Current Affairs of 14 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 मे 2018)

चालू घडामोडी (14 मे 2018)

कारागृहात तयार होणार सॅनिटरी नॅपकिन :

 • नागपूर उपराजधानीतील मध्यवर्ती कारागृहात सॅनिटरी नॅपकिन उद्योगाची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्पातून दररोज दीड ते दोन हजार नॅपकिन्स उत्पादित होणार असून ते राज्यभरातील कारागृहांमधील स्त्री बंदीवानांना पुरविण्यात येणार आहेत. कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले.
 • महाराष्ट्र कारागृह विभाग व मुंबईच्या टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प उभारण्यात आला आहे. राज्यात केवळ नागपूर मध्यवर्ती कारागृहातच या उद्योगाची उभारणी करण्यात आली आहे.
 • तसेच येथे उत्पादित होणारे नॅपकिन राज्यातील कारागृहातील स्त्री बंद्यांना पुरविण्यात येणार असल्याने खासगी पुरवठादाराकडून खरेदीची गरज आता राहणार नाही. नॅपकिन्स दर्जेदार, निर्जंतुक व आरामदायी राहणार असून त्याची किंमत प्रती नॅपकिन केवळ 2.25 रुपये राहील.
 • कोणत्याही प्रकारची शासकीय गुंतवणूक न करता स्त्री बंदी सक्षमीकरण, कौशल्य विकास तसेच महिला बंद्यांच्या मुक्ततेनंतर पुनर्वसनासाठी उद्योग अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
 • प्रकल्पात पाच मशीनचा संच असून केवळ एक मशीनला विजेची गरज आहे. राष्ट्रीय नवप्रवर्तक प्रतिष्ठानतर्फे महिला बंद्यांना नॅपकिन्स तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मे 2018)

रिझर्व्ह बॅंकेने देना बॅंकेवर निर्बंध लादले :

 • बुडीत कर्जांचा डोंगर आणि तोटा झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने देना बॅंकेवर नव्याने कर्ज वितरण करण्यास निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने देना बॅंकेवर ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ऍक्‍शन’ घेतली असून, यापुढे बॅंकेला कर्ज वितरण आणि नोकरभरती करता येणार नाही.
 • सहा महिन्यांपासून देना बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक अणि मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्‍त आहे. बॅंकेला 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत 1 हजार 225 कोटींचा तोटा झाला. सलग तिसऱ्या तिमाहीत बुडीत कर्जांत आणि तोट्यात वाढ नोंदवण्यात आली. यामुळे ‘आरबीआय’ने देना बॅंकेवर ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ऍक्‍शन’ घेतली आहे. देना बॅंकेने कॉर्पोरेटमध्ये कर्जे दिलेली आहेत. मात्र, अनेक कर्ज खाती बुडीत कर्जांमध्ये परावर्तित झाल्याने बॅंकेला भरीव तरतूद करावी लागली.
 • बॅंकेला नोकरभरती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बॅंकेतील महत्त्वाची पदे रिक्‍त आहेत. कर्ज वसुलीसाठी देना बॅंकेने कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. ग्राहकांना त्यांच्या ठेवींबाबत केंद्र सरकारने आश्‍वस्त करावे, अशी मागणी ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशनने केली.

राज्यातील थॅलेसेमियाग्रस्तांच्या संख्येबाबत संभ्रम :

 • राज्यातील सर्वत्र थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, राज्यात थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची नेमकी आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीस काहीसा वेळ लागण्याची शक्‍यता आहे. सरकार आणि रुग्णांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या आकडेवारीत तफावत आहे.
 • थॅलेसेमियाने त्रस्त सर्व रुग्णांना त्यांच्या गावाजवळच्या आरोग्य केंद्रात मोफत गोळ्या उपलब्ध होतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. असे असले तरी या आजाराचे रुग्ण किती, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. गोळ्यांची मागणी लक्षात घेऊन त्यापद्धतीने तातडीने नियोजन करण्यात येणार आहे.
 • थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे पालक आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनेसमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत रुग्णांच्या आकडेवारीतील तफावत समोर आली. सरकारी नोंदीनुसार राज्यात या आजाराचे 8 हजार, तर संस्थांच्या नोंदीनुसार 30 हजार रुग्ण आहेत. राज्यात तूर्त ही सहा ठिकाणी या गोळ्या उपलब्ध करून दिल्या जातात.

राज्यात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांची उभारणी :

 • राज्यातील मुलांना जागतिक दर्जाचे गुणवत्ता पुर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील 100 शाळा आंतराष्ट्रीय दर्जाच्या शाळांची निर्मिती केली जाणार आहे. यात शालेय शिक्षण विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागातील शाळांचा समावेष असणार आहे.
 • शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पा अंतर्गत रायगड जिल्ह्यात सात नवीन आंतराष्ट्रीय शाळांची उभारणी केली जाणार आहे. पेण, रोहा, माणगाव, महाड, पोलादपुर, श्रीवर्धन आणि म्हसळा या सात तालुक्यात या आंतराष्ट्रीय शाळांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी शासनाकडून जवळपास 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या आंतराष्ट्रीय शाळांसाठी पाच एकर जागा अपेक्षित आहे.
 • तसेच यानुसार जागा निश्चितीचे काम सुरु झाले आहे. पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद करुन, या तालुक्याच्या करून मध्यवर्ती भागात या आंतराष्ट्रीय शाळांची उभारणी केली जाणार आहे. या शाळामध्ये विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याच बरोबर आसपासच्या परिसरातून विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी स्वतंत्र बस वाहतुक व्यवस्था असणार आहे.

दिनविशेष :

 • छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला.
 • 14 मे सन 1960 रोजी ‘एअर इंडिया’ची मुंबई-न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.
 • फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झकरबर्ग यांचा जन्म 14 मे 1984 रोजी झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 मे 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.