Current Affairs of 13 January 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (13 जानेवारी 2017)
नटराजन चंद्रशेखरन टाटा सन्सचे नवे अध्यक्ष :
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी 12 जानेवारी रोजी निवड करण्यात आली.
- टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना 24 ऑक्टोबर रोजी हटविण्यात आले होते.
- मिस्त्री यांना हटविल्यानंतर सुमारे तीन महिन्यानंतर चंद्रसेखरन यांची निवड करण्यात आली.
- दरम्यान, सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आल्यानंतर त्यांनी टाटा समूहातील सहा कंपन्यांच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.
- तसेच टीसीएस 2009 पासून भारतातील सर्वात मोठी आउटसोर्सर कंपनी आहे.
Must Read (नक्की वाचा):
विजेंदर सिंहला सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार :
- स्टार बॉक्सर विजेंदर सिंह याला 12 जानेवारी रोजी दिल्ली क्रीडा पत्रकार संघातर्फे वार्षिक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
- तसेच त्याला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, तर ज्युनियर हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांना सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात आले आहे.
- भारताचे ऑलिम्पियन आणि विश्व चॅम्पियन पदकविजेते महान पैलवान आणि प्रशिक्षक महाबली सत्पाल यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
पाणबुडी आयएनएस खांदेरीचे जलावतरण :
- स्कॉर्पिन श्रेणीतील दुसरी आयएनएस खांदेरी या पाणबुडीचे 12 जानेवारी रोजी माझगावमध्ये जलावरतण करण्यात आले.
- मुबंईतील माझगाव डॉक शिपबिलर्ड्स लिमिटेड (एमडीएल) येथे झालेल्या या कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा यांच्या उपस्थितीत जलावतरण करण्यात आले.
- एमडीआयएल आणि डीसीएनएस या फ्रेंच कंपनीच्या सहभागातून पाणबुडीची बांधणी करण्यात आली. यावर्षी डिसेंबरपर्यंत पाणबुडीच्या सर्व चाचण्या घेऊन ती नौदलात सहभागी करण्यात येणार आहे.
- तसेच सुरक्षेच्यादृष्टीने सागरीसिद्धता तपासली जाईल. या पाणबुडीवर जहाजांवर मारा करणारी क्षेपणास्त्रे ही लावण्यात येणार आहेत.
- मराठा राजवटीने 17 व्या शतकात युद्धासाठी समुद्रात खांदेरी बेटाचा वापर केला होता. त्यामुळे या पाणबुडीला नाव देण्यात आले आहे.
एच-1बी व्हिसाचे नियमन कडक :
- डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, एच-1बी आणि एल1 व्हिसाचा गैरवापर रोखण्यासाठी कायदेशीर उपायांसह विविध प्रकारची पावले उचलली जातील, असे प्रतिपादन सिनेटर जेफ सेशन यांनी केले आहे.
- तसेच या निर्णयाचा सर्वाधिक फटका अर्थात, भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि त्या क्षेत्रातील भारतीय यांनाच बसणार आहे.
- ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारातही आपली ही भूमिका बोलून दाखवली होती. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी केलेले विधान म्हणून त्याकडे पाहिले गेले.
- आता अॅटर्नी जनरल होणाऱ्या व्यक्तीने तीच भूमिका मांडल्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
- जेफ सेशन यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅटर्नी जनरल या पदासाठी नियुक्त करण्याचे ठरविले आहे.
‘एमसीए’च्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती :
- जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी उपाध्यक्ष आशिष शेलार यांची एकमताने निवड झाली.
- तसेच त्यावेळी विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर या समिती सदस्यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
- लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी मान्य करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सुनावताना अनुराग ठाकूर व अजय शिर्के यांची अनुक्रमे अध्यक्ष व सचिवपदावरुन उचलबांगडी केली. या निर्णयानंतर बीसीसीआयशी संलंग्न सर्वच राज्य संघटनांचे धाबे दणाणले होते आणि लोढा शिफारशीनुसार जे-जे पदाधिकारी नियमबाह्य ठरत होते त्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरु झाले होते.
- लोढा शिफारशीनुसार 70 वर्षांहून अधिक वयाची व्यक्ती क्रिकेट प्रशासक म्हणून कोणत्याही पदावर कार्यरत राहू शकत नव्हती. यानुसार पवार यांना प्रशासकाच्या मैदानातून बाहेर पडणे अनिवार्य होते आणि नुकताच 17 डिसेंबरला त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आहे.
दिनविशेष :
- 13 जानेवारी 1640 रोजी गॅलिलियोने गुरूचा चौथा उपग्रह, कॅलिस्टोचा शोध लावला.
- मिकी माउसची चित्रकथा प्रथम 13 जानेवारी 1930 रोजी प्रकाशित झाली.
- 13 जानेवारी 1938 हा भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्मदिन आहे.
- 13 जानेवारी 1957 रोजी हिराकूड धरणाचे उदघाटन करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा