Current Affairs (चालू घडामोडी) of 10 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | स्वच्छतागृहांचा ‘पुणे पॅटर्न’ राज्यभर |
2. | इंटरनेटवर सर्वाधिक वेळा शोधण्यात आलेले दहा भारतीय राजकारणी |
3. | पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 6 बाद 354 |
4. | कुलाबा-सीप्झ मेट्रोसाठी ‘एकॉम आशिया’ सल्लागार |
5. | आरती अंकलीकर-टिकेकर यांना वत्सलाबाई जोशी पुरस्कार जाहीर |
6. | शाळा-महाविद्यालय प्लास्टिक ध्वजांना बंदी |
स्वच्छतागृहांचा ‘पुणे पॅटर्न’ राज्यभर :
- उच्च न्यायालयाची सूचना : महिलांसाठी काम करणार्या संस्था पालिकांना मदत करणार.
- अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सर्व पालिकांना केली.
- महिलांसाठी काम करणार्या संस्थांची मदत घेत असून त्याबाबत बैठकाही घेण्यात आल्याचा दावा प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.
इंटरनेटवर सर्वाधिक वेळा शोधण्यात आलेले दहा भारतीय राजकारणी :
- 2014 या वर्षी इंटरनेटवर सर्वाधिक वेळा शोधण्यात आलेल्या भारतीय राजकारण्यांमध्ये नरेंद्र मोदींचे नाव आघाडीवर आहे.
- ‘याहू इंडिया‘ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
- त्याचप्रमाणे अमित शाह आणि अरुण जेटली यांनीही मोदीखालोखाल क्रमांक पटकावला आहे.
- यादीत आघाडीच्या स्थानावर असलेले राजकारणी – नरेंद्र मोदी, अमित शहा, अरुण जेटली, मोहन भागवत, राजनाथ सिंह, मनोहर पार्रिकर, सोनिया गांधी, सुरेश प्रभू, राम माधव, शरद पवार.
पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 6 बाद 354 :
- अॅडिलेड कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या दिवसाअखेर 6 बाद 354 झाली आहे.
कुलाबा-सीप्झ मेट्रोसाठी ‘एकॉम आशिया’ सल्लागार :
- कुलाबा ते सीप्झ या 33.5 किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन‘ने ‘एकॉम आशिया‘या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
- ही हॉगकॉगमधील कंपनी असून यात जपानची पडेको, अमेरिकेची एलबीजी इन्क आणि फ्रान्सच्या एजिस रेल या कंपन्यांचा सहभाग आहे.
आरती अंकलीकर-टिकेकर यांना वत्सलाबाई जोशी पुरस्कार जाहीर :
- आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शिष्या आणि प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना वत्सलाबाई जोशी पुरस्कार जाहीर झाला आहे.
- 51 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या पत्नी वत्सलाबाई जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार मंडळातर्फे दिला जातो.
शाळा-महाविद्यालय प्लास्टिक ध्वजांना बंदी :
- प्रजासत्ताक दिनी शाळा महाविद्यालयांत विद्यार्थी किवा शिक्षकांना प्लास्टिक झेंडे वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
- याबाबद आदेश सरकारने काढला आहे.