Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 14 August 2015 For MPSC Exams

Current Affairs 13 August 2015

चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2015)

पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ यांचा भारताचा दौरा :

 • भारताशी होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा संस्था (एनएसए) पातळीवरील चर्चेसाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहारासंबंधीचे पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ या चर्चेसाठी 23 ऑगस्ट रोजी भारताचा दौरा करतील.
 • याविषयी नवी दिल्लीतून तारखेचा प्रस्ताव देण्यात आल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर याबाबतची घोषणा झाली.
 • भारताने नवी दिल्लीत 23-24 ऑगस्टला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अझीझ यांच्या दरम्यान बैठकीचा प्रस्ताव सादर केला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2015)

मॅगी नूडल्सवरील बंदी उच्च न्यायालयाने केली रद्द :

 • मॅगी नूडल्सवर बंदी घालण्याचा सरकारचा आदेश आज उच्च न्यायालयाने रद्द केला. Maggi
 • मात्र, मॅगीच्या उत्पादनांची पुन्हा चाचणी होईपर्यंत म्हणजे सहा आठवडेतरी त्यांना विक्रीची परवानगी मिळणार नाही.
 • आता मॅगीच्या नऊ उत्पदनांचे प्रत्येकी पाच नमुने पंजाब, जयपूर व हैदराबाद येथील स्वतंत्र प्रयोगशाळांमध्ये (लॅबोरेटरी) तपासणीसाठी पाठवावे लागतील.
 • त्यात मॅगी उत्तीर्ण झाली तरच त्यांना पुन्हा उत्पादन आणि विक्री सुरू करण्याची परवानगी मिळेल.
 • मॅगीच्या नमुन्यांमध्ये शिशाचे प्रमाण ठरलेल्या मानकांपेक्षा जास्त असल्याचे कारण देऊन ही बंदी लादण्यात आली होती.
 • फूड सेफ्टी स्टॅंडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडियाने पाच जून रोजी ही बंदी लादली होती.
 • मॅगीच्या विविध प्रकारच्या नऊ उत्पादनांवर ही बंदी लादण्यात आली होती.

ट्विटरच्या “डायरेक्‍ट मेसेज सर्व्हिस”च्या कॅरॅक्‍टर मर्यादेत वाढ :

 • जगातील आघाडीची मायक्रोब्लॉगिंग साइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरच्या “डायरेक्‍ट मेसेज सर्व्हिस”च्या (डीएमएस) कॅरॅक्‍टर मर्यादेत आज मोठी वाढ करण्यात आली आहे.Twitter
 • आता ही मर्यादा 140 कॅरेक्‍टरवरून दहा हजारांवर नेण्यात आली आहे.
 • यामुळे युजर्सना त्यांच्या मित्रांना खासगी संदेश पाठविणे सहज शक्‍य होईल.
 • “डायरेक्‍ट मेसेज सर्व्हिस लिमिटलेस” असावी म्हणून हा बदल करण्यात आला आहे.
 • तत्पूर्वी जून महिन्यामध्येच कंपनीने कॅरॅक्‍टर लिमिटच्या मर्यादेत वाढ करण्याची घोषणा केली होती.

आधार कार्ड असलेच पाहिजे अशी कोणतीही सक्ती नाही :

 • केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असलेच पाहिजे, अशी कोणतीही सक्ती नाही असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या Adhar Cardघटनापीठाने 11 ऑगस्ट रोजी दिला आहे.
 • तसेच “आधार कार्ड आवश्यक आहे परंतु सक्तीचे नाही” हे सामान्य लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
 • एका याचिकेद्वारे आधार कार्ड आणि व्यक्तीच्या खासगीपणाच्या मूलभूत हक्कालाच न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले होते.
 • या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्या. जे. केलामेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने आधार कार्ड सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले.

उत्तराखंडमध्ये प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी :

 • उत्तराखंडमधील नदीकिनाऱ्याच्या भागात प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे.
 • गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आणि सभोवतालच्या परिसरातील प्लॅस्टिक प्रदूषणाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • भाविक आणि पर्यटक पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या घेऊन येथे येतात, आणि नदीकिनारी फेकून देतात.
 • हा प्लॅस्टिक कचरा नदी पात्रातच राहतो, त्यामुळे नदीची मोठ्या प्रमाणावर हानी होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिनविशेष :

 • पाकिस्तान स्वातंत्र्य दिन
 • पेराग्वे ध्वज दिन
 • 1921 : तन्नु तुव्हा या राष्ट्राची रचना.
 • 1947 : पाकिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • 1971 : बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • 2006 : इस्रायेल व लेबेनॉनमध्ये युद्धबंदी लागू.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2015)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World