Current Affairs of 13 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 मे 2018)

चालू घडामोडी (13 मे 2018)

नासा मंगळावर हेलिकॉप्टर पाठवणार :

  • अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था 2020 मध्ये मंगळावर लहान हेलिकॉप्टर पाठवणार असून ते निर्मनुष्य ड्रोन सारखे असणार आहे. तसेच त्याचा मंगळाच्या संशोधनासाठी उपयोग होणार आहे.
  • दी मार्स हेलिकॉप्टर असे या उपकरणाचे नाव असून त्याचे वजन चार पौंड म्हणजे 1.8 किलो आहे. त्याचा मुख्य भाग सॉफ्टबॉलच्या आकाराचा आहे.
  • हेलिकॉप्टर मार्स 2020 रोव्हर गाडीला लावले जाणार आहे. रोव्हर गाडी मंगळावरील वातावरण वसाहतीस योग्य आहे की नाही याचा अंदाज घेईल. तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती व पूर्वीच्या सजीवसृष्टीचे पुरावे, मानवाला तेथे असलेले संभाव्य धोके यांचाही अभ्यास यात केला जाणार आहे.
  • मार्स 2020 मोहीम जुलै 2020 मध्ये आयोजित करण्यात आली असून फेब्रुवारी 2021 मध्ये रोव्हर गाडी हेलिकॉप्टरसह मंगळावर पोहोचेल.
  • नासाने अवकाश इतिहासात अनेक गोष्टी प्रथम करण्याचा मान मिळवला आहे, त्यात मंगळावर हेलिकॉप्टर पाठवण्याचा उपक्रमही समाविष्ट आहे.मंगळाच्या आकाशात हेलिकॉप्टर उडवणे ही वेगळीच संकल्पना आहे, कुठल्याही देशाने अजून मंगळावर हेलिकॉप्टर उडवलेले नाही.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 मे 2018)

मुक्तिनाथ मंदिराला भेट देणारे मोदी पहिले परदेशी नेते :

  • नेपाळच्या प्रसिद्ध मुक्तिनाथ मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. हे मंदिर बौद्ध व हिंदुधर्मीयांसाठी सारखेच पवित्र क्षेत्र आहे. या मंदिरात प्रार्थना करणारे मोदी हे पहिलेच जागतिक नेते ठरले आहेत.
  • तसेच मोदी यांनी बागमती नदीच्या तीरावरील पशुपतिनाथ मंदिरातही भेट दिली. पशुपतिनाथ मंदिर हे नेपाळमधील सर्वात जुने शिवमंदिर आहे. पशुपतिनाथ मंदिरात भेट दिल्यानंतर मोदी यांनी अभ्यागतपुस्तिकेत स्वाक्षरी केली.
  • मुक्तिनाथ मंदिर हे 12172 फूट उंचीवर असून, ते भारत व नेपाळ यांच्यातील मोठा सांस्कृतिक दुवा आहे. या मंदिरात मानवी आकाराची विष्णूची सोन्याची मूर्ती आहे.

आता रेल्वेतही ब्लॅक बॉक्स :

  • रेल्वे अपघात आणि त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण आपल्याकडे कायमच जास्त असल्यामुळे यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रेल्वेमध्ये विमानाप्रमाणेच ब्लॅक बॉक्स असणार आहे.
  • ही नवी प्रणाली असलेल्या रेल्वेच्या डब्यांचं अनावरण नुकतेच रायबरेली येथे करण्यात आले आहे.
  • रेल्वेतील ब्लॅक बॉक्स विमानातील ब्लॅक बॉक्सच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आणि अत्याधुनिक असतील.
  • तसेच विमानातील ब्लॅक बॉक्स अपघात रोखू शकत नाहीत. मात्र स्मार्ट कोचेसमधील ब्लॅक बॉक्स अपघात रोखू शकतात.
  • या बॉक्सच्या माध्यमातून रेल्वेच्या अंतर्गत वायर्सचे तापमान मोजण्याचे काम करण्यात येईल. तसेच रेल्वेमध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या केबल्सची स्थिती यामध्ये मोजण्यात येईल. त्यामुळे शॉर्टसर्किटमुळे होणारे नुकसान टाळता येईल.

चीनसह 11 देशांतील 200 प्रदर्शक 1000 पेक्षा जास्त उत्पादने-तंत्रज्ञान करतील सादर :

  • चीनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅप्लिकेशन प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे.
  • दोन दिवसांच्या या प्रदर्शनात 10 देशांतील 200 पेक्षा जास्त प्रदर्शक आले आहेत. त्यांनी एक हजारपेक्षा जास्त एआय उत्पादने आणि कल्पना सादर केल्या आहेत.
  • या प्रदर्शनात लोकांना रोबोट्स आणि विअरेबल डिव्हाइसचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे.
  • जगभरात नोंदणी केलेल्या एकूण पेटंट पैकी 22 टक्के पेटंट चीनचे आहेत.

आठवीच्या पुस्तकात बाळ गंगाधर टिळकांविषयी वादग्रस्त उल्लेख :

  • मथुरेतील एका प्रकाशकाने छापलेल्या आठवीच्या समाजशास्त्राच्या संदर्भ पुस्तकात ‘बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक’ असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ’ या धड्यामध्ये टिळकांचा दहशतवादाचे जनक असा उल्लेख करण्यात आला.
  • टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात असे यामध्ये म्हटले आहे.
  • ब्रिटीश अधिकाऱ्यांना विनंती करुन स्वातंत्र्य मिळणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला.

दिनविशेष :

  • जागतिक मातृत्व दिन
  • 1939 मध्ये अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.
  • भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन 1952 मध्ये भरले.
  • भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना 1962 मध्ये भारतरत्‍न मिळाला.
  • 1998 मध्ये भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण येथे केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 मे 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.