Current Affairs of 14 September 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (14 सप्टेंबर 2017)
संपूर्ण देशात चालणार चिकित्सेचा महाकुंभ :
- संपूर्ण देशात नि:शुल्क चिकित्सेच्या महाकुंभाच्या रूपात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा केला जाणार आहे.
- देशातील सर्व प्रमुख संस्थांच्या नेतृत्वाखाली अॅक्युप्रेशर, सुजोक, शिआत्सू, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी आदी चिकित्सा पद्धतींच्या चिकित्सकांच्या सहकार्याने हे अभियान संपूर्ण देशात 18 ते 24 सप्टेंबरदरम्यान चालणार आहे. याअंतर्गत सर्व चिकित्सक प्रत्येक दिवशी दोन तास आपल्या केंद्रांमध्ये नि:शुल्क चिकित्सा करतील.
- दोन वर्षांपूर्वी या महाअभियानास लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला. या नि:शुल्क सेवा सप्ताहाचे उद्घाटन 18 सप्टेंबर रोजी राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते आणि खा. चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत होईल.
- संयोजक जेआर अनिल जैन यांनी सांगितले की, भारतीय जीवन पद्धतीचे विकसित रूप रिफ्लेक्सोलॉजी अॅक्युप्रेशरसंदर्भात स्थानिकस्तरापासून विश्वस्तरापर्यंत जागरूकता झाली आहे.
- तसेच या सात दिवसांत स्थानिक पातळीवर अॅक्युप्रेशर चिकित्सक शिक्षण संस्था व्यावसायिक संस्थांत नि:शुल्क कार्यशाळेचे आयोजन करतील.
Must Read (नक्की वाचा):
मॅन बुकर पुरस्काराची लघुयादी जाहीर :
- 2017 सालासाठीच्या प्रतिष्ठित ‘मॅन बुकर’ पुरस्काराची लघुयादी 13 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. या यादीत ब्रिटन व अमेरिकेच्या लेखकांचा वरचष्मा आहे, मात्र दीर्घकाळापासून या यादीत राहत आलेल्या एकमेव भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा मात्र या वेळी त्यात समावेश झाला नाही.
- ‘दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या पहिल्याच पुस्तकासाठी अरुंधती रॉय यांना 1997 साली 50 हजार पौंड्सचा ‘मॅन बुकर’ साहित्यिक पुरस्कार मिळाला होता.
- ‘दि मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’ या नव्या कादंबरीसाठी त्यांचे नाव या वर्षीच्या दीर्घ यादी होते.
- ‘भारताच्या अंतर्भागातून आलेले समृद्ध आणि महत्त्वाचे पुस्तक’ असे त्याचे वर्णन परीक्षकांनी केले होते.
- तसेच 17 ऑक्टोबरला येथील गिल्डहॉलमध्ये जाहीर होणार असलेल्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी अंतिम सहा लेखकांमध्ये स्पर्धा होणार आहे.
- 3 महिला व 3 पुरुष लेखकांची नावे असलेल्या लघुयादीमध्ये ग्रामीण इंग्लंडमध्ये आपले स्वावलंबन टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुटुंबाच्या संघर्षांपासून ते नागरी युद्धाच्या काळात एका अनाम शहरातून पळून जाऊ इच्छिणाऱ्या 2 निर्वासितांच्या शृंगारिक कथेपर्यंतचे व्यापक विषय आहेत.
- 2017 साठीच्या पुरस्काराच्या परीक्षक मंडळाच्या अध्यक्ष बॅरोनेस लोला यंग या होत्या.
चकमा व हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व :
- रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न चर्चेत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकारने ईशान्य भारतातील चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.
- चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल, मात्र स्थानिक जनतेच्या अधिकारांना डावलले जाणार नाही याची दक्षता घेऊ असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
- 1960 च्या दशकात चकमा आणि हाजोंग समाजातील सुमारे एक लाख नागरिकांनी बांगलादेशमधून ईशान्य भारतात विशेषतः अरुणाचल प्रदेशमध्ये आश्रय घेतला होता. तेव्हापासून या लोकांचे भारतात वास्तव्य असून त्यांना भारताचे नागरिकत्व द्यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने 2015 मध्ये दिले होते.
- तसेच या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक घेतली. या बैठकीत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित होते. या बैठकीनंतर रिजिजू यांनी पत्रकारांना माहिती दिली.
- सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होईल आणि स्थानिक रहिवाशांचे अधिकारही कमी होणार नाही असा मार्ग काढला जाईल. कोर्टाच्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे, मात्र अनुसूचित जमातीचा दर्जा व स्थानिक लोकांचे अधिकार कमी केले जाणार नाहीत, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आवर्जून सांगितले.
दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत काँग्रेसचा विजय :
- दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (ABVP) ‘जोर का झटका’ देत काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (NSUI) दणदणीत विजय मिळवला आहे.
- ‘एबीव्हीपी’चे वर्चस्व संपुष्टात आणत ‘एनएसयूआय’ने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर कब्जा केला.
- अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनएसयूआयच्या रॉकी तुसीद याने एबीव्हीपीच्या रजत चौधरी याचा पराभव केला.
- तर उपाध्यक्षपदावरही एनएसयूआयच्या उमेदवाराने विजय मिळवला. एबीव्हीपीला सचिव आणि सहसचिवपदावर समाधान मानावे लागले.
- तसेच एनएसयूआयने चार वर्षांनी वर्चस्व मिळवले असून, या निवडणुकीत मिळवलेला विजय सर्वात मोठा असल्याचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
‘एमआरयूसी’च्या अध्यक्षपदी आशिष भसीन यांची निवड :
- ‘साउथ एशिया डेन्सू एजीस नेटवर्क’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भसीन यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ही निवड 2017-18 या वर्षासाठी आहे.
- माध्यम सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या ‘मीडिया रिसर्च यूझर्स काउन्सिल’ (एमआरयूसी) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची निवड करण्यात आली आहे.
- मुंबईत 13 सप्टेंबर रोजी झालेल्या ‘एमआरयूसी’च्या सभेत पवार यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. पवार या आधी ‘एमआरयूसी’च्या संचालक मंडळात प्रकाशकांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.
- ‘एमआरयूसी’ गेल्या दोन दशकांपासून माध्यम क्षेत्रातील विविध पैलूंवर शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करत आहे.
- तसेच इंडियन रीडरशिप सर्व्हे (आयआरएस) हे भारतातल्या वृत्तपत्र वाचकांचे सर्वांत मोठे आणि सर्वांत विश्वासार्ह सर्वेक्षण ‘एमआरयूसी’च्या वतीने केले जाते.
दिनविशेष :
- डॉ. काशीनाथ घाणेकर (14 सप्टेंबर 1932 (जन्मदिन) – 2 मार्च 1986 (स्मृतीदिन)) हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध व उत्कृष्ट अभिनेते होते. तसेच त्यांनी मराठी रंगभूमीवर देखील व्यापक काम केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा