Current Affairs of 15 June 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 जून 2018)

चालू घडामोडी (15 जून 2018)

राज्य रस्ते सुरक्षिततेसाठी ‘ब्लूमबर्ग’चे सहकार्य :

  • राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग समूहातर्फे देण्यात येत असलेले सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यूयॉर्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘ब्लूमबर्ग‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक ब्लूमबर्ग यांच्याशी यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
  • मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाचे कॅनडाच्या दौऱ्यावरून अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आगमन झाले. भारताचे न्यूयॉर्कमधील कॉन्सूल जनरल संदीप चक्रवर्ती यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री न्यूयॉर्ककडे रवाना झाले.
  • राज्यातील रस्ते सुरक्षिततेबाबतच्या उपक्रमांना ब्लूमबर्गचे मोठे पाठबळ लाभले आहे. त्याबाबत या समूहाशी फेब्रुवारी 2015 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार झालेल्या उपाययोजनांमुळे रस्ते अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याबरोबरच अशा घटनांमधील जीवितहानीदेखील कमी करण्यात यश आले आहे.
  • महाराष्ट्रासोबतच्या सहकार्याची व्याप्ती वाढवितानाच राज्याच्या फिनटेक क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांसोबत संयुक्तरीत्या काम करण्याचा मनोदय ब्लूमबर्ग यांनी या वेळी व्यक्त केला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 जून 2018)

जनरल मोटर्सच्या सीएफओपदी दिव्या सूर्यदेवरा :

  • भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा यांची अमेरिकेची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी जनरल मोटर्सच्या मुख्य वित्त अधिकारीपदी (सीएफओ) नियुक्ती करण्यात आली आहे. 39 वर्षीय सूर्यदेवरा सध्या जनरल मोटर्समध्ये कॉर्पोरेट फायनान्स उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्या एक सप्टेंबरपासून सीएफओ पदाचा कार्यभार स्वीकारतील.
  • मुळच्या चेन्नई येथील असणाऱ्या सूर्यदेवरा या जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मेरी बारा यांना रिर्पोट करतील. मेरी बारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या यांना वेगवेगळ्या पदावर काम करण्याचा अनुभव असून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध केलेले आहे. त्यांच्या अनुभवाचा कंपनीला मोठा फायदा मिळाला आहे.
  • मेरी बारा या 2014 पासून कंपनीच्या सीईओ असून ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. दोन प्रमुख पदांवर महिला कार्यरत असलेली जनरल मोटर्स ही पहिली कंपनी बनली आहे.

इस्त्रायल महापौर निवडणूकित भारतीय वंशाची महिला :

  • इस्त्रायलमधील अशकेलॉन शहाराच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात भारतीय वंशाची महिलाही उतरली आहे. डॉ. रिंकी सहाय असे या उमेदवाराचे नाव असून त्या मुळच्या महाराष्ट्रातील आहेत.
  • बडोदा आणि अशकेलॉन शहरात झालेल्या करारामुळे निवडणूक लढण्यास आपण प्रेरित झाल्याचे रिंकी यांनी म्हटले आहे.
    तसेच त्या म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी बडोदा आणि अशकेलॉन या शहरांमध्ये एक करार झाला होता. दोन्ही शहरांना जवळ आणण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या कार्यक्रमात मी सहभागी होत असते. या करारापूर्वी अशकेलॉन शहराचे भारताबरोबर कमी संबंध होते, असे त्यांनी सांगितले.
  • दरम्यान, त्या बडोद्याला आल्या आणि इथे अनेक लोकांची भेट घेतली. जेव्हा मी भारतीय संस्कृतीशी जोडले गेले. तेव्हा मला इतर समाजाचे धैर्य आणि सहिष्णुतेच्या मूल्यांबाबत समजले. आता मी महापौरपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे असे त्यांनी सांगितले.

अनिवासी भारतीयांविरोधात कडक कारवाई होणार :

  • देशातील मुलींशी लग्न करुन परदेशात पळून जाणाऱ्या अनिवासी भारतीय पुरुषांविरोधात यापुढे कडक कारवाई होणार आहे. असा प्रकरणांना गांभिर्याने घेत केंद्र सरकारकडून कायद्यात बदल करण्यात येणार आहे.
  • जाणूनबुजून कोर्टाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अशा अनिवासी भारतीय पतींची संपत्ती जप्त करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा विचार केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या पुरुषांना कोर्टाच्या समन्सला उत्तर देण्यासाठी दबाव वाढणार आहे.
  • मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या पद्धतीची जीवनशैली उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवत अनिवासी भारतीय मुले भारतीय मुलींशी लग्न करुन काही काळातच त्यांना भारतातच ठेऊन परदेशात निघून जातात. या प्रकारावर गांभिर्याने लक्ष घालत सरकारने कायद्यात बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
  • विशेषतः पंजाबमध्ये अशा फसवणुकीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे काही मंत्र्यांनी अशा प्रकरणातील पतींवर कायदेशीर कारवाई करीत पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी काही संभाव्य उपाय सुचवले आहेत.
  • या उपायांमध्ये परराष्ट्र मंत्रालयाकडून एका वेबसाईटची निर्मितीकरून यामध्ये अशा अनिवासी भारतीय मुलांची नोंद करण्यात येणार आहे. तसेच फसवणूक करणाऱ्या पतींना या वेबसाईटच्या माध्यमातून समन्स बजावण्यात येणार आहे.

दिनविशेष :

  • 15 जून हा दिवसआंतरराष्ट्रीय हवा दिन‘ आहे.
  • वैद्यकीय इतिहासात प्रथमच डॉ. जॉं बाप्तिस्ते डेनिस यांनी 15 जून 1667 मध्ये यशस्वी रक्तसंक्रमण केले.
  • 15 जून 1869 मध्ये महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
  • लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे ‘समाजसेवक अण्णा हजारे‘ यांचा जन्म 15 जून 1937 रोजी झाला.
  • बा.पां. आपटे हे 15 जून 1970 रोजी पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 जून 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.