Current Affairs (चालू घडामोडी) of 11 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | सत्यार्थी व मलाला यांना शांततेचे नोबेल प्रदान |
2. | संमेलनाध्यक्षपदी सदानंद मोरे |
3. | विमा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी |
4. | आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा ठरणार नाही |
सत्यार्थी व मलाला यांना शांततेचे नोबेल प्रदान:
- कैलाश सत्यार्थी व मलाला युसूफझाई यांना शांततेचे नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
- दक्षिण आशियातील प्रमुख देश असणार्या भारत व पाकिस्तानमध्ये बालहक्कासाठी लढा दिल्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला.
संमेलनाध्यक्षपदी सदानंद मोरे:
- ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली आहे.
- पंजाबमधील घुमान येथे एप्रिल मध्ये हे संमेलन पार पडणार आहे.
विमा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी:
- विमा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा 49 टक्क्यापर्यंत वाढवण्याची तरतूद असलेल्या विमा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा ठरणार नाही:
- आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गेली सुमारे 150 वर्षे अस्तित्वात असलेला गुन्हा भारतीय दंडसंहितेतून काढून टाकण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.
- दंडसंहितेच्या कलम 309 अन्वये आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा असून त्यासाठी एक वर्षापर्यंतचा कारावास व दंडाची शिक्षा आहे.