Current Affairs of 10 July 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 जुलै 2018)

चालू घडामोडी (10 जुलै 2018)

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे 31 ऑक्‍टोबरला अनावरण :

 • सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘ या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 31 ऑक्‍टोबरला होणार आहे.
 • जगातील सर्वांत उंच ठरणारा हा पुतळा 182 मीटर उंचीचा आहे. यानिमित्ताने लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारशिंगही मोदी गुजरातेतून फुंकतील. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी या प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते. सरदार पटेलांच्या 143 व्या जयंतीदिनी त्याची पूर्ती होईल. Statue of Unity
 • नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवराजवळील केवडिया कॉलनीतील साधू बेटावर हा पुतळा उभारला जात आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी नुकतीच कामाच्या प्रगतीची पाहणी केली. 90 हजार टन सिमेंट आणि 25 हजार टन लोखंड वापरून हा पुतळा उभारला जात आहे. 250 अभियंते या कामात गुंतले असून, आतापर्यंत पुतळ्याचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे.
 • पुतळ्याचे देशार्पण हा केवळ समारंभ नसून, राज्य सरकारविरुद्ध उभ्या ठाकलेल्या पाटीदार समाजाला चुचकारण्याचे राजकारणही त्यात आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसी आरक्षण मिळावे, अशी पाटीदारांची मागणी आहे.
  तसेच ‘लोह पुरुषा’च्या पुतळ्यामुळे पाटदारांचा राग शांत होण्याचा सरकारचा अंदाज आहे. या पुतळ्याची कोनशीला मोदी यांनी मुख्यमंत्री असताना 31 ऑक्‍टोबर 2013 रोजी रचली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 जुलै 2018)

तारक मेहता फेम ‘कवी कुमार’ यांचे निधन :

 • टी.व्ही. वर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून डॉ. हंसराज हाथी ही भूमिका साकारणारे अभिनेता कवी कुमार आझाद यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती.
 • प्रेक्षकांना सतत हसत ठेवणारे कवी कुमार आझाद हे मुळचे बिहारचे रहिवासी होते. कवी कुमार हे त्यांच्या वाढत्या वजनाने त्रस्त होते. 2010 साली त्यांनी शस्त्रक्रिया करुन ऐंशी किलो वजन कमी केले होते. Kavi Kumar Azadमालिकांबरोबरच आमीर खानचा ‘मेला’ आणि ‘फंटूश’ या सिनेमातही त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या या अचानक जाण्यामुळे ‘तारक मेहता का…’ मालिकेचे शुटींग थांबविण्यात आले आहे. मालिकेला नुकतीच दहा वर्षे पुर्ण झाल्याच्या आनंदात मिटींगचे आयोजन करण्यात आले आहे. पण त्याआधीच कवी कुमार यांनी जगातून एक्झिट घेतली.

सहा उच्चशिक्षण संस्थांना श्रेष्ठत्वाचा दर्जा :

 • केंद्र सरकारने सहा उच्च शैक्षणिक संस्थांनाइन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्सदर्जा दिला असून, यात रिलायन्स फाऊंडेशनच्या अजून अस्तित्वात न आलेल्या ‘जिओ इन्स्टिटय़ूट‘चाही समावेश आहे.
 • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तीन सार्वजनिक आणि तीन खासगी उच्चशिक्षण संस्थांची ‘श्रेष्ठत्व’ दर्जासाठी निवड केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही घोषणा केली. Education
 • जिओची निवड ‘ग्रीनफील्ड‘ प्रकारात केल्याचा खुलासा विद्यापीठ अनुदान मंडळाने केला आहे. उच्चशिक्षण संस्था उभ्या करू इच्छिणाऱ्या खासगी संस्थांनाही ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’ दर्जा मिळवण्यासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. त्याअंतर्गत रिलायन्स फाऊंडेशनचा विचार केला गेला आहे. या ‘श्रेष्ठत्व‘ दर्जा मिळालेल्या संस्थांना पुढील पाच वर्षांत 1 हजार कोटींचा विशेष निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
 • केंद्र सरकारने ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स‘साठी शिक्षण संस्थांची निवड करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. देशातील ‘शैक्षणिक श्रेष्ठते’चा दर्जा असण्याची क्षमता असलेल्या 10 सरकारी आणि 10 खासगी अशा 20 संस्थांची निवड करण्यास समितीला सांगण्यात आले होते. मात्र ‘श्रेष्ठता‘ दर्जा देता येईल अशा वीस संस्था समितीला न सापडल्याने फक्तसहा शिक्षण संस्थांचीच निवड करण्यात आली आहे.

रिलायन्स जिओ गिगाफायबर नोव्हेंबरपासून सुरू होणार :

 • 5 जुलै रोजी रिलायन्सच्या 41व्या सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी जिओगिगाफायबर ही ब्रॉडबँड सेवा घराघरात देण्याची घोषणा केली.
 • तसेच कंपनीने आपला दुसरा फीचर फोन Jio Phone 2 हा देखील लॉन्च केला. 15 ऑगस्टपासून जिओ गिगाफायबर सेवेसाठी नोंदणी सुरू होणार आहे.

जिओ गिगाफायबरची काही खास बाबी पुढीलप्रमाणे –

 • ही सेवा रिलायन्स जिओ टप्प्याटप्प्याने सुरू करु शकतं. पहिल्या टप्प्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये देशाच्या 15 ते 20 मोठ्या शहरांमध्ये या सेवेची सुरूवात होईल.
 • बाजारातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सेवेसाठी 500 ते 700 रुपयाचा प्लॅन असण्याची शक्यता आहे. प्लॅनमध्ये 100 mbps हायस्पीडसह 100 GB पर्यंत डेटा मिळेल. तसंच जिओ इंटरनेट टीव्ही, व्हिडीओ कॉलिंग यांसारख्या अनेक व्हॅल्यू अॅडेड सेवा देखील मिळतील.
 • रिलायन्स जिओच्या सीमकार्डप्रमाणेच सुरूवातीचे 3 ते 6 महिने ग्राहकांना जिओ गीगा फायबरची सेवा मोफत पुरवली जाऊ शकते अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 • टेलिकॉम सेक्टरमधील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या सेवेची सुरूवात मागणीनुसार केली जाईल. सर्वाधिक नोंदणी ज्या शहरांमध्ये होईळ त्याच शहरांमध्ये ही सेवा सर्वप्रथम सुरू केली जाईल.

जगातील सर्वांत मोठी मोबाइल फॅक्टरी :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांच्या हस्ते नोएडातील जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंगच्या मोबाइल फॅक्टरीचे उद्घाटन पार पडले. ही फॅक्टरी जगातील सर्वांत मोठी मोबाइल फॅक्टरी आहे.
 • पंतप्रधानांच्या महत्वकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा प्रकल्प सुरु होणार असल्याचे समजते. मागील काही दिवसांपासून या फॅक्टरीबद्दल बरीच चर्चा सुरु आहे.

मात्र ही फॅक्टरी नक्की असणार कशी हे जाणून घेऊयात थोडक्यात –

 • नोएडातील सेक्टर 81 मध्ये सॅमसंगची ही फॅक्टरी 1995 बांधण्यास सुरुवात झाली. या मूळ फॅक्टरीचा विस्तार कऱण्यात येणार आहे.
 • 1995 साली या फॅक्टरीची पहिली वीट रचली गेली. आणि 1997 ला या फॅक्टरीमधून सॅमसंगचा पहिला टिव्ही विक्रिसाठी बाहेर आला. Samsung
 • 2003 साली याच फॅक्टरीमधून सॅमसंगचा भारतातील पहिला फ्रिज तयार करण्यात आला.
 • नोएडामधील याच फॅक्टरीमध्ये 2005 साली पहिले मोबाईल युनिट सुरु करण्यात आले
 • 2012 साली या फॅक्टरीमध्ये सॅमसंगच्या गॅलेक्सी एस थ्री या स्मार्टफोनची निर्मिती सुरु झाली.
 • या फॅक्टरीमुळे 70 हजार जणांना रोजगार मिळणार आहे.
 • सॅमसंगच्या देशात दोन फॅक्टरी आहेत एक नोएडामध्ये दुसरी तामिळनाडूमधील श्रीपेरींबदरूमध्ये आहे.

दिनविशेष :

 • सन 1940 मध्ये बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.
 • सन 1973 मध्ये पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.
 • सन 1978 मध्ये मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.
 • सन 1992 आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.
 • तसेच सन 1992 मध्येह संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-2ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 जुलै 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.