Current Affairs of 16 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (16 नोव्हेंबर 2015)

रॉस टेलर याने 112 वर्षांचा विक्रम मोडीत काढला :

  • धडाकेबाज फलंदाज रॉस टेलर याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत 290 धावांची खेळी करत त्यांच्या देशात सर्वाधिक वैयक्तिक धावा बनविण्याचा 112 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे.
  • यापूर्वी 1903 साली इंग्लंडच्या टीप फॉस्टर्सने सिडनी कसोटीत 287 धावा केल्या होत्या.
  • कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियात खेळताना सर्वाधिक धावा बनविण्याचा फॉस्टर्स यांचा विक्रम आतापर्यंत अबाधित होता.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत सर्वाधिक वैयक्तिक धावा बनविण्याचा विक्रम इंग्लंडच्याच लेन ह्युटन्स यांच्या नावावर आहे.
  • त्यांनी 1938 मध्ये लॉर्ड्स मैदानावर 364 धावा केल्या होत्या.

जी-20 परिषदेत सहभागी होत असलेले सर्व देश फ्रान्सच्या बाजूने :

  • पॅरिसवर ‘इसिस‘ने केलेला हल्ला हा मानवतेवरील हल्ला असल्याचे सांगून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जी-20 परिषदेत सहभागी होत असलेले सर्व देश फ्रान्सच्या बाजूने असल्याचे सांगितले.
  • तसेच हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शासन करण्यासाठी फ्रान्सला सर्वप्रकारचे साह्य करण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.
  • जी-20 परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर तुर्कस्तानचे पंतप्रधान तयिप एर्दोगान यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘ऍलस्टॉम‘ला लाच दिल्याप्रकरणी रू.5100 कोटींचा दंड :

  • अमेरिकेने बहुराष्ट्रीय फ्रेंच कंपनी ‘ऍलस्टॉम‘ला लाच दिल्याप्रकरणी रू.5100 कोटींचा दंड केला आहे.
  • अमेरिकी न्यायालयाने बहुराष्ट्रीय कंपनीस सुनावलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आहे.
  • अभियांत्रिकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या ‘ऍलस्टॉम‘वर इंडोनेशिया, सौदी अरेबिया, इजिप्त आणि तैवानमध्ये देखील लाच दिल्याचा आरोप आहे.
  • अमेरिकी न्यायालयाने ‘ऍलस्टॉम‘ला रू.5100 कोटींचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

प्राप्तीकर विभाग एक मोबाइल अॅप तयार करणार :

  • प्राप्तीकर विभाग एक मोबाइल अॅप तयार करत असून, ज्याचा उपयोग प्राप्तीकराचा भरणा करण्यासाठी (आयटी रिटर्न) होणार असल्याची, माहिती अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
  • सुरक्षिततेबाबत काही गोष्टींची पडताळणी करणे सुरू आहे.
  • सुरक्षेबाबत काही समस्यांचे निराकरण झाल्यानंतर अॅप उपलब्ध करून देण्यात येईल.
  • सरकारने यंदा आधार नंबर, इंटरनेट बॅंकिंग, एटीएम इत्यादींचा वापर करून ऑनलाइन व्हेरिफिकेशनची सुविधा दिली होती.
  • त्यामुळे ऑनलाइन रिटर्न भरणार्यांची संख्या वाढली आहे.
  • यंदा ई-फायलिंगच्या शेवटच्या दिवशी तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त विवरणपत्रे अपलोड करण्यात आली होती.
  • सरकारने चालू आर्थिक वर्षात 7.98 लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य ठेवले आहे.
  • प्राप्तिकर कायदे आणि नियम अधिक सोपे आणि सुलभ करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर व्ही ईश्वर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

फसव्या ई-मेलचा अलर्ट मिळणार :

  • जी-मेल अकाउंटमधील माहितीची चोरी, दुरुपयोग, पाळत ठेवणाऱ्या फसव्या ई-मेलचा अलर्ट मिळणार आहे.
  • “अनक्रिप्टेड कनेक्‍शन”द्वारे आलेल्या ई-मेलचे नोटिफिकेशन मोफत मिळणार आहे.
  • सुरक्षेबाबतचा अलर्ट काही महिन्यांत मिळेल, अशी माहिती गुगलने ब्लॉगपोस्टवरून दिली आहे.
  • या अलर्टमुळे जी-मेलचा वापर करणाऱ्यांना कोणताही अडथळा येणार नाही, असे गुगलने स्पष्ट केले.

पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ब्रिटनमधील कंपन्यांशी झालेल्या करारामुळे हातभार लागणार :

  • पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प महत्त्वाचा आहे.
  • त्याची प्रभावी अंमलबजावणी होत असताना, ब्रिटनमधील कंपन्यांशी झालेल्या करारामुळे त्याला हातभार लागणार आहे.

मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र अग्रेसर :

  • पुत्ररत्न प्राप्तीसाठी देशात स्त्रीभ्रूणहत्या होत असतानाच मूल दत्तक घेणारी दाम्पत्ये मात्र मुलींना प्राधान्य देत असून, यात महाराष्ट्र अग्रेसर आहे.
  • त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो.
  • या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत देशभरात दत्तक घेण्यासाठीचे 1960 अर्ज करण्यात आले असून, त्यापैकी 1241 अर्जांमध्ये मुलगी दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
  • याउलट मुलाला पसंती देणारे केवळ 718 अर्ज आहेत.
  • हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये मुलामुलींच्या प्रमाणात प्रचंड तफावत असताना तेथेही दत्तक घेण्यास इच्छुक निपुत्रिक दाम्पत्ये मुलांच्या तुलनेत मुलींनाच प्राधान्य देत आहेत.

लंडनमधील अर्धपुतळ्याचे अनावरण :

  • घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लंडन मुक्कामात वास्तव्य केलेल्या घरामध्ये त्यांच्या संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
  • मोदींनी तेथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचेही अनावरण केले.
  • या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.
  • संग्रहालयात डॉ. आंबेडकरांचे निवडक लेखन, छायाचित्रे, दस्तावेज आणि अन्य माहिती उपलब्ध आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.