Current Affairs of 23 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2017)

मेट्रो प्रकल्पांतून 50 हजार नोकऱ्या मिळणार :

  • मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रवाशांना अत्याधुनिक व आरामदायी साधन उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे काम सुरू केले असून लवकरच सात मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी तब्बल 62 हजार 943 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे 10 हजार अभियंते40 हजार कुशल-अकुशल कामगारांना रोजगार मिळणार आहे.
  • एमएमआरडीएतर्फे अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या 18.5 किलोमीटर लांबीच्या मेट्रो-7 या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी 6208 कोटी रुपये खर्च होणार असून त्यावर 17 स्थानके असतील. त्याचबरोबर दहिसर ते डी.एन. नगर या 16.5 किलोमीटर लांबीच्या मेट्रो-2 अ या प्रकल्पाचे कामही सुरू आहे. त्यासाठी 6410 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अमेरिकेचा पुन्हा पाकिस्तानला इशारा :

  • पाकिस्तानने तालिबान्यांना आणि दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय देऊ नये. त्याचबरोबर दहशतवादी कारवायांसाठी टेरर फंडिंग बंद करावे, असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. मात्र, नेहमीप्रमाणे ही केवळ धमकीच ठरू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  • अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी आपल्या अफगाणीस्तान दौऱ्यादरम्यान ही माहिती दिली.
  • अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळावर तैनात अमेरिकन सैन्याचा भेटीदरम्यान पेंस यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संदेश सैन्यापर्यंत पोहोचवला.
  • पाकिस्तान बऱ्याच काळापासून तालिबान आणि अन्य दहशतवादी संघटनांना सुरक्षित आश्रय देत आहे. यावरुन ट्रम्प यांनी पाकिस्तानला इशारा देताना म्हटले आहे की, पाकिस्तानला अमेरिकेसोबतच्या सहकार्यातून बरेच काही मिळणार आहे.
  • मात्र, गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना साथ दिल्यास ते बरेच काही गमावू शकतात. भारत आणि अफगाणिस्तान या शेजारी देशांविरोधात पाकिस्तानाच्या भुमिकेबाबतही ट्रम्प यांनी पाकिस्तानला खडसावले आहे.

यंदाच्या वर्षी नरेंद्र मोदींनी 14 देशांना भेट दिली :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे कायमच चर्चेचा विषय राहिले आहेत. मोदींनी सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान म्हणून वेगवेगळ्या कारणांनिमित्त परदेश दौरे केले.
  • मात्र प्रसारमाध्यमांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या परदेश दौऱ्यांशी मोदींच्या परदेश दौऱ्यांची चर्चा सुरु झाल्यानंतर समाज माध्यमांवरून मोदींच्या या विदेश दौऱ्यांवर टीका होऊ लागली, मिम्स बनू लागले आणि मोदींचे परदेश दौरे हा जनसामान्यांचा विषय झाला.
  • पहिल्या तीन वर्षात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 27 देशांना भेट दिली तर मोदींनी पहिल्या 3 वर्षात चक्क 49 देशांना भेट दिली आहे. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2017मध्ये नरेंद्र मोदींनी 14 देशांना भेट दिली.

विजय रुपाणी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री होणार :

  • भारतीय जनता पार्टीने गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांचीच पुन्हा नियुक्ती केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने 99 जागा मिळवत बहुमत मिळवले आणि सलग सहाव्यांदा सत्ता स्थापन करण्याचा दावा केला.
  • गुजरातचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उलटसुलट चर्चा होत होत्या, परंतु केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा केली आणि चर्चांना विराम दिला.
  • विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचीच नव्याने मुख्यमंत्रीपदी नेमणूक होईल अशी अटकळ होती. परंतु, गेल्या निवडणुकीच्या 116 जागांच्या तुलनेत यंदा कमी जागा आल्या, तसेच अमित शाह यांनी ठेवलेले 150 जागांचे लक्ष्यही फारच दूर राहिले या पार्श्वभूमीवर रुपाणींना बगल देऊन अन्य कुणाला संधी दिली जाते की काय अशी अटकळ व्यक्त होत होती.

बँकांविषयी अफवेवर विश्वास ठेवू नये आरबीआयकडून स्पष्ट :

  • रिझर्व्ह बँकेकडून बँक ऑफ इंडियाबरोबर इतर काही बँका बंद केल्या जाणार असल्याची अफवा सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे. मात्र समाज माध्यमांवरील या अफवांवर विश्वास ठेऊ नका अशा संदर्भातील स्पष्टीकरण आरबीआयने दिले आहे.
  • बँक ऑफ इंडियासहीत इतर नऊ सरकारी बँकांना ‘प्रॉम्ट करेक्टिव्ह अॅक्शन’च्या यादीत टाकण्यात आले आहे. यामुळे संबंधित बँकांच्या रोजच्या व्यवहारांवर काहीच परिणाम होणार नसल्याने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आरबीआयने केले आहे.
  • आरबीआयला समाज माध्यमे तसेच इतर माध्यमांमधून काही चुकीची माहिती पसरत असल्याचे समजले असून त्याच संदर्भात हे स्पष्टीकरण असल्याचे आरबीयाने सांगितले. या व्हायरल होत असलेल्या चुकीच्या माहितीनुसार काही सरकारी बँक बंद केल्या जाणार असल्याचे मेसेजस फॉरवर्ड केले जात आहेत. प्रॉम्ट करेक्टिव अॅक्शनचा संदर्भ देऊन ही माहिती पसरवण्यात येत असली तरी या माहितीमध्ये काहीच तथ्य नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

देशातील सर्वोत्कृष्ट दहा जिल्ह्याधिकार्‍यांची यादी जाहीर :

  • नुकतेच ‘द बेटर इंडिया’ या वेबसाईटने संपूर्ण भारतातून प्रशासकीय क्षेत्रातील ज्या अधिका-यांनी देशाच्या हितासाठी व जनतेच्या भल्यासाठी नाविन्यपूर्ण व वेगळे उपक्रम राबवून वर्षभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकार-यांच्या कामाचा आढावा घेतला. यातून ‘सर्वात्कृष्ट दहा आयएएस अधिकारी’ निवडले.
  • तसेच यात महाराष्ट्र राज्याची कन्या आणि तामिळनाडू राज्यातील सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांचा समावेश आहे.
  • सेलम जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांनी सेलम जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचा त्यांचा संकल्प असून त्यांची अंमलबजावणी केली आहे.
  • भाजीभाकरे यांनी सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते स्वाक्षरी असलेली बॅट देऊन ‘स्वच्छता चॅम्पियन’ म्हणुन सन्मानित करण्यात आले होते.
  • सर्वात्कृष्ट दहा जिल्हाधिकारी

    रोहिणी भाजीभाकरे (तामिळनाडू), प्रसन्नाथ नायर (केरळ), पोमा तुडू (ओडिसा), सुरेंद्रकुमार सोंलकी (राजस्थान), मिर मोहम्मद अल्ली (केरळ), पारिकिपंडला नरहरी (मध्य प्रदेश), भारती होळकरी (तेलगंणा), पीएस प्रद्युम्न (आंध्रप्रदेश), सौरभ कुमार (छत्तीसगढ), रोनाल्ड रोज (तेलंगणा).

दिनविशेष :

  • 23 डिसेंबर 1690 मध्ये मणिपूर साम्राज्याचे सम्राट ‘पामेबा’ यांचा जन्म झाला.
  • सन 1940 मध्ये 23 डिसेंबर रोजी वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
  • ‘बिजन कुमार मुखरेजा’ यांनी 23 डिसेंबर 1954 मध्ये भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • 23 डिसेंबर 2000 मध्ये केंद्र सरकारने कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास मंजुरी दिली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ

{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/Ax3s2hGT0F0?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.