Current Affairs of 11 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2016)

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2016)

बॉक्सर मनोजकुमारची रिओमध्ये विजयी सलामी :

 • भारताचा बॉक्सर मनोजकुमारने रिओ ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली आहे.
 • पुरुषांच्या 64 किलो वजनी गटाच्या सामन्यात मनोजकुमारने लिथुएनियाच्या एव्हाल्डास पेट्राउस्कासचा 3-0 असा पराभव केला.
 • तसेच या विजयासह मनोजकुमारने प्री कॉर्टर फायनलमध्ये (उप उपांत्यपुर्व) प्रवेश मिळविला. त्याची पुढील लढत उझबेकिस्तानच्या फजलद्दीनशी होणार आहे.
 • 29 वर्षांच्या मनोजकुमारने या सामन्यात अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवल.
 • रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला आत्तार्यंत एकही पदक मिळवता आलेले नाही.
 • या अगोदर झालेल्या सामन्यात भारताच्या विकास यादवने (75 किलो) बॉक्सिंगमध्ये अमेरिकेच्या चार्ल्स् कोनवेलचा पराभव करुन भारताला विजय मिळवून दिला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2016)

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प देशास अर्पण :

 • तमिळनाडूतील कुडनकुलम येथे उभारण्यात आलेला महत्त्वाकांक्षी अणुऊर्जा प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.
 • एक हजार मेगावॉट क्षमतेच्या पहिल्या युनिटचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन व तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले.
 • भारत-रशिया दरम्यान असलेल्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टिकोनातून हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
 • तसेच या ठिकाणी प्रत्येकी एक हजार मेगावॉट क्षमतेच्या उर्वरित युनिटची उभारणी प्रगतिपथावर आहे.
 • रशियाच्या सहकार्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी सुरू असून चार टप्प्यांमध्ये तो उभा राहणार आहे.
 • प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेल्या अणुभट्टीची उभारणी न्यूक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआयएल) आणि ऍटोमस्ट्रॉय एक्‍स्पोर्ट या रशियन कंपनीच्या सहकार्याने होत आहे.

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. साळुंके यांचा राजीनामा :

 • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 • गेल्या काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यास शासनाने विरोध केल्यामुळे डॉ. माणिकराव साळुंके यांचे शासनाशी मदभेद झाले होते.
 • तसेच यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचाच राजीनामा दिला आहे.  
 • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे 14 वे कुलगुरू म्हणून प्रा.डॉ. माणिकराव साळुंखे यांची निवड करण्यात आली होती.

मायकेल फेल्प्सची ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी :

 • अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स याने ऑलिंपिक स्पर्धांतील सुवर्णपदकांची विजयी कायम ठेवताना 200 मीटर बटरफ्लाय आणि 4 बाय 200 मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात आणखी सुवर्णपदक मिळविले.
 • रिओ ऑलिंपिकमधील त्याचे हे तिसरे सुवर्णपदक असून, ऑलिंपिक स्पर्धांतील 21 वे सुवर्ण मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी त्याने केली आहे.
 • आपली शेवटची ऑलिंपिक स्पर्धा खेळत असलेल्या फेल्प्सचे ऑलिंपिक स्पर्धांमधील 25 वे पदक आहे.
 • रिओ ऑलिंपिकमध्ये अमेरिकेन जलतरणात आतापर्यंत वर्चस्व मिळविलेले आहे.
 • आता फेल्प्सने 200 मीटर बटरफ्लायमध्ये 1 मिनिट 53.36 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.

  जपानच्या सकाई मसातो याने रौप्य आणि हंगेरीच्या केंडरसी तमास याने ब्राँझपदक मिळविले.

‘आयर्न लेडी’ कॅटनिकाची सुवर्ण हॅट्ट्रीक :

 • जलतरणातील ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हंगेरीच्या कॅटनिका होजूने जलतरणात तिसरे सुवर्णपदक मिळवीत हॅट्ट्रीक केली आहे.
 • 27 वर्षीय होजूने हंगेरीला रिओ ऑलिंपिकध्ये गेल्या चार दिवसांत तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
 • अमेरिकेने रिओ ऑलिंपिक स्पर्धेच्या जलतरण क्रीडा प्रकारातील वर्चस्व तिसऱ्याही दिवशी कायम ठेवत दोन सुवर्णपदके जिंकले.
 • महिलांमध्ये कॅटनिका होजूनेही आपल्या कामगिरीने जगाचे लक्ष वेधले आहे.
 • ‘आयर्न लेडी’ होजूने महिलांच्या 200 मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात ऑलिंपिक विक्रमाची नोंद करत सुवर्णपद मिळविले, तिने दोन मिनिट 6.58 सेकंदांची वेळ नोंदविली.
 • कॅटनिकाने पहिल्या दिवशी 400 मीटर वैयक्‍तिक मेडले प्रकारात विश्‍वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली होती.

गोवामध्ये मद्यपान करणाऱ्यास बंदी :

 • गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
 • तसेच यासाठी गोवा विधानसभेत नवीन दुरुस्ती करण्यात आलेला राज्य उत्पादन शुल्क कायदा मांडण्यात आला.
 • या कायद्यानुसार गोव्यात ठिकठिकाणी मद्यपान निषेध असलेले फलक लावण्यात येणार आहेत.
 • फलक लावलेल्या परिसरात मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
 • गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी, समुद्र किनारे आणि रस्त्यांवर मद्यपान करण्याच्या अनेक तक्रारी पाहता गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.