Current Affairs of 1 July 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 जुलै 2018)

चालू घडामोडी (1 जुलै 2018)

भारत घेणार रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली :

  • रशियाकडून अत्याधुनिक S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यासाठी भारतानं एक पाऊल पुढे टाकलं आहे.
  • अमेरिकेकडून निर्बंध लादले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असतानाच भारताचं संरक्षण मंत्रालय 39 हजार कोटी रुपयांच्या S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी कराराच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
  • तसेच या क्षेपणास्त्र प्रणालीच्या माध्यमातून शत्रूंची युद्धजहाजे, हेरगिरी करणा-या नौका, मिसाइल आणि ड्रोनला 400 किलोमीटरच्या टप्प्यात असताना हवेच्या 30 किलोमीटर वरच निस्तनाबूत करता येणार आहे.
  • भारत आणि रशियामध्ये असलेल्या प्रस्तावित करारानुसार भारतीय हवाई दलाला 24 महिन्यांनंतर व्यवस्थापन प्रणाली, रडार आणि लाँचरसह S-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार आहे. त्यानंतर 60 महिने म्हणजेच 5 वर्षांच्या आत भारताला उर्वरित S-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार आहेत.
  • S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणालीमुळे भारताला स्वतःच्या महत्त्वाच्या शहरांचं संरक्षण करता येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जून 2018)

पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढली :

  • पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.
  • यापूर्वी 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
  • मात्र केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी लिंक करण्यासाठी दिलेली मुदत पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत वाढवली आहे.

अमेरिकी वस्तूंवर कॅनडाकडून मोठा कर :

  • अमेरिकेने आयात कर वाढवल्यानंतर आता कॅनडानेही अमेरिकी वस्तूंवर आयात कर लादला आहे.
  • तर उन्हाळयात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर कॅनडाने कर वाढवला असून त्या वस्तूंमध्ये फ्लोरिडाचा संत्रा रस, केचअप, केंटुकी बोर्बन यांचा समावेश आहे.
  • तसेच कॅनडाच्या 12.6 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर अमेरिकेने आयात कर वाढवला होता. त्याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होत असतानाच कॅनडाने हा निर्णय घेतला आहे.

मुस्लीम महिलेने उर्दू भाषेत लिहिले रामायण:

  • कानपूरच्या एका मुस्लीम महिलेने उर्दू भाषेत रामायण लिहिले आहे.
  • मुस्लीम समाजालाही रामायणातील चांगल्या गोष्टींबद्दल माहिती व्हावी हा यामागील उद्देश असल्याचे या महिलेने म्हटले आहे.
  • तसेच त्यांना उर्दू भाषेत रामायण लिहिण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागला आहे.

केंद्र सरकार जीएसटी दिन करणार साजरा :

  • वस्तू आणि सेवाकर अर्थात ‘जीएसटी’ ही करप्रणाली लागू करून एक वर्ष झाल्यानं केंद्र सरकार आज जीएसटी दिन साजरा करणार आहे.
  • तसेच जीएसटी लागू झाल्यानंतर आता वर्षभरात देशभरातील करदात्यांची संख्या 1.20 कोटी झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा आकडा 9.10 लाख आहे.
  • तर राज्यातील करदात्यांचा वाटा 7 टक्क्यांवर आला आहे. एकीकडे देशातील जीएसटीदात्यांची संख्या 56 लाखांनी वाढली असताना राज्यातील ही वाढ फक्त 60 हजारांइतकीच आहे.

दिनविशेष :

  • 1 जुलै – महाराष्ट्र कृषिदिन
  • 1 जुलै – भारतीय वैद्य दिन
  • मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना 1 जुलै 1934 मध्ये यश आले.
  • 1 जुलै 1947 मध्ये फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.
  • सोमालिया व घाना हे देश 1 जुलै 1960 मध्ये स्वतंत्र झाले.
  • रवांडा व बुरुंडी हे देश 1 जुलै 1962 मध्ये स्वतंत्र झाले.
  • 1 जुलै 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 जुलै 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.