Current Affairs of 17 April 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 एप्रिल 2017)

चालू घडामोडी (17 एप्रिल 2017)

देशसेवेत ‘आर्मड्‌ कोअर’चे योगदान अतुलनीय :

  • देशाच्या संरक्षणासाठी ‘आर्मड्‌ कोअर सेंटर अँड स्कूल’ची (एसीसी अँड एस) कामगिरी अतुलनीय आहे. या संस्थेचा इतिहास गौरवशाली, देदीप्यमान आहे.
  • देश संरक्षणासाठी या संस्थेचा त्याग समर्पण भावनेतून आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘एसीसी अँड एस’चे कौतुक केले.
  • राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते ‘आर्मड्‌ कोअर सेंटर व स्कूल’ला (एसीसी अँड एस) आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान म्हणून ध्वज प्रदान करण्यात आला.
  • राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते ‘एसीसी अँड एस’चे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी हा सन्मान स्वीकारला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 एप्रिल 2017)

नाशिक बनणार मुद्रण व्यवस्थेचा केंद्रबिंदू :

  • कागद स्कॉटलंडचा, शाई युरोपातील, छपाई यंत्र जर्मनीचे आणि त्यावर नोट छापायची भारताची! वर्षानुवर्षे असे विदेशी तंत्रज्ञानावरील आधारित नोटांचे अर्थकारण चलनाची गरज भागवू शकत असले, तरी आर्थिक सुरक्षेशी मात्र तडजोडच होती.
  • सामरिक सुरक्षेइतकेच महत्त्व असलेल्या आर्थिक सुरक्षेचा हा विषय आता ‘मेक इन इंडिया’ या पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित धोरणामुळे मार्गी लागतो आहे. प्रस्तावित कागद कारखाना हे त्याच दिशेचे पाऊल आहे.
  • स्वदेशी कागद कारखान्यामुळे चलननिर्मितीसोबत स्वयंपूर्णतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे आणि नाशिकच नव्हे, तर राज्याची ओळख बनलेल्या नाशिकची मुद्रण क्षेत्रातील ओळख अधिक घट्ट होणार आहे.
  • “हिंदुस्थान एरॉनॉटिक्‍स”नंतर (एचएएल) 40-45 वर्षांनंतर केंद्राचा मोठा प्रकल्प नाशिकला येणार म्हणून प्रस्तावित कागद कारखान्याला महत्त्व आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार :

  • आयकर उपायुक्त सोनल सोनकावडे यांना ‘मोरे साँवरे’ अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट नवोदित गायिकेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
  • अलीकडे इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स कौन्सिल तर्फे आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार 2017’ सोहळा पार पडला.
  • तसेच या सोहळ्यात मुंबई येथील आयकर विभागातील डेप्युटी कमिशनर सोनल सोनकावडे यांना ‘मोरे साँवरे’ अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट नवोदित गायिका म्हणून सन्मानित केले गेले.

दिगंबर कामत यांना एसटीआयचे समन्स :

  • गोवा गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
  • 2013 मधील बेकायदा खाणप्रकरणी कामत यांनी ‘एसआयटी’समोर हजर राहावे, असे समन्स त्यांना बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • कामत यांना याप्रकरणी दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत. कामत यांच्याबरोबरच गोव्याच्या खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाचे माजी संचालक अरविंद लोलयेकर यांनाही समन्स बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • लोलयेकर यांना याप्रकरणी 2014 मध्ये अटक झाली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बंदी केली असतानाही 2005 ते 2012 या कालावधीमध्ये गोव्यातून 35 हजार कोटी रुपयांचे बेकायदा खाणकाम झाल्याचा अहवाल आहे.

दिनविशेष :

  • हिंदीतील एक थोर कवी ‘कवी सूरदास’ यांचा जन्म 17 एप्रिल 1479 मध्ये झाला.
  • 17 एप्रिल 1970 रोजी चांद्रयान अपोलो 13तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 एप्रिल 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.