Current Affairs of 23 February 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 फेब्रुवारी 2018)

चालू घडामोडी (23 फेब्रुवारी 2018)

भारतीय महिला फायटर पायलट ‘अवनी चतुर्वेदी’ :

  • भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी यांनी ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ हे फायटर विमान उडवून नवा इतिहास रचला. 19 फेब्रुवारी रोजी गुजराथच्या जामनगर एअरबेस वरुन त्यांनी मिग-21 हे विमान उडविले.
  • मिग-21 विमान हवेत उडवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतरच्या टप्प्यात चंद्रप्रकाशात आणि गडद काळोखातही विमान चालवण्याचे प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात येते. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते. अवनी जून 2016 पासून हे प्रशिक्षण घेतले आहे.
  • एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारे फाटर विमान उडविण्यासाठी एका वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी जवळपास 15 कोटी खर्च येतो. इतिहासात पहिल्यांदाच महिलेने मिग-21 हे विमान उडविले. या प्रशिक्षणादरम्यान महिला आहेत म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे झुकते माप देण्यात आले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र सरकारपुढे राष्ट्रपतींची माघार :

  • केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या ‘विनंती’मुळे खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना स्वतचाच निर्णय मागे घ्यावा लागला आहे.
  • शांतीनिकेतनमधील विश्व भारती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी केलेली स्वपन कुमार दत्ता यांची नियुक्ती ‘सरकारच्या सल्ल्यानंतर’ राष्ट्रपतींनी रद्द केली. आता केंद्र सरकार नव्या कुलगुरूंच्या शोधात आहे.
  • तसेच त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठाच्या कार्यकारी समितीची (कर्मसमिती) बैठक बोलावली असून यात नवी कुलगुरू शोधसमिती निवडली जाणार आहे. ही समिती नव्या कुलगुरूची शिफारस करेल.

आदिवासींना मिळाली रोजगाराची नवी वाट :

  • प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्याने नागरिक कागदी, कापडी आणि ज्युटच्या पिशव्या वापरण्यावर भर देत आहेत. याच पिशव्या आकर्षक रंगात आणि चित्रात सजलेल्या मिळाल्यास त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून येऊर-जांभूळपाडा भागातील आदिवासींनी यातूनच रोजगाराची नवी वाट शोधली आहे.
  • वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून जांभूळपाडा येथील आदिवासी या पिशव्या रंगवण्याचे काम करत असून, व्यावसायिकही वेगवेगळ्या मागणीनुसार या आदिवासींची मदत घेत आहेत. जांभूळपाडा हा भाग तसा दुर्लक्षित असून, या नव्या उद्योगामुळे येथील आदिवासींना रोजगाराची दालने खुली झाली आहेत.
  • ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या येऊर येथील जांभूळपाडा हा आदिवासी पाडा अद्यापही दुर्लक्षितच आहे. जांभूळपाडा परिसरात साधारण 40 घरांमध्ये 200 ग्रामस्थ राहतात. येऊर परिसरातील रस्त्याला लागून असलेल्या बंगल्यांना, हॉटेल्सना सर्व सोई-सुविधा मिळत असतानाही या पाड्यावरील नागरिक मात्र आजही अनेक सुविधांपासून वंचित आहेत.
  • वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून या पाड्यावर प्री-प्रायमरी स्कूल म्हणजेच बालवाडी चालवण्यात येते. विविध उपक्रम पाड्यावर घेतले जातात. या उपक्रमात पाड्यावरील आदिवासीही उत्साहाने सहभागी होतात.

नाना पटोलेंची प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यपदी नियुक्ती :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करीत तसेच भाजपच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील नरमाईच्या भुमिकेवर नाराज असल्याचे सांगत भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्यावर काँग्रेस हायकमांडने 22 फेब्रुवारी रोजी महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली.
  • राहुल गांधी यांनी नाना पटोले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी तर भाई नगराळे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबरोबर आता पटोले आणि नगराळे यांच्यावर पक्षाची महत्वपूर्ण जबाबदारी राहणार आहे.

नवी मुंबई मेट्रो 2019 पर्यंत ट्रॅकवर येणार :

  • सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजल्या जाणाऱ्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील विलंब झालेल्या स्थानकाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत.
  • मे 2019 पर्यंत पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्य कार्यकारी के.के. वरखेडकर यांनी दिली. सिडकोने मे 2011 मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रकल्पाला सुरुवात केली.
  • बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर अंतरावर सुरू केलेला प्रकल्प डिसेंबर 2014 मध्ये पूर्णत्वाला जाईल, असे जाहीर केले होते. पण कंत्राटदारांच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे सात वर्षे विलंब झाला. त्यामुळे सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन ही अर्धवट आहेत.

दिनविशेष :

  • पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल सन 1455 मध्ये 23 फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाले.
  • 23 फेब्रुवारी 1876 मध्ये देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ‘संत गाडगे महाराज’ यांचा जन्म झाला.
  • आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना 23 फेब्रुवारी 1947 मध्ये झाली.
  • सन 1952 मध्ये 23 फेब्रुवारी रोजी संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.