Current Affairs of 11 December 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (11 डिसेंबर 2017)
स्टेट बँकेने 1300 शाखांची नावे आणि कोड बदलले :
- देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (SBI) आपल्या सुमारे 1300 शाखांची नावे आणि IFSC कोड बदलले आहेत.
- स्टेट बँकेच्या सर्व सहयोगी बँकांचे विलिनीकरण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
- मुंबई, दिल्ली, बेंगळूरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि लखनऊ या शहरांमधील बहुतांश बँकेच्या शाखांच्या नावात हे बदल करण्यात आले आहेत.
- तसेच यासंदर्भात स्टेट बँकेचे प्रबंध निदेशक (डिजिटल बँकिंग) प्रवीण गुप्ता यांनी सांगितले, आमच्या काही जुन्या सहयोगी बँकांच्या शाखांचे भारतीय स्टेट बँकेत विलिनिकरण करण्यात आले आहे. हे विलिनिकरण झाल्याने त्यांच्या IFSC कोडमध्ये देखील बदल झाले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
महाराष्ट्राची कन्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार :
- ‘एमपीएससी’ परीक्षेमधील यश, ‘सीबीआय’मध्ये अधीक्षकपदी निवड अशा महत्त्वाच्या संधी नाकारत चाकोरीबाहेर जाण्याची जोखीम पत्करणारी महाराष्ट्राची कश्मिरा पवार आता पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सल्लागार बनली आहे.
- साताऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील या 24 वर्षीय युवतीने ‘मेक इन इंडिया’ आणि ‘ग्रामीण विकास’ प्रकल्पांतर्गत केलेल्या कामगिरीची दखल घेतल्याने यापुढे ती आता विविध क्षेत्रांतील योजनांबाबत केंद्र सरकारला सल्ला देणार आहे.
- केंद्र सरकारच्या वतीने विविध क्षेत्रांतील विकासासाठी काही प्रकल्पांच्या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत कश्मिराने भाग घेतला. त्यात पंतप्रधान कार्यालयाच्या ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पात तिने प्रथम क्रमांक मिळविला.
- ‘मेक इन इंडिया’ व ग्रामीण विकास या दोन प्रकल्पांना राष्ट्रपती पुरस्कारही लाभला. तिने तयार केलेल्या ‘सोशल असिस्टंट प्रोग्राम’ला पेटंट देऊन ही योजना केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबविण्यास सुरवात केली.
- ग्रामीण विकासाच्या प्रकल्पातून तिने सुचविलेल्या ‘स्मार्ट व्हिलेज’ची योजना उत्तर प्रदेशात राबविण्यास सुरवात झाली आहे. ‘एमपीएससी’मधून तिची उपजिल्हाधिकारी म्हणून नुकतीच निवडही झाली आहे आणि पंतप्रधान कार्यालयातून राष्ट्रीय सल्लागार म्हणूनही निवड झाली.
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड :
- बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त आयएएस अधिकारी, कथाकार व कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली.
- संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांचा 70 मतांनी पराभव केला.
- साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांना 427 मते; तर डॉ. शोभणे यांना 357 मते मिळाली. गेल्या दहा दिवसांपासून देशमुख आणि शोभणे यांच्यातच खरी चुरस असल्याचे स्पष्ट झाले होते.
- लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पाठीशी मराठवाडा, तर शोभणेंच्या पाठीशी विदर्भ होता. याव्यतिरिक्त दोघांनीही मुंबई व पश्चिम महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातील मते मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. यात बडोद्यातील आयोजक संस्थेची मतेही दोघांना विभागून मिळाली असावी, असा अंदाज आहे; पण पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश मते देशमुखांना मिळाल्यामुळे विजय सोपा झाला.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गफूर मनियार यांचा गौरव :
- पालीतील सामाजिक कार्यकर्ते गफूर महम्मुद मनियार यांच्या सामाजिक व सेवाभावी कार्याबद्दल रायगड जिल्हा मुस्लिम वेलफेअर ऑर्गनायजेशन (फलाही तन्जीम) यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृह खोपोली येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक आणि जागतिक किर्तीचे नामवंत उद्योजक हासन चौंगले यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
- विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या पंधरा समाजसेवकांचा सत्कार या कार्यक्रमात केला गेला. गफूर मनियार यांनी मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी अमुल्य योगदान दिले आहे.
- सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्यात त्यांचा हिरीरिने सहभाग असतो. त्यांनी आजवर केलेल्या सेवाभावी कामाचे मुल्यमापन करुन भविष्यात त्यांना अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास खतिबे कोकण अली एम. शम्सी यांच्या भाषणाने सुरुवात झाली.
- भारतीय मुस्लिम परिषदेचे अध्यक्ष हाजी जावेद पाशा कुरेशी यांनी आपल्या मार्गदर्शनात मुस्लिम समाजबांधवांनी आपल्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि तरुणांना उच्चशिक्षित बनण्याचे आवाहन केले.
इराकच्या सीमा आयसिसकडून मुक्त :
- इराकमधून ‘आयसिस’चा नायनाट करण्यात आला आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून ‘आयसिस’विरोधात इराकचा लढा सुरू होता. सीरियाच्या सीमेजवळ असलेल्या वाळवंटाच्या भागात धडक कारवाई करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर इराकने ‘आयसिसविरुद्ध’चा लढा यशस्वीपणे संपल्याचे जाहीर केले. ‘आयसिस’विरुद्धच्या लढाईत इराकी सैन्याला अमेरिकी सैन्याची साथ मिळाली.
- इराकचे पंतप्रधान हैदर अली अबादी यांनी बगदादमध्ये पत्रकार परिषद घेऊन ‘आयसिस’विरोधातील सैन्याची कारवाई संपल्याचे जाहीर केले.
- देशाच्या सीमा आता पूर्णपणे आमच्या सैन्याच्या नियंत्रणाखाली आहेत, असा दावा हैदर यांनी केला. सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही सैन्याची ‘आयसिस’विरोधातील कारवाई पूर्ण झाल्याचे सांगितले.
दिनविशेष :
- भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ ‘प्रणवकुमार मुखर्जी’ यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 मध्ये झाला.
- 11 डिसेंबर 1946 मध्ये युनिसेफ (UNICEF) ची स्थापना झाली.
- 11 डिसेंबर 1969 हा दिवस भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता ‘विश्वनाथन आनंद’ यांचा जन्मदिन आहे.
- 11 डिसेंबर 2001 मध्ये चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Must Read (नक्की वाचा):
आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/t-OFsUNxNE8?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}