Current Affairs of 13 February 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (13 फेब्रुवारी 2017)
अंधांच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन :
- अंधांच्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव करत विश्वकरंडक जिंकला.
- एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 198 धावांचे आव्हान ठेवले होते.
- भारताने हे आव्हान अवघ्या एक गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताकडून बदर मुनीरने 57 धावांची खेळी केली.
- टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कटट्र प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष या लढतीकडे होते. अखेर भारताने यामध्ये यश मिळविले.
- तसेच याआधी ही भारताने 2013 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. विजेतेपद कायम राखण्यात भारताला यश आले आहे. भारताने उपांत्य फेरीत गतविजेत्या श्रीलंकेला दहा विकेट राखून पराभूत केले होते.
Must Read (नक्की वाचा):
इराण फज्र बॅडमिंटन स्पर्धेत अर्जुन-श्लोकला विजेतेपद :
- अर्जुन मादाथील रामचंद्रन आणि रामचंद्रन श्लोक या युवा भारतीय जोडीने 12 फेब्रुवारी रोजी येथे 26 व्या इराण फज्र बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
- व्दितीय मानांकित भारतीय जोडीने अवघ्या 25 मिनिटांतच केनास अदी हरयांतो आणि मोहम्मद रेजा पहलेवी या इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित जोडीवर 11-8, 11-8, 11-9 असा विजय मिळवीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
- जागतिक क्रमवारीतील 66 वी मानांकित जोडी आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी ही पहिली जोडी आहे. या जोडीचे हंगामाच्या सुरुवातीला मलेशिया ग्रां.प्री. गोल्डच्या दुसऱ्या फेरीत आणि सय्यद मोदी ग्रां.प्री. गोल्डच्या सुरुवातीलाच आव्हान संपुष्टात आले होते.
- तसेच या दोघांनी नेपाळ आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते आणि गेल्या वर्षी टाटा इंडिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी उपविजेतेपद मिळवले होते.
रविचंद्रन आश्विनचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम :
- भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी सर्वांत कमी कसोटी सामन्यांत 250 बळी घेण्याचा विक्रम नोंदवला.
- आश्विनने 45 कसोटी सामन्यांत हा पराक्रम करताना ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज डेनिस लिलीचा विक्रम मोडला. लिलीने 48 कसोटी सामन्यांत हा पराक्रम केला होता. आश्विनने बांगलादेशच्या पहिल्या डावात 2 बळी घेत या विक्रमाला गवसणी घातली.
- अनिल कुंबळे (619), कपिल देव (434), हरभजन सिंग (417), झहीर खान (311) आणि बिशनसिंग बेदी (266) यांच्यानंतर 250 कसोटी बळी घेणारा आश्विन सहावा भारतीय गोलंदाज ठरला.
- आश्विनने यंदाच्या मोसमात आतापर्यंत 59 बळी घेतले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावाच्या अखेरपर्यंत त्याने 24 वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले असून सामन्यांत सात वेळा 10 किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. त्याने चार शतके झळकावताना 1816 धावा फटकावल्या आहेत.
“डीआरडीओ” कडून ‘इंटरसेप्टर’ची यशस्वी चाचणी :
- भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावरून क्षेपणास्त्रभेदी (इंटरसेप्टर) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीच्या यशामुळे भारताने व्दिस्तरीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने पुढील पाऊल टाकले आहे.
- सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी येथील अब्दुल कलाम बेटावरून (व्हीलर बेट) इंटरसेप्टरची चाचणी घेतली गेली.
- जमिनीपासून हवेत पन्नास किमीच्या वरील उंचीवर असणाऱ्या लक्ष्याचा भेद करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असल्याचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांनी सांगितले.
- तसेच या चाचणीदरम्यान इंटरसेप्टरने बंगालच्या उपसागरात दोन हजार किमी अंतरावरून सोडलेल्या चाचणी लक्ष्याचा अचूक भेद केला. यासाठी इंटरसेप्टरने रडार आणि दिशादर्शन यंत्रणेचा वापर केला.
दिनविशेष :
- 13 फेब्रुवारी 1879 हा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन आहे.
- गायक पं भीमसेन जोशी यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1922 रोजी झाला.
- 13 फेब्रुवारी 1984 रोजी भारतातील पहिले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा