Current Affairs of 2 March 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 मार्च 2017)

चालू घडामोडी (2 मार्च 2017)

स्वाधीन क्षत्रिय पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त :

  • पहिल्या राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी 1 मार्च रोजी शपथ घेतली.
  • राज्यपालांनी शपथविधीसाठी प्राधिकृत केलेले लोकायुक्त एम.एल. टहलियानी यांनी क्षत्रिय यांना शपथ दिली.
  • मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी नेमणुकीची अधिसूचना आणि राज्यपालांनी लोकायुक्तांना प्राधिकृत केलेल्या पत्राचे वाचन केले.
  • आयुक्तपदाचा कालावधी 5 वर्षांचा असणार आहे. शपथविधी सोहळ्यास राज्य मुख्य माहिती आयुक्त डॉ. रत्नाकर गायकवाड, माजी मुख्य माहिती आयुक्त सुरेश जोशी उपस्थित होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 मार्च 2017)

ओडिसामध्ये स्वदेशी लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

  • बालासोर (ओडिशा) समद्रसपाटीपासून ठराविक उंचीवरून मारा करणाऱ्या शत्रुच्या कोणत्याही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा लक्ष्यभेद करण्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने 1 मार्च रोजी यशस्वीपणे चाचणी घेतली.
  • देशांतर्गत विकसित केलेले संपूर्ण स्वदेशी बनावटीचे हे स्वानातीत क्षेपणास्त्र आहे. भारताने एका महिन्यात दुसऱ्यांदा या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा सज्ज करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली.
  • ‘क्षेपणास्त्राचे उड्डाण झाल्यानंतर लक्ष्यभेदी यंत्रणेची विविध परिमाणे तपासण्यासाठी हे प्रक्षेपक चाचणी करण्यात आली,’ असे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
  • येथून जवळ असलेल्या चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या (ITR) प्रक्षेपक केंद्र क्रमांक तीनमधून एक पृथ्वी क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते. त्या क्षेपणास्त्राविरोधात ही नवी लक्ष्यभेदी यंत्रणा तपासण्यात आली.

महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार जाहीर :

  • प्रख्यात अभिनेत्री तेजश्री प्रधान, दिग्गज नाटय निर्मात्या लता नार्वेकर, हास्य योगाच्या मास्टर ट्रेनर अदिती वाघमारे, विश्वविख्यात गिर्यारोहक कृष्णा पाटील वेठबिगारमुक्ती व आदिवासी कल्याणार्थ गेली अडीच दशके लढा देणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा विद्युल्लता पंडित, स्त्री हक्कासाठी झुंजणाऱ्या तृप्ती देसाई, मीरा भार्इंदरच्या महापौर गीता जैन, वैद्यकीय क्षेत्रात असीम कामगिरी बजाविणाऱ्या डॉ. लीना गुप्ता आदींसह चौदा कर्तृत्वान गुणवतींना महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर घोषित झाले आहेत.
  • महाराष्ट्र प्रबोधन जीवन गौरव पुरस्कार पुण्याच्या मॅग्नमओपसचे चेअरमन व भारतातील लक्षावधी स्त्री भ्रूण हत्या रोखणारे गिरीष लाड यांना जाहीर झाला आहे.
  • नाशिक येथील आयकॉन फाऊंडेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप 5000/- रूपये रोख, ट्रॉफीमानपत्र असे असून सात मार्चला सायंकाळी सहा वाजता नरीमन पॉर्इंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या रंगस्वर या सभागृहात होणाऱ्या शानदार सोहळयात ते त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान होणार आहे. हे पुरस्कारांचे 8 वे वर्ष आहे.

राज्यात नवीन विद्यापीठ कायदा लागू :

  • राज्यात नवीन विद्यापीठ कायदा 1 मार्चपासून लागू झाला आहे. संशोधन मंडळ, नवउपक्रम, नवसंशोधन मंडळ, सल्लागार परिषद यांमधील उद्योग व संशोधन जगतातील तज्ज्ञांच्या सहभागाने विद्यापीठ शिक्षण अद्ययावत होईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
  • विद्यार्थी स्पर्धात्मक युगात अधिक सक्षम बनेल. या कायद्यामुळे शिक्षण हे विद्यार्थी केंद्रीत होणार असून विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेमध्येही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
  • कायद्यासंदर्भातील माहितीसाठी राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरू, कुलसचिव व शिक्षण तज्ज्ञांची मुंबई येथे 3 मार्चला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
  • नवीन विद्यापीठ कायद्यामुळे विद्यापीठ प्रशासनात अनेक बदल होणार आहेत. व्यवस्थापन मंडळातील नवीन सदस्यांची निवड विद्यापीठाला 31 ऑगस्टपर्यंत करावी लागणार आहे.
  • तसेच व्यवस्थापन मंडळात विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून, विद्यार्थी महाविद्यालयीन जीवनापासूनच भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेशी जोडले जावेत यासाठी 1994 पासून रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणुका आता या कायद्यामुळे होणार आहेत.

विनोदी लेखक तारक मेहता यांचे निधन :

  • भाषेचा दर्जा कधीही घसरू न देता नर्मविनोदी भाषेत समाजातील प्रवृत्तींवर बोट ठेवून रसिकांना हसविणारे प्रसिद्ध विनोदी लेखक तारक मेहता यांचे 1 मार्च रोजी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.
  • तसेच त्यांच्या लेखनावर आधारित ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही कौटुंबिक विनोदी मालिका लोकप्रिय ठरली.
  • दर्जेदार व सभ्य अशा भाषावैशिष्ट्यामुळे तारक मेहता यांच्या विनोदी लेखनाचा आनंद कुटुंबासह घेता येतो. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत त्यांचे लेखन पोचले.  
  • तारक मेहता यांना ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘चित्रलेखा’ या गुजराती साप्ताहिकासाठी मार्च 1971 पासून ‘दुनिया ना उंधा चश्मा’ नावाचे स्तंभलेखन केले होते.
  • सब टीव्ही प्रसारित होणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका या लेखनावर आधारित आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग नवा मसुदा तयार करणार :

  • अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ व्हावी, गाव पातळीवर प्राथमिक उपचार केंद्र उभारावे आणि अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या हल्लोखोरांना कठोर शासन होण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग नवा मसुदा तयार करत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  • महिला आयोग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस संचलित दिव्याज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 5 मार्च रोजी ‘सक्षमा’ हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी रहाटकर यांनी ही माहिती दिली.
  • अ‍ॅसिड हल्ला पीडीतांकरिता नव्या मसुद्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सखोल अभ्यास सुरु केला आहे. येत्या तीन महिन्यात या शिफारशी तयार होऊन राज्य सरकारपुढे मांडण्यात येणार आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 मार्च 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.