Current Affairs of 14 September 2015 For MPSC Exams
चालू घडमिडी (14 सप्टेंबर 2015)
सर्बियाचा नोव्हाक जोकोविचला टेनिस स्पर्धेतील विजेतेपद :
- सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने कट्टर प्रतिस्पर्धी स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याच्यावर पुन्हा एकदा मात करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले.
- जोकोविचच्या टेनिस कारकिर्दीतील हे 10 वे आणि या वर्षातील तिसरे ग्रँडस्लॅम विजतेपद आहे.
- अग्रमानांकन असलेल्या जोकोविचने फेडररचा 6-4, 5-7, 6-4, 6-4 असा पराभव केला.
- जोकोविचने यंदा ऑस्ट्रेलियन आणि विंबल्डन स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे.
- त्यानंतर त्याचे या वर्षातील हे तिसरे विजेतेपद आहे.
- नोव्हाक जोकोविचची कारकीर्त :
- काउंटडाऊन – फेडरर वि. जोकोविच
- फेडडर आणि जोकोविच यांच्यात आतापर्यंत 42 सामने. जोकोविच 22, तर फेडरर 20 वेळा विजयी
- ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील यापूर्वीच्या सामन्यात जोकोविच विजयी. विंबल्डनच्या अंतिम सामन्यात जोकोविचची सरशी
- जोकोविचचे कारकिर्दीतील 10 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद
- टूरवरील यापूर्वीच्या सामन्यात फेडररची सरशी. ऑगस्टमध्ये सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फेडररचा विजय
- फेडररची पुरुष एकेरीत सर्वाधिक 17 विक्रमी विजेतीपदे
- फेडररचे यापूर्वीचे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद 2012 मध्ये. तेव्हा तो विंबल्डनमध्ये विजेता
- फेडरर अमेरिकन स्पर्धेत सलग पाच वेळा विजेता. 2004 ते 2008 मध्ये ही कामगिरी. 2009 मध्ये फेडररला उपविजेतेपद
Must Read (नक्की वाचा):
मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फाचा 130 फूट जाडीचा थर सापडला :
- मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फाचा 130 फूट जाडीचा थर सापडला असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
- हा थराचा तुकडा कॅलिफोर्निया व टेक्सास यांच्या एकत्रित क्षेत्रफळाएवढा आहे.
- लाखो वर्षांपूर्वी मंगळावर बर्फवृष्टी झाली होती त्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. नासाच्या मार्स रेकनसान्स ऑर्बिटर म्हणजेच एमआरओ या अवकाशयानावरील दोन उपकरणांनी हे संशोधन केले आहे.
- मंगळावर एक विवर भांडय़ासारखे गोलाकार नाही बाकीची सगळी विवरे भांडय़ासारखी खोलगट व गोलाकार आहेत.
- मंगळावरील अर्काडिया प्लॅनशिया भागात अशी विवरे आहेत, ती वेगवेगळ्या काळात तयार झालेली असून तेथे कशाचा तरी वर्षांव झाल्याच्या खुणा आहेत.
- एमआरओच्या जास्त विवर्तन असलेल्या प्रतिमा विज्ञान प्रयोगात (हायराइज) संशोधकांनी या विवराचे त्रिमिती प्रारूप तयार केले त्यामुळे त्यांना त्यांची खोली समजू शकली.
जर्मनीच्या महापौरपदी अशोक श्रीधरन यांची नियुक्ती :
- जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविणारे भारतीय वंशाचे अशोक श्रीधरन यांना बॉनच्या महापौरपदासाठी निवडणूकपूर्व मतदानोत्तर चाचणीमध्ये सर्वाधिक पसंती असल्याचे समोर येत आहे.
- मात्र अद्याप या तिघांपैकी कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे याबद्दलचा निर्णय जवळपास 26 टक्के म्हणजेच 2.45 लाख मतदारांनी घेतला नसल्याने खरा निकाल यानंतर लागणार आहे.
पत्रकारांसाठी फेसबुकचे मेन्शन्स अॅप उपलब्ध :
- पत्रकारांसाठी एक खुशखबर आता फेसबुकने खास त्यांच्या व्यक्तिगत वापरासाठी मेन्शन्स अॅप उपलब्ध करून दिले
- अॅप व्यवस्थापक वादिम लाव्रुसिक यांची माहिती दिली आहे.
- पत्रकारांसाठी एक खुशखबर आता फेसबुकने खास त्यांच्या व्यक्तिगत वापरासाठी मेन्शन्स अॅप उपलब्ध करून दिले असून त्याच्या माध्यमातून पत्रकारांना त्यांच्या अनुसारकांशी संवाद साधता येईल.
- शिवाय त्यांचे लेखनही पोहोचवता येईल.
- पत्रकार या माध्यमातून जास्त माहिती वाचक व अनुसारकांपर्यंत पोहोचवू शकतील.
- या अॅपचे उत्पादन व्यवस्थापक वादिम लाव्रुसिक यांनी सांगितले की, पत्रकारच नव्हे तर इतरांनाही ही सुविधा उपलब्ध राहील.
- फेसबुकने जुलै 2014 मध्ये मेन्शन्स अॅप सुरू केले होते पण ते वलयांकित म्हणजे सेलिब्रिटी व्यक्तींसाठी होते.
- जर फेसबुक वापरकर्त्यांने द रॉक असे स्टेटस अपडेट केले तर तो वापरकर्ता त्याची नवीन माहिती मेन्शन्स अॅपमध्ये टाकू शकेल व त्यावर प्रतिसादही मिळू शकेल.
- मेन्शन्स अॅप :
- तुमचे फेसबुक खाते असेल तर एक ऑनलाईन फॉर्म भरून हे अॅप डाऊनलोड करता येईल
- त्यासाठी तुमचे फेसबुक खाते खरे असले पाहिजे
- लाइव्ह माहिती, छायाचित्रे, प्रश्नोत्तरे या सुविधा
- पत्रकारांसाठी माहिती देवाणघेवाणीचे एक साधन
- अर्थात यात कुणीही खोटी माहिती देणे दिशाभूल करणारे ठरू शकते.
- वृत्तपत्र व पत्रकाराला समाजाचा प्रतिसाद समजेल
टी-20 क्रिकेट विश्वचषक रवी शास्त्री यांना संचालकपदी कायम ठेवण्याचा निर्णय :
- पुढील वर्षी भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रवी शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- रविवारी याबाबतीत अधिकृतरीत्या जाहीर करताना बीसीसीआयने शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी कायम ठेवताना संजय बांगर, भरत अरुण आणि श्रीधर या सहाय्यक प्रशिक्षकांच्या कार्यकाळामध्येही टी-20 विश्वचषकपर्यंत वाढ केली आहे.
- सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीच्या वतीने हा निर्णय घण्यात आला.
दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय :
- फोर्ब्ज मासिकाच्या ताज्या आशिया आवृत्तीतील दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय दानशूरांचा समावेश आहे.
- उल्लेखनीय दातृत्वाची दखल घेऊन 13 देशांतील दानशूर व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
- त्यात सेनापती गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी आणि एस. डी. शिबुलाल या ‘इन्फोसिस’च्या तीन सहसंस्थापकांचाही समावेश आहे.
- आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैयक्तिक दानाची दखल घेऊन त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
- नारायणमूर्ती यांचा मुलगा रोहन याने प्राचीन भारतीय साहित्याच्या प्रसार-प्रचारासाठी हार्वर्ड विद्यापीठाला 52 लाख डॉलरची मदत केली आहे.
- त्यामुळे त्याचे नावही या यादीत आहे.
- त्या व्यतिरिक्त मूळचे केरळमधील असलेले दुबईतील व्यावसायिक सनी वार्की, मूळचे भारतीय असलेले लंडनस्थित उद्योजक बंधू सुरेश आणि महेश रामकृष्णन यांचाही या यादीत समावेश आहे.
जे. मंजुळा यांची डीआरडीओच्या महासंचालकपदी नियुक्ती
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी जे. मंजुळा यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम क्लस्टर’ या विभागाची सूत्रे स्वीकारली.
- मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
- या विभागाचे महासंचालकपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंजुळा यांनी बंगळूरमधील ‘डिफेन्स ऍव्हिओनिक्स रिसर्च सेंटर’मध्ये संचालक म्हणून काम केले असून, संशोधक म्हणूनही त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे.
- मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
- हैदराबाद येथील डिफेंस इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वारफेअर विभागात 26 वर्षाहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे.
- यात त्यांनी सेना, वायु सेना, नौसेना आणि अर्ध सैन्य दलासाठी काही उपकरण आणि सॉफ्टवेअर डिजाइन केले आहेत.
- मंजुळा यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. मंजुळा यांना यापूर्वी डीआरडीओचा सर्वोत्कृष्ट कार्य व 2011 मध्ये सर्वोत्तम शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळाला आहे.
दिनविशेष :
- हिंदी दिवस
- 1917 : रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
- 1960 : ओपेकची स्थापना.
- 1999 : किरिबाटी, नौरू व टोंगाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.