Current Affairs of 1 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 मे 2018)

चालू घडामोडी (1 मे 2018)

रेरा अंमलबजावणीत महाराष्ट्र अव्वलस्थानी :

  • बांधकाम क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याबरोबरच ग्राहकांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या (रेरा) कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. या कायद्यांतर्गत महाराष्ट्राने स्थापन केलेल्या ‘महारेरा‘ प्राधिकरणाकडे सर्वाधिक म्हणजे 16 हजार 165 बांधकाम प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. तर, आतापर्यंत एक हजाराहून अधिक ग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींचे निवारण महारेराकडून करण्यात आले आहे. हादेखील एक विक्रम ठरला आहे.
  • केंद्र सरकारकडून देशभरात लागू केलेल्या रेरा कायद्यांतर्गत राज्य सरकारने महारेराची स्थापना केली. त्यास 1 मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने देशभरात लागू झालेल्या कायद्याचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
  • ऑनलाइन नोंदणी आणि ग्राहकांना ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा देणारेही महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 एप्रिल 2018)

सेबीच्या निर्णयाविरोधात सहारा करणार नव्याने अपील :

  • सेबीने सहारा म्युच्युअल फंडाला आपल्या सर्व योजना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सहारा समूहाने सिक्युरिटीज अॅपेलेट ट्रिब्युनलकडे धाव घेतली होती.
  • सिक्युरिटीज अॅपेलेट ट्रिब्युनलने सहारा समूहाला सेबीच्या निर्णयाविरोधातील आपले अपील मागे घेण्याची परवानगी दिली आहे.
  • सेबीने सहारा समूहाला आपल्या सर्व म्युच्यअल फंड योजना बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भात सहारा समूह सेक्युरिटीज अॅपेलेट ट्रिबूनलकडे दाद मागितली होती.
  • सेक्युरिटीज अॅपेलेट ट्रिबूनलने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सहारा समूहाला आपले अपील मागे घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • त्यायोगे सहारा समूहाला नव्याने आपले अपील दाखल करता येणार आहे. सेक्युरिटीज अॅपेलेट ट्रिबूनलने असेही सांगितले आहे की, नवीन अपील दाखल करण्यासाठी सहाराला 2 मे 2018 पर्यंतची मूदत देण्यात आली आहे. जर नवीन अपील जर 2 मे 2018 पर्यंत दाखल करण्यात आले तर 3 मे 2018 रोजी अपीलाला प्रवेश देण्यात येईल.

जेईई मुख्य परिक्षेमध्ये सुरज भोगी देशात पहिला :

  • सीबीएसीने JEE मुख्य परिक्षेच्या पेपर-1 चा निकाल जाहीर केला असून उमेदवारांना www.cbseresults.nic.in या सीबीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा निकाल पाहता येणार आहे.
  • तसेच पात्र उमेदवार आणि त्यांची रँकही उमेदवारांना येथे पाहता येईल. त्याचबरोबर पेपर-2 चा निकाल 1 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • पेपर-1 मध्ये आंध्रप्रदेशचा सुरज कृष्णा भोगी याने अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून के.व्ही.आर. हेमंत कुमार चोडिपिल्ली हा दुसऱ्या स्थानावर आहे. तर, राजस्थानचा पार्थ लातुरीया हा 350 गुणांसह तीसऱ्या स्थानावर आहे.
  • JEE main 2018 परिक्षा दिलेल्यांपैकी 2 लाख 31 हजार 24 उमेदवार JEE advanced 2018 परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 2017 पर्यंत 220000 उमेदवार JEE advanced साठी पात्र ठरले होते.
  • JEE Advanced 2018 ही परिक्षा IITमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. JEE advanced 2018 ही परिक्षा 20 मे 2018 रोजी होणार असून त्यासाठी नोंदणी प्रक्रिया 2 मे 2018 पासून सुरु होणार आहे.

तेजसमधून BVR मिसाईलची चाचणी यशस्वी :

  • स्वदेशी बनावटीच्यातेजस‘ या हलक्या लढाऊ विमानाच्या क्षमतेबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली असली तरी तरी तेजसवरुन नुकतीच घेण्यात आलेली हवेतून हवेत मारा करणाऱ्या बीव्हीआर क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरली.
  • तसेच या चाचणीच्या निमित्ताने तेजसने फायटर विमान म्हणून आपली परिणामकारकता आणि क्षमता सिद्ध केली आहे तसेच फायनर ऑपरेशनल क्लियरन्स मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
  • राफेल या इस्त्रायली कंपनीने बीव्हीआर मिसाईलची निर्मिती केली आहे. भारतीय नौदलाने त्यांच्या निवृत्त झालेल्या सी हॅरीयर्स विमानांसाठी बीव्हीआर मिसाईलस विकत घेतली होती. गोव्याच्या किनाऱ्यावर 27 एप्रिल रोजी तेजसमधून बीव्हीआर मिसाईल डागण्यात आले. या चाचणीने सर्व निकष पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.

वीरपत्नींसाठी मोफत एसटी प्रवास योजना :

  • शहीद जवानांच्या पत्नींना 1 मे पासून (महाराष्ट्र दिन) एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. 1 मे 2018 रोजी प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते बस सवलतीचे ओळखपत्र वीरपत्नींना देऊन या योजनेचा शुभारंभ होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेतंर्गत ही सवलत योजना सुरु करण्यात आली आहे.
  • शहीदांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर यापुढे शहीदांच्या वारसांना एसटीत नोकरीही देण्यात येणार आहे. या योजनेला हातभार लावण्यासाठी नागरिकांनी प्रामुख्याने एसटीनेच प्रवास करावा, असे आवाहन एसटीकडून करण्यात आले आहे. कारण, यामुळे नागरिकांकडून देशसेवेसाठी हातभार लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
  • 1 मे पासून राज्याभरातील 517 वीरपत्नींना मोफत एसटी प्रवासाचे ओळखपत्र देण्यात येणार आहे. या ओळखपत्रावर एका बाजूला शहीद जवानाचा फोटो आणि हुद्द्यासह संपूर्ण माहिती तर दुसऱ्या बाजूला वीरपत्नीचा फोटो, सवलत पास क्रमांक आणि संपूर्ण माहिती छापलेली असेल. 1 मे रोजी होणाऱ्या या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी एसटीकडून विशेष व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे एसटीच्या सुत्रांकडून कळते.

राज्याच्या मुख्य सचिवपदी डी.के. जैन यांची नियुक्ती :

  • वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी.के. जैन यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
  • मुख्य सचिव पदासाठी डी.के. जैन आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या नावाची चर्चा होती.
  • सेवाज्येष्ठतेचा निकष हा गाडगीळ यांच्या बाजूने होता. जैन हे 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते 31 जानेवारी 2019 ला सेवानिवृत्त होतील. कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून जैन यांची ओळख आहे.

दिनविशेष :

  • ‘आर्य महिला समाजा’ची 1 मे 1882 रोजी पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.
  • सन 1890 मध्ये 1 मे रोजी जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
  • स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 रोजी ‘रामकृष्ण मिशन’ची सुरूवात केली.
  • 1 मे 1927 रोजी जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
  • मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा 1 मे 1960 रोजी निर्माण झाला.
  • 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना झाली.
  • अमरावती विद्यापीठाची स्थापना 1 मे 1983 मध्ये झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 मे 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.