Current Affairs (चालू घडामोडी) of 22 January 2015 For MPSC Exams

Current Affairs (चालू घडामोडी) 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. ‘स्वच्छ भारत’साठी मोबाइल, इंटरनेटची बिले वाढणार
2. सरकार करणार देशभर सर्वेक्षण
3. केंद्रीय अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीला सादर होणार
4. ‘एफआयआर’ ऑनलाइन उपलब्ध होणार
5.  दिनविशेष 

 

 

 

 

स्वच्छ भारत’साठी मोबाइल, इंटरनेटची बिले वाढणार :

 • देश स्वच्छ दिसावा यासाठी मोबाइल आणि इंटरनेट यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

 • कारण स्वच्छ भारत मोहिमेला निधि उपलब्ध करून देण्यासाठी सरकार टेलिकॉम सेवांवर उपकर (सेस) लावण्याच्या विचारात आहेत.

 • अशाप्रकारचा कर टेलिकॉम सेवांवर लावण्याच्या बाबतीतील शक्यता पडताळण्याच्या दृष्टीने सरकारने अटॉर्नि जनरलकडून यासंदर्भातली मत मागवले आहेत.

 • स्पेक्ट्रम आकारणीअंतर्गत दूरसंचार कायद्यांतर्गत सरकारी आदेश काढून स्वच्छ भारत मोहिमेसाठी उपकर लावता येईल का याविषयी दूरसंचार विभागाणे अटॉर्नि जनरलकडून मत मागवले आहे.

 • स्वच्छ भारत मोहिमेसाठी पैसा उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपकर न लावण्याचा कायदेशीर सल्ला त्यांनी दिला आहे.

 • अशा प्रकारचा कर आकारल्यास कलम 265 अंतर्गत घटनाबाहय ठरेल असे मत अटॉर्नि जनरलने व्यक्त केले.

सरकार करणार देशभर सर्वेक्षण :

 • ‘टाइमपास‘ म्हणून भारतीय काय करतात या संदर्भात सरकार देशभर सर्वेक्षण करणार आहे.
 • भारतीयांच्या झोपेच्या वेळा, शाळा महाविद्यालयातील मुले-मुली किती वेळ अभ्यासाला देतात, घरकाम करणार्‍या महिलेला घरकाम करून स्वतःसाठी कितपत वेळ मिळतो, भारतीय नागरिक दिवसातील 24 तास कशे घालवतात याचे सरकार सर्वेक्षण करणार आहे.
 • अर्थतज्ञ एस.आर.हशीम यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
 • नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन (एनएसएसओ) किंवा दुसर्‍या एखाद्या संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण होणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीला सादर होणार :

 • केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकल्प पुढच्या महिन्यात 28 फेब्रुवारीला सादर करणार आहे.
 • सरकार आणि सर्वेक्षण अहवाल 27 फेब्रुवारी तर रेल्वे अर्थसंकल्प 26 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे.
 • संसदीय अर्थसंकल्प अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 20 मार्च पर्यंत चालेल.
 • दुसरे सत्र 20 एप्रिलपासून ते 8 मेपर्यंत चालेल.

‘एफआयआर’ ऑनलाइन उपलब्ध होणार :

 • एफआयआर‘ (प्रथम खबरी अहवाल)हा दस्तऐवजी ऑनलाइन पाहण्याची, डाऊनलोड करण्याची व प्रिंटआऊट काढण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्यायची की नाही याबद्दल 10 आठवड्यांत धोरणात्मक निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यायमूर्ती अरुण चौधरी आणि प्रदीप देशमुख यांना दिलेत.
 • उच्च न्यायालयचाही एक निर्णय आहे त्यात ‘एफआयआर’ची प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देता येवू शकते.

दिनविशेष :

 • 1963 – डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालयाची स्थापना.
 • 1972 – राजनीतीज्ञ आणि शिक्षणतज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.