Current Affairs of 12 June 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (12 जून 2017)
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदाल चॅम्पियन :
- लाल मातीचा बादशाह असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने रोलां गॅरोवर लौकिकाला साजेशी कामगिरी करताना अंतिम लढतीत स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाचा पराभव केला आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत विक्रमी 10 व्यांदा जेतेपद पटकावले.
- नदालने वावरिंकाचा 6-2, 6-3, 6-1 ने सहज पराभव केला. एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत विक्रमी 10 वेळा जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारा तो पहिला टेनिसपटू ठरला.
- तसेच कारकिर्दीतील 22 व्या ग्रॅण्डस्लॅम अंतिम फेरीत खेळत असलेल्या नदालने फ्रेंच ओपनमध्ये तिसऱ्यांदा सेट न गमावता जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याने केवल 35 गेम्स गमावले. त्यात अंतिम लढतीमध्ये गमावलेल्या सहा गेम्सचाही समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):
जेईई अॅडव्हान्स परीक्षेत अक्षत चुघ देशात दुसरा :
- आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या व अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल 11 जून रोजी जाहीर झाला. यामध्ये पुण्याच्या अक्षत चुघ याने 366 पैकी 335 गुण मिळवून देशात दुसरा व राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे.
- हरियाणातील पंचकुलचा सर्वेश मेहतानी याने देशात पहिला आणि दिल्लीच्या अनन्य अग्रवाल याने तिसरा क्रमांक मिळवला.
- मेहतानी हा आयआयटी रुरकी तर चुघ हा आयआयटी मुंबई आणि अग्रवाल हा आयआयटी दिल्ली विभागाचा आहे.
- तसेच औरंगाबादच्या ओंकार देशपांडे याने देशात आठवा क्रमांक पटकावला आहे.
आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाचा सेमीफाईनलमध्ये प्रवेश :
- धावांचा मोठा डोंगर उभा करूनही चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला श्रीलंकेकडून पराभावाला सामोरे जावे लागले होते. मात्र भारताने सांघिक खेळाचे प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळविला.
- 11 जून रोजी खेळण्यात आलेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा होता. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 44.3 षटकात सर्वबाद 191 धावा केल्या.
- तसेच त्यानंतर 192 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनीही संयमित खेळाचे प्रदर्शन केले. भारताने 38 षटकात 2 बाद 193 धावा करत सहज विजय मिळविला.
स्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना :
- मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होऊन 57 वर्षाचा कालावधी लोटला पण अजूनही मराठवाडा विकासात हजारो मैल दूरच आहे. येथील अनुशेष 2 लाख 30 हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. प्रत्येक बाबतीत मराठवाड्यावर अन्याय होत असून तो कधी दिवस सहन करायचा.
- पश्चिम महाराष्ट्र, विदर्भा सोबत मराठवाड्याचा समतोल विकास साधणे अशक्य असून आता महाराष्ट्रापासून मराठवाडा वेगळा करण्याची वेळ आली आहे. यासाठी लढा देण्या करीता ह्यस्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा मराठवाडा विकास मंचे अध्यक्ष जे.के.जाधव यांनी केली.
दिनविशेष :
- पाली भाषा कोविद; बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक ‘पुरुषोत्तम विश्वनाथ बापट’ यांचा जन्म 12 जून 1894 मध्ये झाला.
- 12 जून 1917 हा मराठी लेखक ‘भालचंद्र दत्तात्रय खेर’ यांचा जन्म दिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा