Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 20 December 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 डिसेंबर 2016)

चालू घडामोडी (20 डिसेंबर 2016)

भारताचा दुसरा त्रिशतकवीर करुण नायर :

 • इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात 19 डिसेंबर रोजी कर्नाटकाच्या करुण नायर याने नाबाद त्रिशतकी खेळी करण्याची कामगिरी केली.
 • कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने दोन वेळा त्रिशतकी खेळी केल्या आहेत.
 • इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यातील चौथा दिवस भारतीय विक्रमांचा ठरला.
 • नायरच्या त्रिशतकी खेळीनंतर 7 बाद 759 धावसंख्येवर कोहलीने भारताचा डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
 • करुण नायरने देखील भारताचा सर्वात तरुण त्रिशतकवीर होण्याचा मान मिळविला. सेहवागने (25 वर्षे 160 दिवस) 2004 मध्ये पहिले त्रिशतक ठोकले होते.
 • कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी भारताची 9 बाद 726 ही सर्वोच्च धावसंख्या होती. श्रीलंकेविरुद्ध 2009 मध्ये मुंबईत भारताने ही कामगिरी केली होती.

स्टेफनी डेल वॅले ठरली 2016 ची विश्वसुंदरी :

 • पोर्टो रिको या कॅरेबियन समुद्रातील छोट्याशा व्दिपसमूहावरील 19 वर्षांची स्टेफनी डेल वॅले हिची 18 डिसेंबर रोजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘विश्वसुंदरी 2016’ म्हणून निवड झाली.
 • डॉमिनिकन रिपब्लिकची यारित्झा मिग्युलिना रेयेस रमिरेज व इंडोनेशियाची नताशा मॅन्युएला या अनुक्रमे ‘फर्स्ट रनर-अप’ ‘सेकंड रनर-अप’ ठरल्या.
 • 1951 मध्ये ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या या सर्वात जुन्या जागतिक सौंदर्य स्पर्धेचे यंदाचे 66 वे वर्ष होते.
 • ब्रिटनमधील एमजीएम नॅशनल हार्बरमध्ये झालेल्या अंतिम फेरीत परीक्षकांनी जगभरातील 100 हून अधिक स्पर्धकांमधून स्टेफनीची ‘मिस वर्ल्ड’ म्हणून निवड केली.

भारतीय हॉकी महिला संघ ‘अ’ गटात अव्वल :

 • भारताच्या पुरुष ज्युनिअर संघाने विश्वविजेतेपदाची भेट दिल्यानंतर भारताच्या 18 वर्षांखालील महिला संघानेही चमकदार खेळ करताना 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले.
 • भारताच्या महिलांनी आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात मलेशियाचा 3-1 असा पराभव केला.
 • सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध भूमिका घेत एकमेकांच्या आक्रमणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.
 • मात्र, भारतीय महिलांनी आघाडी मिळवल्यानंतर आपली पकड अधिक घट्ट करताना मलेशियाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.
 • दरम्यान, मलेशियाला सामन्यातील पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु, भारतीयांनी उत्कृष्ट बचाव करताना मलेशियाला रोखले.

बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी ठरलेला यासिन भटकळला मृत्युदंड :

 • हैदराबाद येथील दिलसुख नगरमध्ये 2013 साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकळ व त्याच्या चार साथीदारांना, पाच विशेष एनआयए न्यायालयाने 19 डिसेंबर रोजी फाशीची शिक्षा सुनावली.
 • तसेच या बॉम्बस्फोटांमध्ये कोणार्क थिएटर व दिलसुखनगर येथे झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये 17 जण मरण पावले होते आणि 131 जण जखमी झाले होते.
 • एनआयए न्यायालयाने या बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीनंतर 13 डिसेंबर रोजी यासिन भटकळसह पाच जणांना दोषी ठरवले होते.

दिनविशेष :

 • रशियात पहिल्या गुप्त पोलिस संस्थेची (चेका) स्थापना 20 डिसेंबर 1917 रोजी झाली.
 • 20 डिसेंबर 1956 हा संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World