Current Affairs of 2 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 सप्टेंबर 2017)

चालू घडामोडी (2 सप्टेंबर 2017)

विदर्भातील सर्वात उंच तिरंग्याच्या प्रस्तावाला नगरपरिषदेची मंजुरी :

 • शहराच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर विदर्भातील सर्वात उंच (206 फूट) तिरंगा झेंडा (राष्ट्रध्वज) लावण्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
 • देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नगरपरिषदेने स्वीकारली आहे. त्यात पालिका होमगार्ड, एनसीसी बटालियनची मदत घेऊ शकते.
 • लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून हा राष्ट्रध्वज लावला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी खासदार निधीतून 52 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
 • तसेच याला प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळाली असून सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी हा विषय पटलावर आणला. त्याला सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शवून ठराव मंजूर केला.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर :

 • राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा 1 सप्टेंबर रोजी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील प्राथमिकच्या 17 व माध्यमिकच्या 8 अशा एकूण 25 शिक्षकांचा समावेश आहे.
 • 2016-17 या वर्षात मुंबईचे नागोराव तायडेतृप्ती हातिस्कर यांची निवड झाली आहे़.
 • राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये प्राथमिक विशेष शिक्षक पुरस्कार अर्चना दळवी आणि सुरेश धारराव यांना जाहीर झाला.
 • तसेच माध्यमिक विभागामध्ये माध्यमिक विशेष शिक्षक पुरस्कार मीनल सांगोले यांना जाहीर झाला.

शाळांना स्वच्छता विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार :

 • मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे वर्ष 2016-17 साठी देशभरातील सर्व सरकारी शाळांसाठी स्वच्छता विद्यालयाची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
 • स्वच्छतेच्या आदर्श मानदंडांची कसोशीने अमलबजावणी करणा-या देशातल्या 172 शाळांचा या स्पर्धेत पुरस्कार व प्रशस्तीपत्राने सन्मान करण्यात आला.
 • तसेच पुरस्कारप्राप्त शाळांमधे महाराष्ट्रातल्या 15 शाळांचा समावेश आहे.
 • मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते विजेत्या शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

  देशभरातल्या 2 लाख 68 हजार शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विजेत्या शाळांना मिळालेल्या पुरस्काराचे 50 हजार रुपये व प्रशस्तीपत्र असे स्वरूप आहे.

 • देशातील 3 राज्ये, 11 जिल्हे व 172 शाळांना स्वच्छतेबाबत विशेष परिश्रम घेतल्याबद्दल या सोहळयात गौरवण्यात आले.

दिनविशेष :

 • वि.स. खांडेकर विष्णू सखाराम खांडेकर (19 जानेवारी 1889 (जन्मदिन) – 2 सप्टेंबर 1976 (स्मृतीदिन)) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. आपल्या आयुष्यात त्यांनी 16 कादंबर्‍या, 6 नाटके, जवळपास 250 ललितलेख, 100 निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.