Current Affairs of 20 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 सप्टेंबर 2017)

चालू घडामोडी (20 सप्टेंबर 2017)

देशातील सर्वाधिक प्रकल्प सध्या महाराष्ट्रामध्ये :

 • रस्ते, वीज, सिंचन आणि वाहतुकीसारख्या पायाभूत सुविधांचे देशातील सर्वाधिक प्रकल्प सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असल्याचे आणि त्यासाठी जवळपास सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असल्याची माहिती केंद्र सरकारचा ‘थिंक टँक’ असलेल्या ‘निती’ आयोगाने प्रसिद्ध केली.
 • महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान आदी राज्ये खूप मागे पडली असताना उत्तर प्रदेशसारखे कथित मागास आणि अरुणाचल प्रदेशसारख्या सीमावर्ती राज्याने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.
 • ‘देशात एकूण 8 हजार 367 पायाभूत प्रकल्पांची कामे चालू असून त्यांची किंमत 50 लाख 58 हजार 722 कोटी इतकी आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 1097 प्रकल्पांची कामे चालू असून त्यांच्यासाठी तब्बल 5 लाख 97 हजार 319 कोटी रुपये खर्च केले जात आहे. देशातील एकूण प्रकल्पांच्या संख्येमध्ये आणि खर्चामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. या प्रकल्पांतील गुंतवणुकीचा विचार केल्यास देशामध्ये एकटय़ा महाराष्ट्राचा हिस्सा 11.8 टक्क्यांचा आहे,’ असे ‘निती’ आयोगाने नमूद केले.
 • देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीमध्ये (एफडीआय) महाराष्ट्राचा हिस्सा जवळपास निम्मा असल्याचे आकडेवारी मध्यंतरी उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली होती. त्या पाश्र्वभूमीवर हा अहवाल आला आहे.

30 सप्टेंबरपासून सहा बँकांचे चेकबुक बंद होणार :

 • देशातील सर्वात मोठी बँक असा लौकिक असलेल्या एसबीआयने (SBI) आपल्या सहकारी बँकांच्या ग्राहकांना नव्या चेकबुकसाठी अर्ज करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
 • 30 सप्टेंबरपासून आधीचे चेक आणि आयएफएस कोड अवैध मानला जाईल असेही बँकेने स्पष्ट केले आहे.
 • ‘स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर’, ‘स्टेट बँक ऑफ हैदराबाद’, ‘स्टेट बँक ऑफ म्हैसूर’, ‘स्टेट बँक ऑफ पटियाला’, ‘स्टेट बँक ऑफ त्रावणकोर’ आणि ‘भारतीय महिला बँक’ या बँकांचे विलीनकरण एसबीआयमध्ये करण्यात आले आहे. या सहाही बँकांचे आधीचे चेकबुक बंद होणार आहेत.
 • तसेच या बँकांमध्ये खाती असणाऱ्या सगळ्या ग्राहकांनी लवकरात लवकर नव्या चेकबुकसाठी अर्ज करावा अशी सूचना एसबीआयने केली आहे.
 • नव्या चेकबुकसाठी ग्राहकांनी थेट बँकेत अर्ज करावा किंवा इंटरनेट बँकिंग, एटीएम किंवा मोबाईल बँकिंगचा आधार घेऊन अर्ज करावा असेही एसबीआयने स्पष्ट केले आहे.

दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास सरकारी नोकरीस अपात्र :

 • आसाम सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नवा कायदा मंजूर केला आहे. या नव्या कायद्यामुळे दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायत आणि नगरपालिकेची निवडणूक लढवता येणार आहे.
 • तसेच यासोबत दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे.
 • आसामच्या विधानसभेत मोठ्या वादळी चर्चेनंतर या विधेयकाला मंजुरी देण्यात आली.
 • आसामचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले होते.
 • सरकारी नोकरीच्या नियमांमध्ये लवकरच नव्या कायद्यानुसार बदल करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
 • नव्या नियमानुसार, लग्न करताना किमान वयोमर्यादेचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाही सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्यात येईल.
 • लोकसंख्येच्या तुलनेत रोजगारांत वाढ होत नसल्याने आसामी जनतेसमोर अनेक आर्थिक समस्या आहेत. त्यामुळेच आता लोकसंख्येला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पाकिस्तान म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवाद :

 • संयुक्त राष्ट्र संघात भारताने पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला लक्ष्य केले.
 • पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा चेहरा असल्याचे म्हणत भारताचे राजनैतिक अधिकारी डॉ. विष्णू रेड्डी यांनी पाकिस्तानवर शरसंधान साधले. पाकिस्तानने दहशतवाद्यांची फॅक्टरी बंद करावी, असेही त्यांनी सुनावले.
 • जिनिव्हामध्ये सध्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेचे 36 वे संमेलन सुरु आहे. यामध्ये भारताकडून दहशतवाद आणि काश्मीर हे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित करण्यात आले.
 • पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई असावी, अशी मागणी भारताकडून करण्यात आली.
 • ‘जम्मू काश्मीर सीमेवरील दहशतवादी कारवायांचे सर्व पुरावे पाकिस्तानला देण्यात आले आहेत. मात्र पाकिस्तानकडून या मुद्यांकडे कानाडोळा केला जात आहे. दहशतवाद्यांविरोधातील कारवाई कशी टाळता येईल, याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरु आहेत. पाकव्याप्त काश्मीरला दहशतवादाचे केंद्र बनवण्यात आले आहे,’ अशा शब्दांमध्ये भारताने पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणला.

दिनविशेष :

 • प्रसिद्ध मराठी पत्रकार नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ “नानासाहेब परुळेकर” यांचा जन्म 20 सप्टेंबर 1897 मध्ये झाला.
 • चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक “द.न. गोखले” यांचा जन्म 20 सप्टेंबर 1922 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.