Current Affairs of 18 November 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (18 नोव्हेंबर 2016)
एमपीएससी परीक्षेच्या स्वरूपात बदल :
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत.
- तसेच त्यामुळे आता सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या परीक्षेसाठी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे.
- या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत केले जात असले तरी सर्वप्रथम रिक्त जागांच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
- एमपीएससीतर्फे सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या भरतीकरिता स्वतंत्र जाहिरात, स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र पूर्वपरीक्षा घेतल्या जातात.
- या तीनही परीक्षांसाठी परीक्षा योजना, अभ्यासक्रम, प्रश्नसंख्या, गुण, वेळ एकसमान आहेत.
- स्वतंत्र पूर्वपरीक्षांमुळे प्रत्येक परीक्षेसाठी अर्ज करणे, परीक्षा शुल्क भरणे, पूर्वतयारी अभ्यास, प्रवास, निवासव्यवस्था, रजा घेणे अशा बाबींवर उमेदवारांना पुन्हा पुन्हा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी एमपीएससीने एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Must Read (नक्की वाचा):
चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात दुसरे स्थान :
- महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे महत्त्व वाढवित त्यांना राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दुसरे स्थान देण्यात आले आहे.
- सामान्य प्रशासन विभागाने या बाबतचे परिपत्रक जारी केले. पाटील हे विधानपरिषदेत सत्तारुढ पक्षाचे नेते आहेत.
- एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असेपर्यंत विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसत असत. आता त्या जागी चंद्रकांत पाटील बसणार आहेत.
- चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे ते निकटवर्ती मानले जातात.
- तसेच खडसे यांच्या राजीनाम्यानंतर महत्त्वाचे महसूल खाते त्यांच्याकडे सोपविण्यात आले.
वेगवान धावपटू धरमवीरवर 8 वर्षांची बंदी :
- डोप चाचणीत ऐनवेळी अपयशी ठरताच रिओ ऑलिम्पिकला अनुपस्थित राहिलेला हरियाणाचा वेगवान धावपटू धरमवीरसिंग याच्यावर राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) आठ वर्षांची बंदी घातली आहे.
- 200 मीटर शर्यतीचा धावपटू असलेला धरमवीर याला 11 जुलै रोजी बंगळुरू येथे झालेल्या इंडियन ग्रॅन्डप्रिक्सदरम्यान झालेल्या डोप चाचणीत दोषी धरण्यात आले होते.
- धरमवीर दुसऱ्यांदा डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने नाडाच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर आठ वर्षे बंदीचा निर्णय घेतला आहे.
- तसेच ही माहिती अ. भा. अॅथलेटिक्स फेडरेशन आणि वाडाला देण्यात आली असल्याचे नाडाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
- 2012 मध्ये अनिवार्य डोप टेस्ट देण्यास टाळाटाळ करणाऱ्या धरमवीरकडून आंतरक्षेत्रीय चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेले 100 मीटरचे सुवर्णपदक हिसकावून घेण्यात आले होते.
ध्वनिप्रदूषण केल्यास पाच वर्षे कारावासाची शिक्षा होणार :
- सणांनिमित्त होणाऱ्या आतषबाजीमुळे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत.
- ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद असून, यासंदर्भात कठोर कारवाईचा आदेश सरकारने पोलिस नियंत्रणास दिले आहेत.
- ध्वनिप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल, तर रात्री 70 डेसिबल एवढी ध्वनिमर्यादा असावी.
- व्यापारी क्षेत्रात दिवसा 65 डेसिबल, तर रात्री 55 डेसिबल एवढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसिबल, तर रात्री 45 डेसिबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा 50 डेसिबल ते रात्री 40 डेसिबलपर्यंत ध्वनिमर्यादा आहे.
- ध्वनिप्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, श्रवणशक्तीवर दुष्परिणाम, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडण्याच्या अनेक शक्यतांना सामोरे जावे लागत आहे.
- अशा परिस्थितीत चांगल्या आरोग्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे.
- ध्वनिप्रदूषण नियम व नियमांचे उल्लंघन म्हणजेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे सरकारच्या परिपत्रकात म्हटले आहे.
- नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी व पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असा आदेश सरकारने दिला आहे.
दिनविशेष :
- 18 नोव्हेंबर 1901 हा निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार शांताराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम यांचा जन्मदिन आहे.
- पहिले महायुद्ध – सॉमची पहिली लढाई 18 नोव्हेंबर 1916 रोजी संपली.
- 18 नोव्हेंबर 1963 रोजी बटण असलेला पहिला दूरध्वनी संच वापरात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा