Current Affairs of 19 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 जुलै 2017)

चालू घडामोडी (19 जुलै 2017)

युवा नेमबाजांना मिळणार आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण :

 • देशात युवा नेमबाजांचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या हेतूने ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंगच्या स्पोटर्स प्रमोशन फाऊंडेशनने (जीएनएसपीएफ) आपल्या प्रोजेक्ट लीपसाठी ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टसह हातमिळवणी केली.
 • प्रोजेक्ट लीप अंतर्गत पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील शुटींग रेंजमध्ये पहिले रायफल शिबिर पार पडले.
 • तसेच यामध्ये देशातील विविध भागांतून 23 युवा प्रतिभावान नेमबाजांना आंतरराष्ट्रीय चॅम्पियन बनवण्यासाठी निवडण्यात आले. एकूण 57 नेमबाजांमधून या अव्वल 23 नेमबाजांची निवड करण्यात आली आहे.
 • निवड करण्यात आलेल्या 23 नेमबाजांमध्ये पुण्याचे सर्वाधिक 12 नेमबाज असून हैदराबाद व सिकंदराबादचे प्रत्येकी 3, जबलपूरचे दोन आणि मुंबई, भुवनेश्वर व गुजरातचे प्रत्येकी 1 नेमबाज आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 जुलै 2017)

सीए परीक्षेत राज शेठचा देशात पहिला क्रमांक :

 • ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटण्ट्स ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) परीक्षेत महाराष्ट्राने ठसा उमटवला असून डोंबिवलीच्या राज शेठ याने 800 पैकी 630 गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला. मुंबईतील कृष्णा गुप्ता याने 601 गुण मिळवून तिसरा तर कल्याणच्या सिद्धार्थ अय्यर याने 560 गुण मिळवून देशात सतरावा क्रमांक मिळविला.
 • तसेच या परीक्षेत वेल्लोरच्या अगथीस्वरन एस. याने दुसरा क्रमांक मिळविला. त्यास 602 गुण मिळाले. मे महिन्यात सीएची फायनल परीक्षा झाली होती. त्यास ग्रुप 1 घेऊन एकूण 41,373 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 5, 717 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

ब्रिटनच्या संसदीय समितीत पहिल्या महिला प्रीत कौर गिल :

 • ब्रिटनच्या संसदीय निवड समितीमध्ये पहिल्यांदाच एका महिला शिख खासदाराची वर्णी लागली आहे.
 • प्रीत कौर गिल यांची या समितीमध्ये निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये 11 जणांचा समावेश आहे.
 • गृह मंत्रालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे हे या समितीचे मुख्य काम आहे. प्रीत कौर या लेबर पार्टीच्या खासदार आहेत.
 • 2017 मध्ये बर्मिंघम एबेस्टन येथून त्यांनी निवडणूक जिंकली होती. यापुर्वी सप्टेंबर 2016 पर्यंत लेबर पार्टीच्या केथ वेज ह्या या समितीमध्ये होत्या मात्र ड्रग्स आणि वेश्यावृत्तीच्या आरोपांमुळे त्यांना समितीमधून बाहेर पडावे लागले होते. गेले 9 वर्ष केथ वेज ह्या या समितीच्या अध्यक्षा होत्या.

नेपाळ चीनकडून इंटरनेट सेवा घेणार :

 • नेपाळने ऑगस्ट महिन्यापासून चीनकडून इंटरनेट सेवा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे या परिसरातील भारताची इंटरनेट सेवेबाबतची एकाधिकारशाही संपुष्टात आली आहे.
 • नेपाळ सध्या भारताकडून पुरवण्यात येणाऱ्या इंटरनेट सेवेवर अवलंबून आहे. भैरहवा, बिरगुंज आणि बिराटनगर या भागातून टाकलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून ही इंटरनेट सेवा पुरवली जाते.
 • चीनकडून हिमालयाच्या परिसरातून नेपाळपर्यंत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला नेपाळमध्ये चीनी इंटरनेट सेवा सुरू होईल.
 • तसेच ही इंटरनेट सेवा चीनच्या मुख्य भागातून न पुरवता हाँगकाँगमधून पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे नेपाळमधील लोकांना गुगल आणि फेसबुकचा वापर करता येईल.
 • चीन ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून नेपाळला जोडला गेल्याने दक्षिण आशियाई परिसरातील भारताच्या वर्चस्वाला काही प्रमाणात धक्का बसणार आहे.

‘माझी कन्या भाग्यश्री’ नव्या रूपात :

 • महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना दीडच वर्षात पूर्णपणे बदलावी लागली आहे. या योजनेच्या पहिल्या वर्षी एकही लाभार्थी न मिळाल्याने अखेरीस या योजनेच्या अनाकलनीय अटी व नियम बदलण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंजुरी देण्यात आली.
 • 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख 50 हजारापर्यंत आहे, अशा समाजातील सर्व घटकांना ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
 • मुलीचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीच्या शिक्षणास प्रोत्साहन, मुलीच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी दीड वर्षापूर्वी पंकजा मुंडे यांनी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना जाहीर केली होती.
 • मात्र या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षभरात जन्म झालेल्या एकाही कन्येच्या पालकांच्या बॅंकेच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा झालेले नव्हते.
 • या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विविध जिल्ह्यांमधून 200 अर्ज आले. मात्र अनाकलनीय नियम आणि अटींमुळे एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज मंजूर केले नव्हते.
 • आता या योजनेतील त्रुटी कमी करून ती अधिक सोपी केली आहे. नव्या योजनेनुसार एका मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे 50 हजार रुपये बॅंकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येणार आहेत.
 • 50 हजार रकमेवर सहा वर्षांसाठी होणारे व्याजच मुलीच्या वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल. मुदलाची 50 हजार रुपयांची गुंतवणूक करून सहा वर्षांसाठी मिळणारे व्याज मुलीच्या वयाच्या 12 व्या वर्षी काढता येईल. तसेच पुन्हा मुद्दल 50 हजार रुपये गुंतवून सहा वर्षांसाठी मिळणारे व्याज अधिक मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या 18 व्या वर्षी काढता येणार आहे.
 • माता किंवा पिता यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर रक्कम देण्यात येणार आहे.
 • दोन मुलींनंतर लाभ :
 • दोन मुलींनंतर प्रत्येकी 25 हजार रुपये बॅंकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येणार. मुलींचे वय 6, 12 वर्षे अशा दोन टप्प्यांत 25 हजाराचे व्याज आणि 18 व्या वर्षी 25 हजार आणि व्याज माता किंवा पित्याने शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर दोन्ही मुलींना देण्यात येणार.

दिनविशेष :

 • भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा 19 जुलै 1938 मध्ये जन्म झाला.
 • सन 1976 मध्ये 19 जुलै रोजी नेपाळमध्ये सगरमाथा राष्ट्रीय उद्यानाची सरचना करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 जुलै 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.