Current Affairs of 18 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (18 जानेवारी 2018)

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव :

 • 17 जानेवारी रोजी मुख्यमंत्री सचिवालय येथे जनसंपर्क कक्षात मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत काही निर्णय घेतले गेले. ज्यात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
 • महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी 2017 ला मान्यता देण्यात आली. तर मराठवाड्यातील वॉटर ग्रीडसाठी ‘मेकोरोट‘ या इस्त्राईल सरकारच्या कंपनीसोबत सामंजस्य करारही करण्यास मान्यता मिळाली आहे.
 • तसेच या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, कोल्हापूर येथील विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर’ असे करण्यात येणार आहे.
 • कोल्हापुरात राजाराम महाराजांनी विमान सेवा सुरू केली होती. त्या अनुषंगाने कोल्हापूरच्या विमानतळाला राजाराम महाराज यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरु होती. त्या मागणीला आता मूर्त स्वरूप आल्याने कोल्हापूरकरांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्यपालांच्या हस्ते पोलिस पदके प्रदान :

 • पोलिस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या पोलिस पदकांचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते 16 जानेवारी रोजी वितरण झाले.
 • यात एक राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक, 12 पोलिस शौर्यपदके, उल्लेखनीय सेवेबद्दल 7 राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल 80 पोलिस पदकांचा समावेश आहे.
 • प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन 2015 रोजी राष्ट्रपतींनी या पदकांची घोषणा केली होती.
 • पोलिस हवालदार गणपत नेवरू मडावी यांना राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक; तर पोलिस शिपाई सुनील तुकडू मडावी आणि पोलिस नाईक गिरिधर नागो आत्राम यांना पोलिस शौर्यपदक मरणोत्तर देण्यात आले.
 • पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मोहंमद सुवेज महबूब हक आणि यशवंत काळे (पोलिस उपअधीक्षक, सातारा) यांच्यासह 12 अधिकाऱ्यांना पोलिस शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले.

10 रूपयांची सर्व नाणी वैधच रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण :

 • सध्या चलनात असलेले 14 प्रकारचे दहा रुपयांचे चलन वैधच आहे. हे सर्व चलन भारतीय रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणले गेल्याने ते यापुढेही वैधच राहणार आहे, असे स्पष्टीकरण भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पुन्हा एकदा दिले.
 • दहा रुपयांचे चलनी नाणे स्वीकारण्यास काही लोकांकडून नकार दिला जात असल्याची बाब समोर आल्यानंतर आरबीआयने हे स्पष्टीकरण दिले.
 • गेल्या अनेक महिन्यांपासून दहा रुपयांचे चलनी नाणे काही लोकांकडून स्वीकारले जात नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर बँकेकडून याबाबतचा खुलासा करण्यात आला.
 • रिझर्व्ह बँकेकडून 14 प्रकारचे दहा रुपयांचे चलन जारी करण्यात आले आहे. हे सर्व चलन कोणत्याही व्यवहारांसाठी स्वीकारता येऊ शकते;, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
 • तसेच आरबीआयने सर्व बँकांना व्यवहारांसाठी आणि चलन बदली करताना नाणी स्वीकारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. याशिवाय आरबीआयने दहा रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या असल्याचेही सांगितले.

सीए परीक्षेत मोहित गुप्ता देशात प्रथम :

 • द इन्स्ट्यिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2017 मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटन्टच्या मुख्य परीक्षेचा निकाल 17 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये हरियाणातील मोहित गुप्ताने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 • देशात पहिला आलेला हरियाणाच्या मोहित गुप्ताने 73.38 टक्के गुण मिळवले आहेत. दुसरा आलेल्या नवी दिल्लीतील प्रशांतने 71.38 टक्के तर दिल्लीच्या आदित्य मित्तलने 70.62 टक्क्यांसह तिसरा क्रमांक मिळवला आहे.
 • नोव्हेंबर 2017 मध्ये घेण्यात आलेल्या या परिक्षेला एकूण 60 हजार 585 विद्यार्थी बसले होते. देशभरातून 327 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. यांपैकी 9 हजार 489 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यंदाचा निकाल 22.76 टक्के इतका लागला आहे.

कल्याणमध्ये राम गणेश गडकरी कट्ट्याचे उद्घाटन :

 • पुणे शहरातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा बालगंधर्व रंगमंदिर किंवा शहरातील अन्य योग्य अशा ठिकाणी पुर्नस्थापित करावा अशी मागणी राम गणेश गडकरी कट्ट्यातर्फे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना देण्यात आले आहे.
 • पत्रकार तुषार राजे, नाट्यप्रेमी मेघन गुप्ते यांच्यासह काही गडकरीप्रेमींनी हे निवेदन दिले आहे.
 • 23 जानेवारी 2018 पासून सुरु होत असलेल्या गडकरी स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कल्याण शहरात त्यांच्या नावाने कट्टा सुरु करण्यात येत आहे.
 • वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी 23 जानेवारी 1919 ला राम गणेश गडकरी यांचे निधन झाले. गडकरी स्मृती शताब्दी वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्त्याने कट्टा तसेच वर्षभराच्या विविध उपक्रमांची माहिती तुषार राजे यांनी दिली.
 • 23 जानेवारी रोजी सकाळी गुजराथमधील नवसारी येथे एक कार्यक्रम होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी कल्याणात कट्ट्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील 188 शाळा बंद होणार :

 • शासनाच्या आदेशानुसार वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील 188 शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. तसे आदेश त्या-त्या तालुक्‍यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. बंद झालेल्या शाळांमधील साडेतीनशे शिक्षकांची नियुक्‍ती जवळच्या शाळेत केली जाणार आहे.
 • शासनाने 2009- 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून राहावी आणि शिक्षकांची नोकरीही आबाधित राहावी, यासाठी शाळा स्थलांतरित करण्यात येणार आहेत.
 • प्राथमिक शाळा एक किलोमीटरवर, तर माध्यमिक शाळा तीन किलोमीटरच्या आत स्थलांतरित केल्या जातील. याची अंमलबजावणी शिक्षण विभाग करणार आहे.
 • राज्यस्तरावरून गुगल मॅपचा आधार घेऊन यादीही तयार करण्यात आली आहे. खर्चाचा भार कमी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्याच्या वित्त विभागाने केल्या होत्या. कमी पटाच्या शाळांची आवश्‍यकता तपासून त्या बंद कराव्यात आणि तेथील विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी पाठवावे असे आदेश होते.

दिनविशेष :

 • सन 1778 मध्ये 18 जानेवारी रोजी कॅप्टन ‘जेम्स कूक’ हा हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरला.
 • न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म सन 1842मध्ये 18 जानेवारी रोजी झाला.
 • मदनमोहन पूंछी यांनी 18 जानेवारी 1998 रोजी भारताचे 28वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
 • एअरबस ए-380 या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण 18 जानेवारी 2005 मध्ये करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.