Current Affairs (चालू घडामोडी) of 23 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. आता व्हॉटसअ‍ॅप कंप्युटरवर उपलब्ध
2. शिवस्मारकाच्या कृती समितीच्या अध्यक्षपदी विनायक मेटे 
3. जपानमध्ये उभारणार आंबेडकरांचा पुतळा
4. दिनविशेष 

 

 

 

 

आता व्हॉटसअ‍ॅप कंप्युटरवर उपलब्ध :

  • जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजींग अ‍ॅप असणारे व्हॉटसअ‍ॅप आता कंप्युटरवरुण वापरता येणार आहे.
  • व्हॉटसअ‍ॅपची सुविधा सध्या गूगल क्रोम ब्राउसरवर वापरता येणार आहे.
  • तर अ‍ॅप फ्लॅटफॉर्मवरील मर्यादेमुळे आयफोन युझर्सला ही सेवा वापरता येणार नसल्याचे व्हॉटसअ‍ॅपने स्पष्ट केले आहे.

शिवस्मारकाच्या कृती समितीच्या अध्यक्षपदी विनायक मेटे :

  • अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्मारकासंबंधी स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीच्या अध्यक्षपदी शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांची निवड शासनाने केली आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईलगतच्या अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.यासाठी शासनाने ही समिति नेमली आहे.
  • या समितीत सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव हे तीन सदस्य आहेत.
  • 19 फेब्रुवारीपर्यंत या सर्व अनुषंगीक परवानग्या घेण्याचे काम ही समिति करणार आहे.

जपानमध्ये उभारणार आंबेडकरांचा पुतळा :

  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जपानमधील ‘कोयासान‘ या बौद्ध केंद्रात उभारण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्रातील पर्यटनाचा जगभर प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळा‘ने पहिले अंतरराष्ट्रीय कार्यालय टोकियो येथे सुरू केले आहे.
  • 6 फुट 2 इंच इतकी याची ऊंची आहे.
  • पुतळ्याचे अर्धे काम पूर्ण झालेले असून मार्च अखेरपर्यंत त्याचे काम पूर्ण होईल.

दिनविशेष :

  • 1897 नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म.
  • 1932 – प्रभात फिल्म कंपनीचा ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटाची हिन्दी आवृत्ती मुंबईत प्रदर्शित झाली.
  • 1911 – जॅक्सन खुनप्रकरणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर दूसरा खटला सुरू.
  • 1926 – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.