Current Affairs of 10 October 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 ऑक्टोबर 2017)

चालू घडामोडी (10 ऑक्टोबर 2017)

रिचर्ड थॅलर यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर :

  • अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड एच. थॅलर यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • behavioural economics या विषयामध्ये थॅलर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
  • डॉ. थॅलर यांनी अर्थशास्त्रातील निर्णयप्रक्रियेतील विश्लेषणाद्वारे मानसशास्त्रीय वास्तववादी कल्पनांचे गृहितक मांडले होते.
  • डॉ. थॅलर हे शिकागो विद्यापीठातील बूथ स्कूल ऑफ बिझनेस या शैक्षणिक संस्थेत वर्तणुकविषयक अर्थशास्त्राचे (behavioural economics) प्राध्यापक आहेत.
  • डॉ. थॅलर हे ‘Nudge’ (2008) या बेस्ट सेलर पुस्तकाचे सहलेखक आहेत. कास आर. सनस्टेन यांच्यासोबत त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकामध्ये व्यक्तीच्या वर्तणुकविषयक अर्थशास्त्राद्वारे त्याच्या जीवनात येणाऱ्या महत्वाच्या अडचणींवर मात कशी करायची, याची माहिती देण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचा वेळापत्रक जाहीर :

  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
  • तसेच या परीक्षा 18 फेब्रुवारी रोजी होणार असून, 8 नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
  • इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षाही याच दिवशी घेतली जाणार आहे.
  • शिष्यवृत्ती परीक्षा दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12.30 यावेळेत प्रथम भाषागणित आणि दुपारी 1.30 ते 3 या वेळेत तृतीय भाषाबुद्धिमत्ता चाचणी या विषयांच्या परीक्षा होणार आहेत.
  • अधिक माहितीसाठी www.mscepune.inwww.puppss.mscescholarshipexam.in या परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठीही आधार कार्डची सक्ती :

  • देशातील अनेक सेवासुविधांसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही आधारची सक्ती करण्यात आली आहे.
  • पटना विद्यापीठातील मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पीएचडी करणाऱ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
  • ‘द टेलिग्राफ’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. 14 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी पटना विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
  • याआधी इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने रुग्णांना दाखल करुन घेताना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. याच पार्श्वभूमीवर पटना विद्यापीठानेही मोदींच्या कार्यक्रमासाठी आधार कार्डची सक्ती केली आहे. याबद्दल माहिती देताना, जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी, अशा प्रकारच्या सूचना दिल्याचे विद्यापीठाच्या उपकुलगुरु डॉली सिन्हांनी दिली.
  • या कार्यक्रमाला केवळ पदव्युत्तर शिक्षण घेणारे आणि पीएचडी करणारे विद्यार्थीच उपस्थित राहू शकतात. त्यासाठीही त्यांना आधार कार्ड दाखवावे लागेल.

भारतीयांसाठी अमेरिकेचे नवे स्थलांतर नियम :

  • अखंड अभ्यास, प्रचंड पैसा आणि आफाट मनशक्ती यांची बेगमी करीत आपल्या उच्च कौशल्यांना वाव मिळविण्यासाठी अमेरिकेला नोकरीसाठी जाणार असाल, तर तुमच्या विस्तारित कुटुंबीयांसाठी अमेरिकेची व्दारे बंद दिसतील.
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशाचे हीत जपण्यासाठी अतिउच्च कौशल्ये असलेल्या भारतीय कामगारांनाच स्थलांतर नियम व्यवस्था लागू केली जाईल, असे सांगत हा नियम त्यांच्या विस्तारित कुटुंबासाठी नसेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे जोडीदार अथवा अल्पवयीन मुलांखेरीज वृद्ध माता-पिता, काका-काकी, सज्ञान मुले आणि पुतणे-पुतणी यांना अमेरिकेत नेता येणार नाही.
  • तसेच ट्रम्प यांनी नवीन स्थलांतर योजनेचा प्रस्ताव ट्रम्प यांनी नुकताच काँग्रेसकडे पाठवला आहे. यात एच 1 बी व्हिसाचा उल्लेख केलेला नाही. भारतीय माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांसाठी एच 1 बी व्हिसा महत्त्वाचा मानला जातो.
  • देशाच्या ग्रीन कार्ड प्रणालीचा ट्रम्प यांनी फेरआढावा घेतला असून त्यात मेक्सिको सीमेवरील भिंत व देशात कुणालाही बरोबर न घेता येणाऱ्या लहान मुलांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आहे.

टाटा टेलिसर्व्हिसेस बंद होणार :

  • टाटा सन्सच्या मालकीची टाटा टेलिसर्व्हिसेस ही दूरसंचार कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. यासंबंधीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून टाटा टेलिसर्व्हिसेसकडून 5000 कर्मचाऱ्यांना घरचा आहेर दिला जाणार असल्याचे समजते.
  • तसेच त्यादृष्टीने या कर्मचाऱ्यांना तीन ते सहा महिन्यांची नोटीस देण्यात आली आहे. त्याआधी कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष पॅकेज देण्यात येणार आहे. तर मोजक्या कर्मचाऱ्यांना समूहातील इतर कंपन्यांमध्ये सामावून घेतले जाईल.
  • गेली काही वर्षं टाटा टेलिसर्व्हिसेस सातत्याने तोटा सहन करतेय. या कंपनीवर 34,000 कोटींचे कर्ज आहे. त्यातच, या कंपनीतील आपली 26 टक्के भागीदारी ‘डोकोमो’ या जपानी कंपनीने काढून घेतली आहे.
  • दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता, स्वबळावर बाजारात टिकून राहणे ‘टाटा टेलिसर्व्हिसेस’ साठी खूपच कठीण आहे. अशावेळी वेगवेगळ्या पर्यायांचा ते विचार करताहेत. पण, फारशा सकारात्मक हालचाली दिसत नसल्याने अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी ‘पॅक-अप’चीच तयारी सुरू केली आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.