Current Affairs of 12 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 मे 2016)

चालू घडामोडी (12 मे 2016)

भारतीय नौदलात ऐतिहासिक क्षणांची नोंद :

 • नौदलात तीस वर्षे सेवेत असलेल्या सी-हॅरिअर्सची जागा (दि.11) नव्या दमाच्या मिग-29 के लढाऊ विमानांनी घेतली.
 • भारतीय नौदलाच्या इतिहासात यावेळी ऐतिहासिक क्षणांची नोंद झाली.
 • दाबोळी येथील आयएनएस हंसा तळावर सी-हॅरिअर्सला निरोप देऊन मिग-29 के विमानाचे स्वागत करण्यात आले.
 • सी-हॅरिअर्स आणि मिग-29 के विमानांचे नेत्रदीपक संचलन झाले.
 • ‘मिग-29 के’ हे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे.
 • प्रतिमिनिट साठ हजार फुटांवरून उड्डाण करण्याची त्याची क्षमता आहे.
 • तसेच मल्टिमोडल रडारवर ते येत नाही. एका मिनिटात शून्य ते एक हजार प्रति किलोमीटर नॉटिकल मैल या वेगाने झेपाविण्याची या विमानाची क्षमता आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 मे 2016)

नाना पाटेकर यांना चित्ररत्न पुरस्कार जाहीर :

 • मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘सह्याद्री नवरत्न’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना चित्ररत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • तसेच संगीतकार अजय-अतुल संगीतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
 • त्याचप्रमाणे उद्योजक अनिल जैन यांना वैभवरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 • सह्याद्री वाहिनीच्या वतीने संगीत, चित्रपट, शिक्षण, नाट्य, क्रीडा, पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘नवरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
 • ‘नवरत्न’ पुरस्कारांचे हे 15 वे वर्ष असून सुरुवातीपासून ‘गोदरेज’ या सोहळ्याचे प्रायोजक आहे़.
   
 • राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘नवरत्न’ पुरस्कार सोहळा होणार आहे.

राज्यात होणार खनिज सर्वेक्षण :

 • भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाद्वारे 2016-17 मध्ये खनिज सर्वेक्षण समन्वेषणाच्या एकूण 10 योजना राज्यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित केले आहे.
 • तसेच यामध्ये प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात चुनखडक, चंद्रपूर जिल्हा लोह खनिजासाठी, अहमदनगर, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील सामान्य सर्वेक्षण योजनांचा समावेश आहे.
 • महाराष्ट्र राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची 52 वी बैठक नागपूर येथे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
 • यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व केंद्र शासनाच्या भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण विभाग व इतर यंत्रणेद्वारे कार्यसत्र 2015-16 मध्ये महाराष्ट्र राज्यात केलेल्या भूवैज्ञानीय सर्वेक्षण व खनिज समन्वेषण कार्याचा आढावा घेण्यात आला.
 • तसेच 2016-17 मध्ये संबंधित विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या भूवैज्ञानीय कार्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.

‘आरएसएस’च्या गीताचा पाठ्यपुस्तकात समावेश :

 • जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात गुजरात राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय पुस्तकात देशभक्ती, भारत माता आणि भारतीय संस्कृतीस स्थान देण्यात येणार आहे.
 • ‘गुजरात स्टेट स्कूल टेक्स्टबुक बोर्ड’ नववी आणि दहावीच्या हिंदी प्रथम भाषा आणि हिंदी द्वितिय भाषेच्या पुस्तकात ‘मनुष्य तू बंदा महान है’ या गीताचा समावेश करणार आहे.
 • पंडित भारत व्यास यांनी लिहिलेले हे गीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ्याच्या शाखांमध्ये गायले जाते.
 • तसेच याशिवाय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलेल्या ‘कदम मिलाकर चलना होगा’ गीताचादेखील पुस्तकात समावेश होणार आहे.
 • ‘गुजरात स्टेट स्कूल टेक्स्टबुक बोर्ड’ देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या आत्मकथेतील एका भागाचादेखील शालेय पुस्तकामध्ये समावेश करणार आहे.
 • पंडीतजींच्या आत्मचरित्रातील या भागात नेहरूंनी रोहतकच्या (हरियाण) शेतकऱ्यांना ‘भारत माता की जय’ विषयी संबोधित केले आहे.
 • दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजस्थान बोर्डाच्या शालेय पुस्तकातून जवाहरलाल नेहरूं संबंधीचा भाग काढून टाकण्यात आला होता.
 • ‘गुजरात स्टेट स्कूल टेक्स्टबुक बोर्ड’च्या निर्णयाविषयी बोलताना बोर्डाचे अध्यक्ष नितीन पेठानी म्हणाले की, यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे… साहित्याच्या माध्यमातून आम्ही हे अतिशय प्रभावीपणे केले आहे… यामुळे युवकांमध्ये हळूहळू कमी होत चाललेली देशप्रेमाची भावना निर्माण होईल.

बॅंकेतील बचत खात्यात महत्वाचे बदल :

 • बॅंकेतील बचत खात्यात काहीच (शून्य) रक्कम शिल्लक नसल्यास बँक दंड म्हणून त्याच्या खात्यावरील रक्कम उणे (मायनस) करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) घेतला आहे.
 • आरबीआयने या संदर्भात बँकांना दिलेल्या सूचनेनुसार, बचत खात्यातील किमान रक्कम (मिनिमम बॅलेन्स) शून्य झाल्यानंतर देखभाल शुल्क (मेंटनंन्स चार्जेस) न आकारण्याचे आदेश दिले आहेत.
 • बचत खात्यात रक्कम शिल्लक नसताना त्यावर कोणतीही बॅंक दंड किंवा शुल्क आकारत असल्यास ग्राहक त्याची आरबीआयकडे तक्रार करू शकतो.
 • पगार जमा होणार्‍या खात्याबाबत अशा तक्रारी जास्त आहेत.
 • नोकरी देणारी कंपनी कर्मचाऱ्याचे नवीन बॅंक खाते उघडते.
 • मात्र बर्‍याचदा कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यानंतर पगारी खात्याचे बचत खात्यात रुपांतर केले जाते.
 • तसेच त्यावर देखभाल शुल्काचा नियम लागू केला जातो. यामुळे मात्र बचत खात्यात उणे रक्कम (मायनस बॅलेन्स) दाखवली जाते.
 • 1 एप्रिल 2015 पासून आरबीआयने बँकांना तसे न करण्याची सूचना दिली होती. आता त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुंबईचे वर्चस्व :

 • नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापौर चषक वेटलिफ्टिंग स्पर्धेत, यजमान मुंबईने पुरुष व महिला गटात अनुक्रमे 3839 गुणांसह एकहाती वर्चस्व राखताना सांघिक विजेतेपदावर कब्जा केला, तसेच प्रणित शिंदेजयवंती देशमुख या ठाणेकरांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात बेस्ट लिफ्टर किताब पटकावताना ठाण्याची छाप पाडली.
 • बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बृहन्मुंबई वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विलेपार्ले येथील प्रबोधन ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत ठाणे संघाने 31 गुणांसह पुरुष ज्युनिअर गटात वर्चस्व राखले.
 • नवी मुंबईच्या दिग्विजय सिंग राठोडने दमदार कामगिरी करत बेस्ट लिफ्टरचा मान मिळवला.
 • दिग्विजयने 69 किलो वजनी गटात एकूण 211 किलो भार उचलून जबरदस्त वर्चस्व राखले.

दिनविशेष :

 • जागतिक परिचारिका दिन
 • 1820 : फ्लोरेंस नाइटिंगेल, आधुनिक शुश्रुषाशास्त्राच्या संस्थापिका; ब्रिटिश परिचारिका यांचा जन्म.
 • 1909 : पुणे येथे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना झाली.
 • 1933 : नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ नंदू नाटेकर, अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू याचा जन्म.     
 • 1952 : प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मे 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.