Current Affairs of 2 August 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 ऑगस्ट 2017)

चालू घडामोडी (2 ऑगस्ट 2017)

औद्योगिक विकास धोरणात महाराष्ट्र अग्रेसर :

  • राज्याचे औद्योगिक विकास धोरण देशात अग्रेसर आहे. अन्य राज्याच्या तुलनेने आपण खूप पुढे आहोत. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये ज्योती बसू मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील एमआयडीसींचा आढावा घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठवले होते, यावरून आपल्या धोरणाचे यश स्पष्ट होते, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व खनिजकर्म मंत्री तसेच एमआयडीसीचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केले.
  • प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 55व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
  • या वेळी उद्योग राज्यमंत्री आणि एमआयडीसीचे उपाध्यक्ष प्रवीण पोटे-पाटील, उद्योग खात्याचे मुख्य सचिव सुनील पोरवाल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, एमआयडीसी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष जी.एस. पोपट यांचीही उपस्थिती होती.
  • तसेच या सोहळ्यात एमआयडीसी कर्मचार्‍यांच्या गुणवंत मुलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 ऑगस्ट 2017)

जलविद्युत प्रकल्पासाठी सांमजस्य करार :

  • अपारंपारिक उर्जा संमिश्र तंत्रज्ञानाचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे उभारण्यात येणार्‍या प्रकल्पाचा आणि ठाणे पालिकेच्या पाणीवितरण यंत्रणेवर जलविद्युत प्रकल्पाची उभारणी, निगा व देखभाल अशा दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.
  • सौर शहरीकरणातंर्गत कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे विविध सेवांसाठी अपारंपारिक उर्जेच्या संमिश्र तंत्रज्ञानाचा वापर करून पीपीपी तत्वावर निर्माण करण्यात येणार्‍या प्रकल्पाबाबत ठाणे महानगरपालिका आणि मे. मार्सोल सोलर प्रा.लि. या कंपनीच्या दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 550 चौरस मीटर जगातील सर्वात मोठी सौर उर्जा डिस्क बसविण्यात येणार आहे.
  • तसेच या प्रकल्पातून निर्माण होणारी उर्जा छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील विविध सेवांसाठी वापरण्यात येणार असून त्यामध्ये या प्रकल्पातील निर्माण होणार्‍या बाष्पाचा वापर करून नव्याने बनविण्यात येणार्‍या शवागृहामध्ये शीत यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
  • पाणी वितरण यंत्रणेवर जलविद्युत प्रकल्पाची उभारणी प्रकल्पाच्या सामंजस्य करारावरही यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. ठाणे पालिका मे. फ्लॅमिन्को या कंपनी दरम्यान हा करार करण्यात आला.

माजी पोलीस उपसंचालक डी.जी. वंजारा यांची आरोपमुक्तता :

  • गुजरातचे माजी पोलीस उपसंचालक डी.जी. वंजाराएम.एन. दिनेश यांची विशेष सीबीआय न्यायालयाने सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरणातून आरोपमुक्तता केली. या खटल्यामधील मुख्य आरोपीचीच विशेष न्यायालयाने आरोपमुक्तता केल्याने सीबीआयला मोठा दणका बसला आहे.
  • आयपीएस अधिकारी डी.जी. वंजारा अहमदाबादच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख होते. त्यानंतर त्यांना उपमहासंचालक करण्यात आले. तर राजस्थानमधील आयपीएस अधिकारी एम.एन. दिनेश हे गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख होते.
  • अहमदाबादेत 2005 मध्ये घडलेल्या बनावट चकमकीतील प्रमुख आरोपी म्हणून वंजारा यांचा उल्लेख सीबीआयने केला आहे. तर सोहराबुद्दिन शेखची हत्या करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकाचे नेतृत्व दिनेश यांनी केले होते. या दोघांचीही सीबीआयने निर्दोष सुटका केल्याने सीबीआयसाठी हा मोठा धक्का आहे.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष पानगढिया यांचा राजीनामा :

  • नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • नीती आयोगाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर पानगढिया अमेरिकेत शिक्षण कार्यात सहभागी होणार आहेत.
  • 31 ऑगस्ट हा पानगढिया यांचा नीती आयोगाच्या सेवेतील शेवटचा दिवस असणार आहे.
  • देशाच्या विकास प्रक्रियेची दिशा ठरवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नीती आयोगाची स्थापना केली होती.
  • पानगढिया नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. 2015 मध्ये त्यांच्याकडे नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
  • नीती आयोगाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती अरविंद पानगढिया यांनी पंतप्रधान कार्यालयाला दिली आहे. मात्र अद्याप तरी पानगढिया यांचा पंतप्रधान कार्यालयाकडून स्वीकारण्यात आलेला नाही.
  • तसेच सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आसामच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अद्याप पानगढिया यांच्या राजीनाम्यावर त्यांच्याकडून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

दिनविशेष :

  • बंगाली रसायनशास्त्रज्ञ व उद्योजक शिक्षक ‘डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय’ यांचा जन्म 2 ऑगस्ट 1861 मध्ये झाला.
  • ‘बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापन केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.