Current Affairs of 13 July 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (13 जुलै 2018)
स्वदेशी तज्ज्ञांवरच ‘पीएमओ’ची भिस्त :
- नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशाची सत्ता हाती घेतली तेव्हा त्यांनी परदेशात प्रशिक्षित अर्थशास्त्रज्ञांकडे देशाची आर्थिक धोरणे ठरवण्याची जबाबदारी सोपवली होती. यामध्ये रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पानगडिया आणि देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांची प्रामुख्याने नावे घेता येतील.
- मात्र, या सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण होण्याआधीच पुन्हा परदेशात जाण्याची वाट धरली. धोरणे ठरवण्याचे बहुतांश काम हे पंतप्रधान कार्यालयाकडूनच (पीएमओ) केले जात असल्याने आता देशातीलच अर्थतज्ज्ञच सध्या पीएमओची कामे पाहत आहेत.
- रघुराम राजन यांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नियुक्त केले होते. पंतप्रधान मोदींनी त्यांनी आपल्या पदावर कायम ठेवले होते. अरविंद पनगडिया हे नीति आयोगाचे उपाध्यक्ष होते. तर अरविंद सुब्रमण्यम हे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम करीत होते. त्यानंतर हे तिघेही एकामागे एक आपली पदे सोडून परदेशात निघून गेले.
- राजन, पनगडिया हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. तर सु्ब्रमण्यम हे आपल्या वैयक्तिक कारणांमुळे अमेरिकेत परतले असून ते शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. सुब्रमण्यम यांनी आयएमएफमध्येही काम केले आहे.
Must Read (नक्की वाचा):
फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड :
- समाजमाध्यमांमध्ये अग्रेसर असलेल्या फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज अॅनालिटिका डेटा चोरीप्रकरणी फेसबुकला पहिला दणका बसला आहे.
- वापरकर्त्यांचा डेटा गोपनीय राखण्यात फेसबुकला अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे माहिती आयुक्त एलिझाबेथ डेनम यांनी सांगितले.
- फेसबुकला जवळपास सहा लाख 60 हजार डॉलर म्हणजे 4.56 कोटी रुपयांचा दंड ब्रिटनच्या माहिती नियंत्रकांकडून ठोठावण्यात आला आहे. या कारवाईनंतर इतर देश फेसबुकवर कोणती कारवाई करतात त्याकडे सर्वाचे लक्ष आहे.
- जवळपास पाच कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्याने फेसबुक आणि केम्ब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली होती.
- केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने फेसबुक युजर्सचा डेटा, त्यांच्या लाइक्स आदी माहितीचा वापर 2016 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केल्याचे समोर आले.
इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली :
- मागील 5 महिन्यांच्या विचार करता जून महिन्यात महागाई सर्वात जास्त प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 5 टक्क्यांच्या वर गेला. मे महिन्यात हा दर 4.87 टक्के होता. इंधन दरवाढीमुळे ही महागाई वाढल्याचीही माहिती समोर आली आहे.
- केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. आरबीआयने महागाईबाबतच जो अंदाज व्यक्त केला होता त्यापेक्षा हा दर जास्त आहे. आरबीआयने महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत स्थिरावेल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र जून महिन्यात हा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला असल्याची माहिती समोर आली आहे.
- अर्थव्यवस्थेसाठी या वर्षातली चिंतेची बाब ठरली आहे ती म्हणजे औद्योगिक क्षेत्रातले उत्पादन घटणे ही होय. मे महिन्यात औद्योगिक उत्पादनाचे प्रमाण 3.2 टक्के होते. तर एप्रिल महिन्यात हे प्रमाण 4.9 टक्के होते.
इंडस्ट्रियल प्रॉडक्शनमद्ये स्लोडाऊन कोअर सेक्टर इंडस्ट्रीज च्या प्रगतीत कमकुवतता दाखवणारा आहे. कोअर सेक्टर इंडस्ट्रीजची वाढ मे महिन्यात 3.6 टक्के होती. तर एप्रिल महिन्यात हे प्रमाण 4.6 टक्के होते.
मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही :
- मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरुन मुंबई हायकोर्टाने फटकारले असतानाच आता राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
- मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये तशी बंदी असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली.
400 मीटरमध्ये हिमाचे ऐतिहासिक सुवर्णपदक :
- आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेतील भारताचा ट्रॅक प्रकारातील सुवर्णपदकाचा दुष्काळ हिमा दासने संपुष्टात आणला. तिने 20 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत 51.46 सेकंद अशी वेळ देताना सुवर्णपदकावर नाव कोरले.
- भारताने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स महासंघातर्फे आयोजित विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत सिनिअर, ज्युनिअर व युवा गटात मिळवून पाच पदके जिंकली आहेत. मात्र, ही पाचही पदके फिल्ड इव्हेंटमधील आहेत.
- ट्रॅक इव्हेंटमधील हे पहिलेच यश सोनेरी ठरले. 18 वर्षीय हिमाने गेल्या वर्षी नैरोबी येथे झालेल्या विश्व युवा स्पर्धेत दोनशे मीटर शर्यतीत पाचवे स्थान मिळवले होते.
- निपुन दास यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या हिमाने चौथ्या लेनमधून पळताना संथ प्रारंभ केला. शेवटचे शंभर मीटर अंतर शिल्लक असताना तिने नेहमीप्रमाणे वेग वाढवून सुवर्णपदकाला गवसणी घातली.
- रुमानियाच्या आंद्रीया मिक्लोसने हिमाला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला 52.07 सेकंदात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेची मॅन्सन टेलर ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.
दिनविशेष :
- 13 जुलै 1660 मध्ये पावनखिंड लढवून ‘बाजीप्रभू देशपांडे‘ यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.
- सन 1908 या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी मिळाली.
- जतिंद्रनाथ दास यांनी सन 1929 मध्ये लाहोर तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा