Current Affairs (चालू घडामोडी) of 19 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | ई-रिक्षा विधेयकास लोकसभेत मंजुरी |
2. | मंत्रीमंडळाची जीएसटीला मंजुरी |
3. | मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम |
4. | जीएसएलव्ही मार्क-3 चे यशस्वी प्रेक्षेपण |
5. | लेखक,परीक्षकांच्या मानधनात वाढ |
6. | ऊर्जा संवर्धन क्षेत्रातील ‘महाऊर्जा’ला राष्ट्रीय पुरस्कार |
7. | पुण्यातील नमिता पहिली “मिसेस इंडिया यूएसए” |
8. | थोरीयम अणूभट्टी तारापूरला उभारणार |
9. | पाकिस्तानी कावयत्रीला सुवर्णपदक |
10. | दिनविशेष |
ई-रिक्षा विधेयकास लोकसभेत मंजुरी:
- ई-रिक्षा विधेयकास लोकसभेच्या सभागृहात बुधवारी एकमताने मंजुरी मिळाली.
- या विधेयकामुळे कोट्यावधी बेरोजगारांना, गरीब कुटूंबातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे.
- ई-रिक्षा साठी कोणत्याही लायसन्सची गरज नही.
- तसेच ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी बँकेत कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात येईल.
- 25 की.मी पर्यंत या रिक्षा धावू शकतील.
मंत्रीमंडळाची जीएसटीला मंजुरी :
- वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) यावरील घटनादुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.
- प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या कर सुधारणांबाबतच्या या विधेयकाला केंद्राने हिरवा कंदील दाखवला.
मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम :
- राज्य सरकारला धक्का, मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम.
- गुरुवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला.
- 52 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नसल्याचे सांगत मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती कायम ठेवली आहे.
जीएसएलव्ही मार्क-3 चे यशस्वी प्रेक्षेपण :
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने गुरुवारी अंतराळ क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
- जीएसएलव्ही मार्क 3 चे यशस्वी प्रेक्षेपण करण्यात आले आहे.
- मार्क 3 मुळे इस्त्रोला अंतराळात चार टनचे उपग्रह सोडणे शक्य झाले आहे.
- मार्क 3 च्या यशस्वी चाचणीमुळे मानवाला अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेतील पहिला टप्पाही पूर्ण केला आहे.
- मार्क 3 चे वैशिष्ट्य –
- 1.2016 मधील चंद्रयान – 2 आणि मंगलायन – चे प्रेक्षेपणही मार्क-3 च्या मदतीने करणे शक्य होणार आहे.
- 2.मर्श-3 च्या माध्यमातून अवकाश कुपीही अंतराळात सोडणे शक्य झाल्याने अंतराळात मानवाला पाठवण्याच्या महत्वाकांक्षी मोहिमेतील पहिला टप्पाही इस्त्रोने पूर्ण केला.
- अवकाश कुपीमध्ये दोन जणांना अंतराळात पाठवता येईल.
- 3. मार्क-3 या रॉकेटच्या माध्यमातून इस्त्रोला अंतराळामध्ये 4 हजार किलो चे उपग्रह सोडणे शक्य होणार आहे.
लेखक, परीक्षकांच्या मानधनात वाढ :
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या पुस्तक प्रकाशन योजनेअंतर्गत मंडळाने लिहून घेतलेल्या पुस्तकाच्या लेखकास प्रत्येक प्रकाशनार्थ आणि हस्तलिखितांचे परीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ञांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
- तब्बल सात वर्षानी ही वाढ झाली आहे.
- प्रकाशनार्थ 1000 शब्दांना 300 रुपये आणि आलेल्या तज्ञांना 500 रुपये प्रती हस्तलिखित मानधन पहिले दिले जात होते.
- ते वाढवून आता 900 रुपये व 1 हजार 500 इतके केले.
ऊर्जा संवर्धन क्षेत्रातील ‘महाऊर्जा’ला राष्ट्रीय पुरस्कार :
- ऊर्जा संवर्धंनासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरन संस्थेला राष्ट्रीय स्तरावर व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सि आणि केंद्र सरकारने ऊर्जा मंत्रालय यांच्याकडून ऊर्जा संवर्धन क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
- महाऊर्जाचे महासंचालक आनंद लिमणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुण्यातील नमिता पहिली “मिसेस इंडिया यूएसए”:
- अमेरिकेतील भारतीय महिलांसाठी प्रथमच न्यूजर्सी येथे आयोजित करण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत पुण्याची नमिता दोडवाडकर “मिसेस इंडिया यूएसए” या मुकूटाची मानकरी ठरली आहे.
थोरीयम अणूभट्टी तारापूरला उभारणार :
- थोरीयम इंधनावर चालणारी आणि पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या एँडव्हान्स हेवी वॉटर अनुभट्टीची उभारणी तारापुर येथे होईल.
- अणूऊर्जा खात्याचे राज्यमंत्री यांनी जाहीर केले.
पाकिस्तानी कवयित्रीला सुवर्णपदक :
- ‘द टेररिस्ट अॅट माय टेबल‘ आणि ‘ओव्हर द मून‘ यासारख्या कविता करणार्या पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश कवयित्री इम्तियाज धारकर यांना महाराणीचे सुवर्ण पदक घोषित झाले आहे.
- महाराणी एलिझाबेथ व्दितीय यांच्या हस्ते इम्तियाज यांना 2015 मध्ये हे सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- 19 डिसेंबर 1961 – गोवा मुक्त झाला – गोवा मुक्तिदिन.
- 1901 – महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.
- 1961 – भारताने दमन आणि दिव या बेटांवर ताबा घेतला.
- 2001 – व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन‘च्या पुतळ्याचे माजी राष्ट्रपती के.आर.नारायण यांच्या हस्ते पुणे येथे अनावरण..