Current Affairs of 12 August 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2015)

भालचंद्र यांचे वृद्धापकाळाने निधन :

  • संगीत रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असलेले मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
  • ते 94 वर्षांचे होता.
  • “सत्तेचे गुलाम” या नाटकापासून त्यांनी रंगभूमीवरील आपली कारकीर्द सुरू केली.
  • राज्य सरकारसोबतच अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.

सानिया मिर्झा हिला यंदाचा ‘राजीव गांधी खेलरत्न’ क्रीडा पुरस्कार निश्चित :

  • भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिला यंदाचा ‘राजीव गांधी खेलरत्न’ या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. Sania Mirza
  • केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सानियाच्या नावाची शिफारस केल्यानंतर आता पुरस्कार समितीनेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
  • स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीत विंबल्डनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
  • तसेच कारकिर्दीत तिने महिला दुहेरीत प्रथमच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले.
  • याशिवाय तिने यंदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही मिळविले आहे.
  • क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सानियाची शिफारस केली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2015)

अवकाश स्थानकात उगवलेली भाजी खाऊन इतिहास घडविला :

  • आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहणाऱ्या तीन “शेतकऱ्यांनी” तेथेच उगवलेली भाजी खाऊन आज इतिहास घडविला.
  • या अवकाशवीरांनी अवकाश स्थानकातच यंत्राच्या मदतीने उगवलेली लाल रंगाची पालेभाजी खात असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला, अशी भाजी खाणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत.
  • तसेच, यामुळे यंत्राच्या मदतीने अवकाशातच खाण्यायोग्य भाजीचे उत्पादन घेण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे.
  • अवकाश स्थानकातील स्कॉट केली, जेल लिंडग्रेन आणि किमिया यूई या अंतराळवीरांनी ही किमया केली आहे.
  • अवकाश स्थानकातील युरोपीय अवकाश संस्थेच्या कोलंबस प्रयोगशाळेत भाजी उगविण्याचा प्रयोग केला गेला.
  • यासाठी “व्हेजी” ही भाजी उगविण्याची यंत्रणा विकसित केली गेली असून अत्यंत नियंत्रित वातावरणात या भाजीची वाढ करण्यात आली.
  • व्हेजीची रचना : या यंत्राची अमेरिकेतील केनेडी अवकाश स्थानकातच पूर्ण चाचणी करण्यात आली होती. भाजीची बियाणे, माती आणि खत असलेल्या दोन “उश्‍या” यंत्राबरोबर अवकाश स्थानकात पाठविण्यात आल्या होत्या. हे बियाणे अवकाश स्थानकात 15 महिने गोठविलेल्या अवस्थेत ठेवण्यात आले होते.”व्हेजी‘ यंत्रणा 8 जुलैला सुरू करण्यात आली. “व्हेजी”मध्ये रोपाच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेल्या लाल, निळे आणि हिरवे एलईडी दिव्यांची रचना केली आहे. अवकाश स्थानकात पाणी ओतता येत नसल्याने उश्‍यांच्या खालच्या बाजूला दव निर्माण करून रोपांची पाण्याची गरज भागविण्यात आली. त्यानंतर आज 33 दिवसांनी ही भाजी उगविली.

तीन हजार रुपयातील ऍड्रॉईड बेस्ड स्मार्टफोन तयार करण्याचा निर्णय :

  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील “गुगल” या लोकप्रिय कंपनीने खास भारतीय युजर्ससाठी तीन हजार रुपयातील ऍड्रॉईड बेस्ड स्मार्टफोन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. Android Phone
  • भारतातील इंटरनेट बाजारपेठेत गुंतवणूक करण्यासाठी गुगलने हा स्वस्तातील स्मार्ट फोन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

दहावा बाहय़ग्रह दोन ताऱ्यांपासून विशिष्ट कक्षेत सापडला :

  • ‘स्टार वॉर’ चित्रपट मालिकेत दाखवलेल्या ग्रहांसारखा दहावा बाहय़ग्रह दोन ताऱ्यांपासून विशिष्ट कक्षेत सापडला आहे.
  • म्हणजे या ग्रहावर दोन सूर्य उगवलेले दिसतात.
  • तसेच स्टार वॉर चित्रपटात जो टाटुनी ग्रह दाखवला आहे त्यावर दोन सूर्य (तारे) उगवताना दिसतात व ते तारे एकमेकांभोवतीची प्रदक्षिणा 27 दिवसांत पूर्ण करतात अशी कल्पना केली आहे.
  • नासाच्या केप्लर दुर्बिणीने त्याचा शोध लागला आहे, या ग्रहाचे नाव केप्लर 453 बी असे असून, वसाहतयोग्य ग्रह ताऱ्यापासून ज्या अंतरावर असतात त्या अंतरावर असूनही तेथे जीवसृष्टीस अनुकूल स्थिती नाही कारण तो वायूंचा बनलेला आहे.Star Wor
  • केप्लर 453 बी :
  • ताऱ्यांपासून वसाहतयोग्य अंतरावर असूनही जीवसृष्टी अशक्य.
  • ग्रहाच्या चंद्रावर मात्र जीवसृष्टी शक्य.
  • दहावा बाहय़ग्रह.
  • आता शोधला गेला नसता तर 2066 पर्यंत वाट पाहावी लागली असती.
  • अधिक्रमण तंत्राने शोध.

मंगळाच्या घेतलेल्या छायाचित्रात एक मानवी आकृती दिसत असल्याचा दावा :

  • मंगळावर संशोधन करत असलेल्या नासाच्या रोव्हरने मंगळाच्या घेतलेल्या छायाचित्रात एक मानवी आकृती दिसत असल्याचा दावा एलियन्सवर विश्वास ठेवणाऱ्या संशोधकांनी केला आहे.
  • ही आकृती एखाद्या महिलेची असावी असेही मानण्यात येत आहे.
  • यूएफओ सायटिंग डेलीनुसार या छायाचित्रात दिसणारी व्यक्ती 8 ते 10 सें.मी.ची असून, ती एक महिला असावी.

भावंडांच्या नावाने छोटे गिर्यारोहक असा नवा विक्रम :

  • कंदर्प शर्मा (5 वर्षे 10 महिने) आणि त्याची बहीण ऋत्विका शर्मा (8 वर्षे 11 महिने) या भावंडांच्या नावाने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट चढून जाणारे सगळ्यात छोटे गिर्यारोहक असा नवा विक्रम नोंदला जाईल.
  • नेपाळच्या उत्तरपूर्वेकडील 5,380 मीटर उंचीवरील एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर हे दोघे यशस्वीपणे परतले.
  • या मुलांसोबत बेस कॅम्पवर त्यांचे पालकही होते. बेस कॅम्पवर वैयक्तिक पातळीवर यशस्वीपणे परतणारे वयाने सगळ्यात तरुण भाऊ व बहीण म्हणूनही त्यांच्या नावावर विक्रम नोंदला गेला आहे.
  • हे शर्मा कुटुंब 8,848  मीटर उंचीच्या एव्हरेस्टच्या बेस कॅ म्पवर पोहोचणारे पहिले कुटुंब ठरले आहे.

रोहित शर्मा, नेमबाज जितू रॉय यांच्यासह 17 खेळाडूंच्या नावाची शिफारस :

  • क्रिकेटपटू रोहित शर्मा, नेमबाज जितू रॉय यांच्यासह 17 खेळाडूंच्या नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाद्वारे नियुक्त पुरस्कार निवड समितीने केली.
  • रोहित आणि जितू यांच्यासह जी नावे निश्चित करण्यात आली, त्यांत जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, हॉकीपटू पी. आर. ब्रिजेश, मल्ल बजरंग आणि बबिता, अ‍ॅथलिट एम. आर. पूवम्मा, बॅडमिंटनपटू के. श्रीकांत आणि बॉक्सर मनदीप जांगडा यांचा समावेश आहे.
  • ही शिफारस क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांना पाठविण्यात येणार असून, ते अंतिम निर्णय घेतील.
  • 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे पुरस्कारांचे वितरण करतील.
  • खेलरत्न पुरस्कारासाठी 7 लाख 50 हजार रोख आणि प्रशस्तिपत्र तसेच अर्जुन पुरस्कारविजेत्यांना 5 लाख रोख आणि प्रशस्तिपत्र, असे स्वरूप असेल.
  • अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या खेळाडूंची नावे : पी. आर. श्रीजेश (हॉकी), दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक), जितू रॉय (नेमबाजी), संदीपकुमार (तिरंदाजी), मनदीप जांगडा (बॉक्सिंग), बबिता (कुस्ती), बजरंग (कुस्ती), रोहित शर्मा (क्रिकेट), के. श्रीकांत (बॅडमिंटन), स्वर्णसिंग विर्क (रोइंग), सतीश शिवलिंगम (भारोत्तोलन), संथोई देवी (वुशू), शरद गायकवाड (पॅरासेलिंग), एमआर पूवम्मा (अ‍ॅॅथलेटिक्स), मनजित छिल्लर (कबड्डी), अभिलाषा म्हात्रे (कबड्डी) आणि अनूपकुमार (रोलर स्केटिंग).

दिनविशेष :

  • 1833 : शिकागो शहराची स्थापना.
  • 1851 : आयझॅक सिंगरला शिवणयंत्राचा पेटंट प्रदान.
  • 1908 : सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली.
  • 1953 : सोवियेत संघाने आपल्या पहिल्या परमाणु बॉम्बची चाचणी केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.