Current Affairs (चालू घडामोडी) of 12 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. सरकारी कर्मचार्‍यांना अपघात विमा कवच
2. महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांविषयी कायदा होणार
3. राज्यात 13 जानेवारीपासून ‘हमारा जल हमारा जीवन’ अभियान
4. दिनविशेष

 

 

 

 

 

सरकारी कर्मचार्‍यांना अपघात विमा कवच :

 • राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचार्‍यांना यापुढे अपघात विमा कवचाचा लाभ होणार आहे.
 • सरकारी नोकरीत प्रवेश केल्यानंतर पदाला अनुसरून हक्काचे आणि काही अनुषंगिक लाभ कर्मचारी-अधिकारी यांना मिळतील.
 • कर्मचारी-अधिकारी यांना सध्या गटविमा आहे मात्र हा विमा जीवन विम्याशी निगडीत आहे.
 • विम्याचे स्वरूप –
 • वर्ग 3 – 15 लाखांपर्यंत
 • वर्ग 2 – 15 ते 25 लाख
 • वर्ग 1 – 25 ते 50 लाख

महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांविषयी कायदा होणार :

 • एक हजार पोलिस करडी नजर ठेवणार असून दहशतवादी कारवायांवरही त्यांचे लक्ष राहणार आहे.
 • आंतरराष्ट्रीय दहशतवादाबरोबरच आर्थिक गुन्हेगारी, फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी, ऑनलाइन बँकिंग व्यवहार, एलपीजी ग्राहकांना सबसिडी देण्यासाठी केली जाणारी मदत अशा वेगवेगळ्या व्यवहारांतर्गत होणार्‍या घटनांकडे लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे.
 • इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवता येईल.

राज्यात 13 जानेवारीपासून ‘हमारा जल हमारा जीवन’ अभियान :

 • पहिल्या टप्प्यात त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या एका गावाची निवड करून त्या गावामध्ये पाण्याच्या सर्व गरजा भागवण्यासाठी नियोजन व अमलबजावणी करण्यात येणार आहे.

दिनविशेष :

 • 12 जानेवारीराष्ट्रीय युवा दिन
 • 1863 – भारतीय तत्वज्ञानाचा सर्व जगभर प्रसार करणारे थोर पुरुष स्वामी विवेकानंद यांचा कोलकत्ता येथे जन्म झाला.
 • 1936` डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.
 • 2005 – अमेरिकेच्या ‘नासा’या अवकाश संशोधन केंद्राने सूर्यमालेविषयीचे अनुत्तरित प्रश्न सोडविण्यासाठी ‘डिस्कव्हरी’ मोहिमेंतर्गत ‘डीप इंम्पॅक्ट’ नावाचे 33 कोटी डॉलर किमतीचे अवकाशयान अंतराळात सोडले.
 • 2009 – प्रख्यात संगीतकार ए.आर.रेहमान यांना ‘स्लमडॉग मिलेनिअर‘ चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीतकाराला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला. ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळविणारे रेहमान पहिले भारतीय आहेत.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.