Current Affairs of 13 October 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2017)

चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2017)

गौतम बंबावाले भारताचे चीनमधील राजदूत :

 • ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी आणि भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांची भारताचे चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने 12 ऑक्टोबर रोजी ही घोषणा केली.
 • बंबावाले मूळचे पुण्याचे आहेत. ते भारतीय परराष्ट्र सेवेतील 1984च्या तुकडीचे अधिकारी आहेत. बंबावाले यांचा भारत-चीन संबंधांचा गाढा अभ्यास आहे.
 • परराष्ट्र सेवेत असताना परकी भाषा शिकण्यासाठी त्यांनी चिनी भाषेची निवड केली होती. हाँगकाँग आणि बीजिंग येथे त्यांनी 1985 ते 1991 काळात सेवा केली आहे.
 • अमेरिकाविषयक विभागाचे ते संचालकही होते. बीजिंगमध्ये दूतावासातील उपप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
 • चीनमधील भारताचे विद्यमान राजदूत विजय गोखले यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते लवकरच पदभार सांभाळतील.

भारतीय युवक ऑन-जॉब ट्रेनिंगसाठी जपानला जाणार :

 • कौशल्य विकास योजनेतंर्गत केंद्र सरकार देशातील 3 लाख युवकांना जपानमध्ये 3 ते 5 वर्षांसाठी ऑन-जॉब ट्रेनिंगसाठी पाठवणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्रीर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
 • विशेष म्हणजे, भारतीय टेक्निकल इंटर्न्सच्या कौशल्य प्रशिक्षणावर येणारा खर्च जपान करणार आहे.
 • कौशल्य विकास मंत्री प्रधान म्हणाले की, कॅबिनेटने भारत आणि जपान यांच्यादरम्यान टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्रॅम (टीआयटीपी) बाबत होणाऱ्या कराराला (एमओसी) मंजुरी दिली आहे. आगामी जपान दौऱ्यात या एमओसीवर स्वाक्षरी होईल, असे प्रधान यांनी सांगितले.
 • तसेच प्रधान हे टोकियोच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असून दिनांक 16 ऑक्टोबर रोजी त्यांच्या दौऱ्याला प्रारंभ होईल.

माईण गावचे सरपंचपद सहाव्यांदा बिनविरोध निवड :

 • सिंधुदुर्गातील 325 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडीत गावविकासात ऐतिहासिक पाऊल टाकणारे कणकवली तालुक्‍यातील माईण गावचे तुळशीदास दहिबांवकर हे तब्बल सहाव्यांदा बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आले आहेत. या गावाने गेल्या 25 वर्षांत विकासाकडे झेप घेतली आहे. याचे श्रेय गावातील सुजाण लोकांना जाते. गावविकासासाठी लोकांचा हा सहभाग म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरची ही परिवर्तनाची नांदी आहे.
 • राज्यात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 16 ऑक्‍टोबरला मतदान होत आहे. जिल्ह्यात 235 पैकी 46 सरपंच आणि 926 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सरपंचपदासाठी या खेपेस 867 आणि सदस्यपदासाठी 3525 उमेदवार रिंगणात आहेत.
 • मात्र, खऱ्या अर्थाने थेट सरपंच निवडीत गावच्या सहमतीतून बिनविरोध ठरलेल्या उमेदवारांवर गावच्या लोकांनी विश्‍वास टाकला, असे म्हणता येईल. गाव विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना लोकसहभागा शिवाय राबविणे अशक्‍य आहे.
 • सिंधुदुर्गाचा विचार करता जिल्हा परिषदेने अनेक मोहिमेत देशात पहिला क्रमांक पटकावला. याचे श्रेय लोकसहभागातून पुढे आलेल्या ग्रामपंचायतींना आहे.
 • तसेच तंटामुक्तीपासून हागणदारीमुक्ती आणि स्वच्छता मोहिमेपासून वृक्ष लागवडीपर्यंत विकास साधण्यासाठी जे लोक पुढाकार घेत आहेत त्याच गावचा विकास प्रगतिपथावर आहे.

युनेस्कोमधून अमेरिका बाहेर पडणार :

 • संयुक्त राष्ट्रांची सांस्कृतिक संस्था असलेली युनेस्को इस्रायलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करून अमेरिकेने या संस्थेतून बाहेर पडत असल्याचे 12 ऑक्टोबर रोजी जाहीर केले आहे.
 • या संस्थेतून अमेरिका 31 डिसेंबर 2018 पासून बाहेर पडणार आहे, तोपर्यंत अमेरिका युनेस्कोची पूर्ण सदस्य राहणार आहे.
 • संस्थेमध्ये मूलभूत सुधारणा करण्याची गरज आणि सातत्याने इस्रायलविरोधी भूमिका घेतल्याने अमेरिकेला वाटणारी चिंता या निर्णयातून प्रतिबिंबित होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नॉएर्ट यांनी म्हटले आहे.
 • युनेस्कोच्या महासंचालक आयरिना बोकोव्हा यांना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपला निर्णय कळविला आहे, मात्र बिगरसदस्य म्हणून अमेरिका संस्थेसोबत असल्याचेही महासंचालकांना सूचित करण्यात आले आहे. अमेरिकेचा हा निर्णय दोघांनाही नुकसानीचा ठरणार असल्याचे मत बोकोव्हा यांनी नोंदविले आहे.
 • तसेच बोकोव्हा यांच्या सदस्यत्वाचा कार्यकाल संपत आहे. या जागेसाठी 13 ऑक्टोबर रोजी निवडणूक आहे. मतदानाला एक दिवस शिल्लक राहिला असताना अमेरिकेने युनेस्कोतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

1 नोव्हेंबरला आशिष नेहरा निवृत्ती घेणार :

 • भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने 12 ऑक्टोबर रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ट्‌वेंटी-20 सामना हा नेहराचा शेवटचा सामना असेल.
 • हैदराबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेहरा म्हणाला, ‘घरच्या मैदानावर निवृत्त होण्यासारखी दुसरी मोठी संधी मिळू शकत नाही! निवृत्तीसंदर्भात मी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशी चर्चा केली होती.’ निवृत्तीनंतर ‘आयपीएल’मध्येही खेळणार नसल्याचे नेहराने स्पष्ट केले आहे.
 • ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी नेहराला संघात स्थान दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करणाऱ्या भारतीय संघात 38 वर्षीय नेहराला स्थान कसे काय, असा प्रश्‍न अनेक तज्ज्ञांनी उपस्थित केला होता.
 • 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलेल्या नेहराला सर्वाधिक यश मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच मिळाले. पदार्पणानंतर चार वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील भारताच्या अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीमध्ये नेहराचा वाटा मोठा होता. याच स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध त्याने 23 धावांत सहा गडी बाद केले होते.
 • तसेच जवागल श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद यांच्या निवृत्तीनंतर झहीर खान आणि नेहरा यांनी भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली होती.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.