Current Affairs of 11 June 2015 For MPSC Exams

एचएसबीसी 25 हजार कर्मचाऱ्यांना काढणार
- जगातील आघाडीच्या असलेल्या एचएसबीसी बॅंकेने आज (बुधवार) क्षमतावृद्धीसाठी जगभरातून 25 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.
- बॅंकेने आपले बॅक ऑफिसचे काम फक्त भारत आणि चीनमध्ये सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- एचएसबीसीमध्ये भारतातील 32 हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी जवळपास 27 हजार कर्मचारी हे पुणे, हैद्राबाद, विशाखापट्टनम, कोलकाता, बंगळूर आणि नवी दिल्ली येथे काम करत आहेत.
रद्द केलेल्या रेल्वे तात्काळ तिकिटाची अर्धी रक्कम मिळणार
- भारतीय रेल्वे प्रशासनाने तात्काळ तिकीट आरक्षणाच्या सेवेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत, आता तात्काळ तिकीट रद्द केल्यास येथून पुढे संबंधित प्रवाशाला तिकिटाची 50 टक्के रक्कम परत मिळणार आहे.
- वातानुकूलित (एसी) क्लासचे तात्काळ तिकीट सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत आरक्षित करता येईल आणि इतर स्लीपर क्लासचे तिकीट सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आरक्षित करता येणार आहे.
- त्याचप्रमाणे रेल्वेने “तात्काळ विशेष रेल्वे” च्या आरक्षण कालावधीतही वाढ केली आहे. आता तात्काल विशेष रेल्वेसाठी 60 दिवसांपूर्वीही आरक्षण करता येईल. तर कमीत कमी 10 दिवसांपूर्वी तात्काळ रेल्वे आरक्षण प्रवासी करू शकतील.
भारताचे माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचे निधन
- भारताचे माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर (वय 72 वर्षे) यांचे दीर्घकालीन आजारामुळे मंगळवारी रात्री निधन झाले.
- यांच्या पश्चात पत्नी, क्रिकेटपटू ऋषिकेश, गोल्फ प्रशिक्षक आदित्य ही दोन मुले, टेनिसपटू राधिका ही सून असा परिवार आहे.
- हेमंत कानिटकर यांनी 1974-75 च्या मोसमात बलाढ्य वेस्ट इंडीजविरुद्ध दोन कसोटींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते त्यात त्यांनी 27.75 च्या सरासरीने 111 धावा केल्या होत्या.
रवी शास्त्री भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक बनणार
- माजी कर्णधार व सध्याचे भारतीय क्रिकेट संघाचे संचालक रवी शास्त्री हेच भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक असतील, असे सांगण्यात येत आहे.
- रवी शास्त्री यांनी बीसीसीआयसाठी समालोचक म्हणून वर्षाला चार कोटी रुपयांचा आणि संचालक म्हणून सहा कोटी रुपयांचा करार केला होता आणि आता त्यांना प्रशिक्षकपदासाठी वर्षाला सात कोटी रुपये मिळणार आहेत.
- रवी शास्त्री यांनी भारतासाठी 80 कसोटी आणि 150 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत.
फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत भारताचा महेंद्रसिंह धोनी
- फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंच्या यादीत भारताच्या फक्त महेंद्रसिंह धोनीचे नाव आहे.
- या यादीत अमेरिकेचा मुष्टियोद्धा फ्लॉइड मेवेदर हा अव्वल स्थानावर आहे. याबरोबरच गोल्फपटू टायगर वुड्स, स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर, पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या दहा खेळाडूंमध्ये आहेत.
- भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी 23 व्या स्थानावर आहे आणि धोनीची एकूण संपत्ती 31 मिलियन डॉलर (198 कोटी रुपये) एवढी आहे.
दिनविशेष:
- 1964 – गणितज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी “गुरुत्वाकर्षनातून उदभावणारे आकुंचन” हा प्रबंध लंडनच्या रोयल सोसायटी संस्थेस सादर केला.