Current Affairs of 15 June 2015 For MPSC Exams

Current Affairs of 15 June 2015

दहावीच्या गुणपत्रिकांचे होणार आज वाटप

 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वाटप आज शाळा स्तरावर होणार आहे.
 • विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांत काही चुका असतील तर त्या तीस दिवसांच्या आत दुरुस्त करून घ्याव्यात, अशा सूचना मंडळातर्फे मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.
 • तसेच, जे विद्यार्थी दहावीला नापास झाले आहेत त्यांच्यासाठी यंदापासून जुलै-ऑगस्टमध्ये पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन आवेदनपत्र 15 जून ते 23 जूनपर्यंत भरता येणार आहेत. त्यानंतर 27 जूनपर्यंत विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची संधी दिली आहे.
 • त्यासाठी www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळाशी संपर्क साधावा, असे आवाहनही मंडळातर्फे करण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानाची 40 लाख पौंडांना खरेदी

 • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील निवासस्थानाच्या खरेदीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली आणि भारत सरकारने ही वास्तू खरेदी करण्यासाठी 40 लाख पौंड खर्च केले आहे.
 • विद्यार्थीदशेमध्ये 1920 च्या दशकात डॉ. आंबेडकर यांचे या घरामध्ये वास्तव्य होते आणि येथील “लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स” या संस्थेमध्ये डॉ. आंबेडकरांनी उच्च शिक्षणाचे धडे गिरवले होते.
 • डॉ. आंबेडकरांचे हे निवासस्थान भारत सरकारने खरेदी करावे यासाठी लंडनमधील “फेडरेशन ऑफ आंबेडकराईट्‌स अँड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन” (फॅबो) या संस्थेने सरकारकडे पाठपुरावा केला होता.

बंगळूरमध्ये जैव-संप्रेरकाचा होणार स्वच्छतेसाठी वापर

 • भाज्या आणि फळाच्या सालींपासून तयार करण्यात आलेल्या जैव संप्रेरकाचा स्वच्छतेसाठी वापर केला जावा म्हणून बंगळूरमधील “सॉइल अँड सोल” या संघटनेने पुढाकार घेतला आहे.
 • 300 ग्रॅम वजनाच्या न वापरलेल्या भाज्या आणि शंभर ग्रॅम गूळ यांच्या मिश्रणातून जैव-संप्रेरकाची निर्मिती करणे शक्‍य होते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी फक्त 90 दिवसांचा अवधी लागतो.

पोस्टातील 5 लाख बचत खातेधारकांना मिळणार डेबिट कार्ड

 • पुढील दोन महिन्यांमध्ये भारतीय डाक विभाग पाच लाख बचत खातेधारकांना वैयक्तिक डेबिट कार्ड देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
 • पहिल्या टप्प्यात ग्राहकांना देशभरातील 2,600 मोठ्या शाखांमध्ये कार्ड देण्यात येतील आणि सुरुवातीला पोस्टाच्या केवळ 115 एटीएममध्येच त्यांचा वापर करता येऊ शकेल.
 • पुढील मार्चअखेरपर्यंत पोस्टाचे 1 हजार नवे एटीएम सुरु होतील.
 • भारतात पोस्टाच्या 25 हजार शाखा आहेत.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.