Current Affairs of 21 March 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (21 मार्च 2018)
राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण :
- संगीतकार इलियाराजा यांच्यासह 40 हून अधिक जणांना 20 मार्च रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात संगीतकार इलायराजा, शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी. परमेश्वरन यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.
- राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
- यंदा देशभरातील 85 जणांना विविध पद्म पुरस्कार जाहीर झाले. (यामध्ये विभागून दिलेल्या दोन पुरस्कारांचा समावेश) पद्म पुरस्कारांमध्ये 3 जणांना पद्मविभूषण, 9 जणांना पद्मभूषण आणि 73 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
- तसेच यामध्ये 14 महिलांचा तर 16 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. 3 जणांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापैकी 43 मान्यवरांना पुरस्कार वितरित करण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
टाटा मोटर्सकडून वाहनांच्या किंमतीत वाढ :
- टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमती 60 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या मालाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्याने कंपनीचा उत्पादन खर्च वाढत आहे. हा खर्च भरुन काढण्यासाठी वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. नवीन किंमती 1 एप्रिल, 2018 पासून लागू होणार आहेत.
- ‘आम्ही आमच्या प्रवासी वाहनांच्या किंमती 60 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन खर्च वाढल्याने नुकसान भरुन काढण्यासाठी वाहनांच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. मात्र किंमती वाढविल्यामुळे आमच्या विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय येत्या वर्षात टिआगो, टिगोर आणि नेक्सन या नवीन दमाच्या वाहनांची चांगली विक्री होण्याची अपेक्षा आहे’, अशी माहिती टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मयांक पारीख यांनी दिली. या महिन्यात ऑडीने देखील वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यांनी वाहनांच्या किंमीती 1 लाख रुपये ते 9 लाख रुपयांपर्यंत वाढविल्या आहेत.
मकरंद अनासपुरे यांना दमाणी-पटेल पुरस्कार जाहीर :
- यंदाचा दमाणी-पटेल प्रतिष्ठानच्या कर्मयोगी पुरस्कार पद्मश्री डॉ. गणेश देवी व अभिनेते मकरंद अनासपुरे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रेमरतन दमाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान आहे, अशांना दमाणी-पटेल प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी कर्मयोगी पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व एकावन्न हजार रुपये रोख असे आहे.
- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हा सोहळा 29 मार्च रोजी सायंकाळी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार आहे.
राज बब्बर यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा :
- काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी 20 मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राज बब्बर यांनी राजीनाम्याचे कारण दिलेले नाही. मात्र, पक्षनेतृत्वाने अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षात तरुणांना संधी दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. यानंतर गोव्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी राजीनामा दिला होता. तर गुजरातचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनी देखील राजीनामा दिला. सोलंकी यांनी राजीनाम्यामागे परदेश यात्रेचे कारण सांगितले होते.
- तसेच या दोघांच्या राजीनाम्यानंतर राज बब्बर यांनी देखील राजीनामा दिला. पक्षनेतृत्वाने राजीनामा स्वीकारेपर्यंत राज बब्बरच उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्षपदाची धूरा सांभाळतील.
तिहेरी तलाक विरोधात अमळनेरला मूकमोर्चा :
- अमळनेर (जळगाव) तिहेरी तलाक विधेयक मागे घेण्यात यावे यासाठी 20 मार्च रोजी येथील मुस्लिम महिलांनी शहरातून मूकमोर्चा काढला. रणरणत्या उन्हात काढण्यात आलेल्या या मोर्चात सुमारे पाच हजार महिला व विद्यार्थिनी सहभागी झाल्या. प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
- जाने चिस्थिया बहुउद्देशीय संस्था संचलित सुन्नी दारुल कझा यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. महिलासह शाळकरी विद्यार्थिनीही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. निवेदनात म्हटले आहे, की लोकसभेत पारीत झालेला तिहेरी तलाक विधेयक भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे आहे. अल्पसंख्याकाच्या हितासाठी ही बाब धोकादायक आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला धर्मानुसार जगण्याचा अधिकार दिला असून यात सरकारने हस्तक्षेप करू नये असेही यात म्हटले आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून मोर्चाला सुरवात झाली. दगडी दरवाजा, बाले मियॉं चौक, बस स्थानक, महाराणा प्रताप चौक मार्गाने प्रांताधिकारी कार्यालयात मोर्चा धडकला.
शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर :
- मोहोळ तालुक्यातील (जि. सोलापूर) विविध शाळामधील चौदा शिक्षकांना तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाले असून, येत्या बावीस मार्च रोजी मोहोळ येथे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते त्याचे वितरण होणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी दिली.
- या संदर्भात अधिक माहिती देताना फडके म्हणाले, शिक्षण विभागाने पुरस्कारासाठी वेगवेगळे निकष लावले होते त्यात समाविष्ट होणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव पुरस्कारा साठी पाठविले होते निकषात शंभर टक्के गुणवत्ता सामाजिक कार्यात सहभाग शाळा आय एस ओ ज्ञान रचनावाद मुलांचा स्पर्धा परिक्षेतील सहभाग याचा समावेश आहे, तसेच शासनाने मध्यंतरी दिपसंभ परिक्षा घेतली होती त्यात ही चौघांनी यश प्राप्त केले आहे.
दिनविशेष :
- देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक ‘मानवेंद्रनाथ रॉय’ यांचा जन्म 21 मार्च 1887 मध्ये झाला.
- 21 मार्च 1916 मध्ये भारतरत्न शहनाईवादक ‘बिस्मिल्ला खान’ यांचा जन्म झाला.
- सन 1977 मध्ये भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
- 21 मार्च 2003 मध्ये जळगाव महानगरपालीकेची स्थापना झाली.
- सोशल मीडिया साइट ‘ट्विटर’ची स्थापना 21 मार्च 2006 रोजी झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा