Current Affairs of 2 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 सप्टेंबर 2016)

चालू घडामोडी (2 सप्टेंबर 2016)

दूरसंचार क्षेत्रात रिलायन्सची ‘जिओ’गिरी :

 • दूरसंचार क्षेत्रात खळबळ माजवणारी ‘रिलायन्स जिओ’ योजना लाँच करत या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जाहीर केले.
 • डिजिटल क्षेत्रात रिलायन्सने टाकलेले हे पाऊल म्हणजे नवी ‘जिओ’गिरी मानली जात आहे.
 • ‘जिओ’अंतर्गत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देतानाच अंबानी यांनी भारतातील मोबाइल वापराची परिभाषाच बदलणार असल्याचे सांगितले.
 • अंबानी म्हणाले की, संपूर्ण जग डिजिटल होत आहे. यात भारताला मागे राहू दिले जाणार नाही. जिओ हा केवळ व्यवसाय नाही. या माध्यमातून भारतीयांचे जीवन समृद्ध बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
 • जियोच्या ग्राहकांसाठी 5 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या काळात ‘मोफत वेलकम ऑफर’ची घोषणा या वेळी करण्यात आली.
 • रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या एक तासाच्या भाषणात अंबानी यांनी कमीतकमी कालावधीत जिओच्या 10 कोटी ग्राहकांचे लक्ष्य ठेवले आहे.

जगातील सर्वात वयस्कर पक्षी काकाकुवा :

 • जगातील सर्व पक्ष्यांच्या तुलनेत सर्वाधिक जास्त म्हणजे 83 वर्षे जगणा-या काकाकुवा या पक्ष्याचा (दि.29) रोजी मृत्यू झाला.
 • जगातील सर्वात वयस्कर पक्षी म्हणून काकाकुवा पक्ष्याकडे पाहिजे जात होते.
 • शिकागो येथील प्रसिद्ध असलेल्या ब्रूकफिल्ड प्राणिसंग्रहालयात काकाकुवा पक्ष्याचा मृत्यू झाला.  
 • प्राणिसंग्रहालयात काककुवा पक्ष्याला कुकी या नावाने सर्वजण ओळखत होते.
 • लाल व पिवळा तुरा असलेला सफेद गुलाबी रंगाचा कूकी हा अवघ्या एक वर्षाचा असताना ऑस्ट्रेलियातील तारोंगा प्राणिसंग्रहालयातून आणले होते.
 • काकाकुवा पक्ष्याबद्दल माहिती –
 • काकाकुवा हा सिट्टॅसिडी कुलातील मोठ्या आकाराचा पोपट आहे. हा उष्णकटिबंध प्रदेशांत आढळणारा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव कॅकॅटोई गॅलेरिटा आहे.
 • तसेच या पक्ष्याचे काकाकुवा हे नाव मूळ ‘काकातुआ’ या मलेशियन नावापासून आले आहे.
 • मलेशिया, इंडोनेशिया, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया, न्यूगिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील बर्‍याच बेटांवर हा पक्षी आढळतो.
 • ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियात याच्या अकरा जाती आहेत. त्यापैकी पिवळसर तुरा असलेले पांढर्‍या रंगाचे काकाकुवा पक्षी मोठ्या संख्येने आढळतात.

रेल्वे प्रवाशांना दहा लाखांचा विमा :

 • रेल्वे तिकिटाची ऑनलाइन नोंदणी करताना केवळ 92 पैसे हप्ता भरून दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याच्या योजनेला (दि.1) प्रारंभ झाला.
 • ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर रेल्वे तिकिटाची नोंदणी करताना 92 पैशांचा हप्ता भरून दहा लाख रुपयांचे प्रवासी विमा संरक्षण मिळविण्याचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 • रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात तिकीट नोंदणी करताना प्रवाशांना विमा संरक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.
 • सर्व प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध असणार आहे, मात्र उपनगरी प्रवाशांना यातून वगळण्यात आले आहे.
 • तसेच हे विमा संरक्षण पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आणि परदेशी नागरिकांना लागू असणार नाही.
 • ऑनलाइन तिकीट नोंदणी करणाऱ्या सर्व प्रवाशांना याचा फायदा मिळेल.

परदेशी गुंतवणूकदारांना मिळणार भारताचा रहिवासी परवाना :

 • भारतामध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना ‘भारतीय रहिवासी’ म्हणून दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे.
 • ठराविक मर्यादेपर्यंत गुंतवणूक केल्यास त्यांना व्हिसा, मालमत्ता खरेदी हक्क, कुटुंबियांना रोजगार इत्यादी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
 • याविषयी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून विस्तृत धोरण तयार करण्यात आले आहे.
 • परदेशातून अधिकाधिक निधी आकर्षित करुन मेक इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
 • याअंतर्गत परदेशी गुंतवणूकदारांसाठी व्हिसाचे नियम सुलभ केले जाणार असून त्यांच्या कुटुंबियांनादेखील नोकऱ्या/रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
 • तसेच याकरिता नियमांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. सुरुवातीला गुंतवणूकदारांना दहा वर्षांकरिता रहिवासी परवाना दिला जाईल. त्यानंतर ही मर्यादा वाढविली जाऊ शकते.

‘नासा’ने शोधले सर्वांत दूरवरील आकाशगंगा :

 • अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या शास्त्रज्ञांना पृथ्वीपासून 11.1 अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेला आकाशगंगांचा पुंजका आढळला आहे.
 • शास्त्रज्ञांना आढळलेल्या या आतापर्यंत सर्वांत लांबवरच्या आकाशगंगा आहेत.
 • ‘नासा’च्या चंद्रा एक्‍स रे ऑब्झर्व्हेटरी आणि इतर काही दुर्बिणींच्या मदतीने आकाशगंगांचा हा पुंजका सापडला आहे.
 • तसेच या पुंजक्‍यातील आकाशगंगा 70 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाल्या असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
 • दुर्बिणीने पकडलेली प्रकाशकिरणे ही आकाशगंगेच्या जन्मानंतर लगेचचीच असल्याचाही अंदाज आहे. या पुंजक्‍याच्या सखोल अभ्यासानंतर विश्‍वाच्या उत्क्रांतीबद्दल नवी माहिती मिळण्याची दाट शक्‍यता असल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे.
 • आकाशगंगेच्या या पुंजक्‍याला ‘सीएलजे 1001+0220’ असे नाव देण्यात आले आहे.
 • ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार, या पुंजक्‍याच्या केंद्रस्थानी 11 प्रचंड आकाशगंगा असून, त्यातील नऊ आकाशगंगांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर नवे तारे जन्म घेत आहेत. हे प्रमाण दरवर्षी तीन हजार सूर्य निर्माण होण्यासारखे आहे.
 • आकाशगंगांच्या इतर पुंजक्‍यांच्या मानाने केंद्रस्थानी तारे निर्माण होण्याचे हे प्रमाण प्रचंड आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.