Current Affairs (चालू घडामोडी) of 10 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू
2. स्वेच्छानिवृत्ती विमा कर्मचार्‍यांना पेन्शनवाढ नाही
3. नर्सरीला प्रवेश वय तीन वर्ष
4. सचिनचे चित्रपट सृष्टीत पदार्पण 
5. दांडी कुटीर संग्रालयाचे उद्घाटन
6. आठ नव्या ग्रहांचा शोध 
7. दिनविशेष 

 

 

 

 

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू :

 • जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
 • सरकार स्थापन करण्यासाठी 87 उमेदवारांची मत जमवण्यात कोणत्याच पक्षाला यश न आल्याने राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
 • 20 डिसेंबर 2014 रोजी झालेल्या निवडणुकांत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाले नाही.

स्वेच्छानिवृत्ती विमा कर्मचार्‍यांना पेन्शनवाढ नाही :

 • भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळ आणि त्याच्या अखत्यारित असलेल्या चार सहकारी सर्वसाधारण विमा कंपन्यांमधून 2004 मध्ये स्वेच्छानिवृत्तीघेवून बाहेर पडणार्‍या देशभरातील कर्मचार्‍यांनी वाढील पेन्शनसाठी केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
 • या कर्मचार्‍यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर या कंपन्यांनी डिसेंबर 2005 मध्ये कर्मचार्‍यांना पगारवाढ लागू केली होती.
 • या तारखेला आम्हीसुद्धा नोकरीत होतो.त्यामुळे आमच्या पेन्शनमध्ये वाढ केली जावी, अशी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचार्‍यांची मागणी होती.

नर्सरीला प्रवेश वय तीन वर्ष :

 • वयाची तीन वर्ष पूर्ण केलेल्या मुलांनाच पूर्व प्राथमिक वर्गात (नर्सरी) प्रवेश देण्यात येईल.
 • येत्या शैक्षणिक वर्षापासून (2015-2016) ही वयाची अट लागू केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तवडे यांनी स्पष्ट केले.

सचिनचे चित्रपट सृष्टीत पदार्पण :

 • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित येणार्‍या चित्रपटात स्वतः सचिन भूमिका करणार आहे.
 • ब्रिटिश लेखक जेम्स एरस्किन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत तर चित्रपटासाठी ‘200 नॉट आउट‘ही निर्मिती संस्था काम करीत आहे.

दांडी कुटीर संग्रालयाचे उद्घाटन :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथे “दांडी कुटीर” संग्रालयाचे उद्घाटन केले.
 • या संग्रालयात महात्मा गांधीजींची तीन मजल्याच्या डोमर आकारातील विविध रुपे दाखवली आहे तसेच स्वातंत्र्य चळवळीच्या घटनांचे येथे सादरीकरण देखील आहे.
 • महात्मा गांधीजींना भारतात परतायला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दोन टपाल संचाचे विंनिमोचन केले.

आठ नव्या ग्रहांचा शोध :

 • नासाने सोडलेल्या केप्लर या यानाला यश मिळाले असून त्याने जीवनसृष्टी असलेल्या आठ नव्या ग्रहांचा शोध लावला आहे.
 • त्यातील दोन ग्रह हे पृथ्वीसारखेच आढळून आले आहेत. त्या दोन ग्रहांना केप्लर-438 बी व केप्लर-442 अशी नावे देण्यात आली आहेत.
 • ती दोन्ही ग्रह सुर्यापेक्षा कमी तापमान व आकार असलेल्या ‘रेड इवार्क‘ या गटातील तार्‍याभोवती फिरत आहेत.
 • या दोन्ही ग्रहांचा पृष्ठभाग हा पृथ्वीसारखा खडबडीत आहे.

दिनविशेष :

 • 1966भारत-पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे शांतता करार झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.