपेयी, मालवीय यांना भारतरत्न :
- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व मनमोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे.
- विशेष म्हणजे 25 डिसेंबर रोजी दोघांचाही जन्मदिवस आहे.
- त्या निमित्ताने उद्या हा पुरस्कार जाहीर होण्याच्या शक्यता आहेत.
दिनविशेष :
- 24 डिसेंबर – भारतीय ग्राहक दिन.
- 1968 – अपोलो-8 यानातून अवकाशवीर चंद्राजवळ पोहोचला चंद्राची पृथ्वीवरून न दिसणारी बाजू माणसाने पहिल्यांदा पहिली.
- 1989 – बालकांच्या आवडीचे एस्सेल वर्ल्ड हे भारतातील पहिले मनोरंजन उद्यान सुरू.
- 2000 – विश्वनाथन आनंद हा 15 वा जागतिक बुद्धिबळ विजेता ठरला.