Current Affairs of 21 June 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी 21 जून 2015
नरेंद्र मोदी महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पासह अन्य प्रकल्पांचे उद्घाटन करणार :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 जून रोजी महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पासह अन्य काही प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहे.
- यावेळी देशभरातील निवडक 500 नागरी संस्थांच्या प्रमुखांना मोदी मार्गदर्शन करणार आहेत.
- तसेच स्मार्ट सिटीज् मिशन, अटल मिशन फॉर रिज्युव्हेंशन ऍण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) तसेच प्रधान मंत्री आवाज योजना (पीएमएवाय) अशा तीन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
- हे प्रकल्प चार लाख कोटी रुपयांचे आहेत.
Must Read (नक्की वाचा):
डॉ.संजय देशमुख हे मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू :
- मुंबई विद्यापीठाच्या जीवविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय देशमुख हे मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू असतील.
- राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव यांनी देशमुख यांची नियुक्ती केली.
- तसेच कुलगुरू डॉ.राजन वेळूकर 6 जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
- मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु नियुक्त करण्यासाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती नेमली होती.
- त्यांचा कार्यकाळ 7 जुलैपासून पाच वर्षांसाठी असेल.
- डॉ.देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून 1986 मध्ये एमएस्सी पदवी संपादन केली.
दिनविशेष :
- 21 जून – आंतरराष्ट्रीय योगा दिन.
- 1906 – अ.भा. कॉग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांचे निधन.