Current Affairs of 15 July 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (15 जुलै 2018)
19 वर्षीय भारतीय तरुणाने सर केला माऊंट किलीमांजारो :
- तेलंगाणा येथील एका 19 वर्षीय तरुणाने माऊंट किलीमांजारो सर करत भारताचं नाव उज्वल केलं आहे.
- सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो हा समुद्र सपाटीपासून 5,895 मीटर उंच असून, आफ्रिकेतील टांझानियामध्ये आहे.
- तर हा महाकाय पर्वत 19 वर्षीय अमगोथ तुकाराम याने सर करत एक नवा टप्पा सर केला आहे.
- तसेच अमगोथ तुकाराम याने हेल्मेट वापराविषयीची जनजागृती करण्यासाठी ही मोहिम हाती घेतली आणि त्याची जबाबदारी पार पाडली.
Must Read (नक्की वाचा):
राष्ट्रपतींतर्फे चौघांची राज्यसभेवर नियुक्ती :
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर चार प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती केली आहे.
- त्यात शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह या चौघांना राष्ट्रपतींनी राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्त केले आहे.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवड केलेले चारही लोक हे आपल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत.
जिओ इन्स्टिट्युटच्या कुलगुरूपदी रघुनाथ माशेलकर :
- ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची नॅशनल रिसर्च प्रोफेसर म्हणून 2016 मध्ये पुन्हा नियुक्ती करण्यात आली.
- त्यापाठोपाठ आता जिओ इन्स्टिट्युटच्या कुलगुरूपदीही त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.
- रिलायन्स फाऊंडेशनने या पदासंदर्भात त्यांना विचारणा केली असल्याची माहिती समोर येते आहे. तर उपकुलगुरू म्हणून दीपक जैन यांची निवड करण्यात येऊ शकते अशीही शक्यता आहे.
- दीपक जैन हे ससिन ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटचे माजी संचालक होते. त्यांना उप-कुलगुरुपदासाठी विचारणा करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
दिनविशेष :
- 15 जुलै 1955 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.
- ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा 15 जुलै 1962 मध्ये पुणे येथे प्रारंभ.
- 15 जुलै 2006 मध्ये ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा