Current Affairs of 16 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2015)

अहमदाबाद ते लंडन या थेट विमानसेवेला सुरवात :

  • एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन या थेट विमानसेवेला सुरवात झाली. मुंबईमार्गे असणाऱ्या या विमानसेवेला गुजरातचे पर्यटनमंत्री सौरभ पटेल यांनी हिरवा कंदील दाखविला. plane
  • जानेवारीच्या 15 तारखेपासून अहमदाबाद-लंडन विमानसेवा विनाथांबा होणार असल्याचे एअर इंडियाने जाहीर केले आहे. काही तांत्रिक अडचणी आणि धुक्‍याचा प्रश्‍न असल्याने सध्या हे विमान मुंबईत अल्पकाळासाठी थांबून पुढे लंडनकडे रवाना होईल. मात्र, 15 जानेवारीपासून मुंबईला न थांबता विमान थेट लंडनला उतरेल, असे एअर इंडियाने सांगितले.
  • विनाथांबा सेवा सुरू झाल्यावर प्रवासाचा कालावधी सात ते आठ तासांनी कमी होईल, असेही या वेळी सांगण्यात आले. या विमानमार्गावर एअर इंडियाने बोईंग 787 ड्रीमलायनर हे विमान रुजू केले आहे.

राज्यातील जेष्ठ नागरिकांचे वय 65 वरून 60 करण्यात येणार :

  • राज्यातील जेष्ठ नागरिकांचे वय 65 वरून 60 करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केली.
  • राज्यात आज एक कोटी 16 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, तसेच आरोग्य चांगले राहावे यासाठी राज्य शासनाने 2013 मध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे. या धोरणात अनेक चांगल्या बाबींचा समावेश आहे. मात्र, या धोरणाची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.
  • तसेच राज्य शासन या नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहेत, तसेच मानधनातही वाढ करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा सध्या 65 आहे, ती 60 वर करण्यात येईल.

न्यूझीलंड सरकारचा करणार राष्ट्रीय ध्वजामध्ये बदल :

  • राष्ट्रीय ध्वजामध्ये बदल करण्याचा विचार न्यूझीलंड सरकारचा आहे. नवीन ध्वजात निळ्या व काळ्या रंगातील पार्श्‍वभूमीवर पांढऱ्या नेचाचे पान व उजवीकडे लाल रंगातील चार चांदण्या असतील.
  • पुढील वर्षी मार्च महिन्यापासून नवा ध्वज झळकणार आहे.
  • न्यूझीलंडचा सध्याचा ध्वज व ऑस्ट्रेलियाच्या ध्वजात साम्य असल्याने व जागतिक पातळीवर हा ध्वज सामान्य वाटत असल्याने त्यात बदल करण्याचा विचार व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार ध्वजात बदल करण्यासाठी डिझाइन पाठविण्याचे आवाहन पंतप्रधान जॉन की यांनी केले होते.
  • तसेच बदलाबाबत सार्वमत घेण्याचेही जाहीर केले होते. त्यानुसार सुमारे एक हजार डिझाइन पाठविण्यात आले. त्यातून पाच डिझाइनचीन निवड करण्यात आली.
  • त्यात निळ्या व काळ्या रंगाच्या ध्वजावर नेचाचे पान व चार चांदण्या असलेल्या डिझाइनच्या ध्वजाने प्राधान्य मिळविले. ध्वजात बदल हवान की नको याबाबत घेतलेल्या मतदानात 49 टक्‍के नागरिकांनी भाग घेतला. यातील बहुतेक नागरिकांनी बदल नको असे मत नोंदविले आहे.

 

सानिया मिर्झाचे नाव सुवर्णाक्षरांमध्ये लिहिले जाईल :

  • भारताच्या टेनिस इतिहासात 2015 या वर्षात सानिया मिर्झाचे नाव सुवर्णाक्षरांमध्ये लिहिले जाईल. Sania Mirza
  • सानियाने 2015 मध्ये दोन ग्रँडस्लॅम विजेतेपदासह एकूण दहा स्पर्धांमध्ये जेतेपदाला गवसणी घातली. आतापर्यंत अशी कामगिरी एकाही भारतीयाला करता आलेली नाही.
  • सानियासह 42 वर्षीय लिएंडर पेसनेही यंदाचे वर्ष संस्मरणीय ठरवले. त्याने मिश्र दुहेरीमध्ये तीन ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपद पटकावले. एकेरीमध्ये युकी भांबरीने वर्ष मावळतीला जात असताना जागतिक क्रमवारीत अव्वल 100 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.
  • जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीतील अव्वल खेळाडू सानियासाठी 29 ऑगस्ट दिवस संस्मरणीय ठरला. सानियाला त्या दिवशी देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न’ने गौरविण्यात आले.

रविचंद्रन आश्विनचे आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम :

  • रविचंद्रन आश्विनने आयसीसी कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे, तर रवींद्र जडेजानेएका स्थानाची प्रगती करताना पाचवे स्थान पटकावले आहे.
  • कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत एकही भारतीय अव्वल दहांमध्ये नाही, तर गोलंदाजांच्या क्रमवारीत आश्विन दुसऱ्या व जडेजा आठव्या स्थानी आहेत.
  • कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यम्सन तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे.
  • दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सपेक्षा तो तीन मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. मार्टिन गुप्तीलने 18 स्थानांची झेप घेतली आहे.

नासाच्या वैज्ञानिकांचा दावा :

  • गुरूच्या आकाराच्या व तप्त अशा दहा बाह्य़ग्रहांच्या वातावरणाचा वैज्ञानिकांनी अभ्यास केला असून त्या ग्रहांवर अपेक्षेपेक्षा कमी पाणी असण्याची कारणे शोधून काढली आहेत.NASA
  • नासा व युरोपीय स्पेस एजन्सी यांनी हबल अवकाश दुर्बीण व स्पिटझर दुर्बीण यांच्या मदतीने हे संशोधन करण्यात आले असून त्यात विविध वस्तुमान, तपमान व आकारमान असलेल्या बाह्य़ग्रहांचा तरंगलांबीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला.
  • तसेच सर्व बाह्य़ ग्रहांची कक्षा त्यांच्या मातृताऱ्यापासून अनुकूल अंतरावर असून ते ताऱ्यासमोरून जाताना त्यांचे निरीक्षण पृथ्वीवरून करता येते.
  • ताऱ्याचा काही प्रकाश ग्रहाच्या बाह्य़ वातावरणात पसरतो. तेथील वातावरणाचा ताऱ्याकडून आलेल्या प्रकाशावर परिणाम होतो व हा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा आपण त्या ग्रहाचा अभ्यास करू शकतो असे नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे हना वेकफोर्ड यांनी सांगितले.
  • ताऱ्याच्या प्रकाशावर ग्रहाच्या वातावरणाच्या गुणधर्माचा परिणाम होत असल्याने त्याच्या अभ्यासातून तेथील मूलद्रव्ये कळू शकतात तसेच ढगाळ व ढगमुक्त बाह्य़ग्रह वेगळे सांगता येतात. त्यातूनच तेथे कमी पाणी का आहे याचे रहस्य उलगडते. वैज्ञानिकांनी आतापर्यंत ताऱ्याभोवती फिरणारे दोन हजार ग्रह शोधले असून त्यातील काही गुरूसारखे वायूचे तप्त गोळे आहेत. त्यांचे गुणधर्मही गुरूसारखे आहेत, त्यांच्या कक्षा ताऱ्याच्या जवळून असल्याने त्यांचा पृष्ठभाग तप्त असून ताऱ्याच्या प्रकाशाशिवाय त्यांचा सखोल अभ्यास अवघड आहे.
  • हबल दुर्बिणीने कमी तरंगलांबीतील गुरूसारखे अनेक तप्त ग्रह शोधून काढले होते त्यात त्या ग्रहांवर कमी पाणी असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे गुरूसारख्या तप्त असलेल्या दहा बाह्य़ग्रहांचा व्यापक अभ्यास करण्यात आला. त्यातील केवळ तीनच ग्रहांच्या वातावरणाचा विस्तृत अभ्यास आधी करण्यात आला होता.
  • आताच्या अभ्यासात या बाह्य़ग्रहांचा वर्णपंक्ती नकाशा तयार करण्यात आला असून हे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

मोठय़ा माहिती तंत्रज्ञानाचा कंपन्यांना फटका :

  • अमेरिकेत 9/11 च्या आरोग्यकाळजी कायद्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी एच 1 बी व ए 1 व्हिसावर दोन हजार डॉलर्स शुल्क आकारण्यात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना फटका बसेल.
  • अमेरिकी काँग्रेसच्या एका गटाने या शुल्काचा प्रस्ताव पुन्हा हळूच पुढे केला असून जेम्स झाड्रोगा 9/11 आरोग्य व नुकसानभरपाई विधेयकात या शुल्काची तरतूद आहे. हे विधेयक 1 ऑक्टोबर रोजी निकाली निघाले असताना काही प्रतिनिधींनी त्याचे कायमस्वरूपी पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न चालवला आहे व त्यात आरोग्य तरतुदींसाठी एच 1 बी व एल 1 व्हिसावर 2000 डॉलर्सचे अतिरिक्त शुल्क लादण्याचा विचार आहे.
  • हे विधेयक 2006 मध्ये श्वासाच्या विकाराने मरण पावलेले गुप्तचर जेम्स झाड्रोगा यांच्या नावाने आहे.
  • नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सव्‍‌र्हिसेस कंपनीज म्हणजे नॅसकॉमच्या मते भारतीय कंपन्यांनी 2010 ते 2015 दरम्यान या विधेयकातील तरतुदीमुळे वर्षांकाठी 7 ते 8 कोटी डॉलर्स इतकी रक्कम भरली होती. आताच्या तरतुदीनुसार ज्या कंपन्यात एच 1 बी किंवा एल 1 व्हिसा लागणारे पन्नास टक्के कर्मचारी आहेत त्यांना जादा शुल्क भरावे लागणार आहे
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.