Current Affairs of 17 August 2015 For MPSC Exams

Current Affairs 17 August 2015

चालू घडामोडी (17 ऑगस्ट 2015)

राज्यात नवीन 22 जिल्हे व 49 तालुक्‍यांची निर्मिती :

  • नागरिकांची गैरसोय व प्रशासनाची दिरंगाई टाळण्यासाठी राज्यात नवीन 22 जिल्हे व 49 तालुक्‍यांची निर्मिती करण्याचा मानस राज्य सरकारने व्यक्‍त केला आहे.
  • यासाठीच्या हालचालीही सरकारने सुरू केल्या असून, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • तसेच या समितीमध्ये अर्थ, महसूल, नियोजन विभागाचे सचिव आणि विभागीय आयुक्तांचा समावेश आहे.
  • 31 डिसेंबरपर्यंत ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.
  • सध्या राज्यात 36 जिल्हे व 288 तालुके आहेत. मात्र, यापैकी अनेक जिल्हा मुख्यालये आणि तालुक्‍यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीची आहेत.
  • प्रस्तावित नवीन जिल्हे :
  1. बुलडाणा (खामगाव)
  2. यवतमाळ (पुसद)
  3. अमरावती (अचलपूर)
  4. भंडारा (साकोली)
  5. चंद्रपूर (चिमूर)
  6. गडचिरोली (अहेरी)
  7. जळगाव (भुसावळ)
  8. लातूर (उदगीर)
  9. बीड (अंबाजोगाई)
  10. नांदेड (किनवट)
  11. नगर (शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर)
  12. नाशिक (मालेगाव, कळवण)
  13. सातारा (माणदेश)
  14. पुणे (शिवनेरी)
  15. पालघर (जव्हार)
  16. ठाणे (मीरा-भाईंदर, कल्याण)
  17. रत्नागिरी (मानगड)
  18. रायगड (महाड)
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2015)

सचिन तेंडुलकर आणि हेमा मालिनी वन व वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी ब्रॅंड ऍम्बेसेडर :

  • ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ आता सचिन तेंडुलकर आणि हेमा मालिनी यांनीही वन व वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी ब्रॅंड ऍम्बेसेडर होण्याची तयारी Sachin Tendulkarदर्शविली आहे.
  • राज्यातील वनपर्यटनाला चालना मिळावी, यासाठी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून योगदान द्यावे, अशी विनंती केली होती.
  • बच्चन यांनी 10 ऑगस्टला व्याघ्रदूत म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला.
  • सचिनचाही यास होकार आला असून, हेमा मालिनी राष्ट्रीय पक्षी मोर याची ब्रॅंड ऍम्बेसेडर होण्यास उत्सुक असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएई रविवार रवाना :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर रविवार रवाना झाले आहेत. Narendra Modi
  • गेल्या 34 वर्षांमध्ये यूएईचा दौरा करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान असतील.
  • आज दुपारी चार वाजता मोदी अबुधाबीमध्ये पोहचणार आहेत.
  • तसेच मोदी व्यापार आणि सुरक्षेसंदर्भात पंतप्रधान युएईमधील प्रमुख नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
  • यापूर्वी यूएईच्या दौऱ्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी 1981 मध्ये गेल्या होत्या.

आसाममध्ये पाच नव्या जिल्ह्य़ांच्या निर्मितीची :

  • सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत व्हावी यासाठी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आसाममध्ये पाच नव्या जिल्ह्य़ांच्या निर्मितीची घोषणा स्वातंत्र्यादिनाच्या पाश्र्वभूमीवर केली.
  • पाच नव्या जिल्ह्य़ांमध्ये बिस्वनाथ, चारायदेव, होजाय, दक्षिण सालमारा-मनकाचार आणि पश्चिम कारबी यांचा समावेश आहे.
  • सध्या आसाममध्ये 27 जिल्हे आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 ऑगस्ट 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.